Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मुख्यमंत्रीपद मी ब्राह्मणाला दान म्हणून दिले – खडसे

जळगाव/दि/
भाजपाला रामराम ठोकल्यानंतर आता एकनाथ खडसे चांगलेच आक्रमक झाले आहेत. माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचा एककलमी कार्यक्रम सध्या खडसे यांनी हाती घेतल्याचे दिसून येत आहे.


मी भल्याभल्यांना मुख्यमंत्रीपद दान करत असतो. त्यामुळे असं समजा की उत्तर महाराष्ट्रात मुख्यमंत्री पदाचा दावेदार असलेलं हे पद मी ब्राह्मणाला म्हणून दिलं आहे. गल्लीतले कार्यकर्ते मी मोठे केले आणि आता तेच मला अक्कल शिकवायला लागले आहेत असं म्हणत खडसेंनी भाजपावर टिका केली आहे. ते मुक्ताईनगर येथे बोलत होते.
मला फाशी घेण्याची वेळ आली होती. इतकं भाजपामधल्या एका व्यक्तीने मला छळलं अशी खंत देखील एकनाथ खडसे यांनी बोलून दाखविले. भाजपाने एका व्यक्तीच्या लाडापोटी माझ्यासारख्यांना बाजूला केलं. एका व्यक्तीमुळे सरकारचं वाटोळ झालं. मला या पक्षातून छळ करत ढकलण्यात आलं.
मला अक्कल शिकवायला चालले होते. मी अख्खं आयुष्य भाजपाला दिलं. माझा मुलगा गेला तरीही मी भाजपाशी एकनिष्ठ राहिलो. पण मला एका माणसाने छळले, असेही म्हणत खडसे यांनी फडणवीस यांना टोला लगावला.