Sunday, November 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बाई… बाई… बाईऽऽऽ… डेक्कन पोलीसांना (अनाठाई) भलतीच घाईऽऽ, नको तिथं कारवाई… पाहिजे तिथं भलतीच आवई

डेक्कन…गुडलक चौक.. संभाजी पुतळा…एफसी रोड… भांडारकर आणि पोलीस स्टे ३६० डिग्री
रशियन, उज्बेकीस्तान, कजाकिस्तान, थायलंड, जम्मु, पंजाब, हरियाणा, युपी-एमपी आणि पुणं
सगळा रगडापॅटीस आणि कोल्हापुरी मिळस झालीय बघ्घाऽऽऽ


पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस ऍक्टीव्ह कधी होतात, रिऍक्ट कधी होतात. पोलीसांचे वर्तन पॉझिटीव्ह आणि निगेटिव्ह होेते तरी कधी हा प्रश्‍न सर्वसामान्यांना पडला आहे. पोलीसांचे काम कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणे एवढेच आहे. समरी पॉवर असली तरी न्यायदानाचे काम हे न्यायालयामार्फतच होत असते. कायदा सुव्यवस्था सांभाळत असतांना, कायदा आणि सुव्यवस्थेच्या नावाखाली स्वतःची वैयक्तिक दुकानदारी सुरू करण्याचा प्रकार गेल्या काही वर्षापासून खात्यात सुरू आहे. जिथं अर्थपुर्ण व्यवहार होतात, तिथं पोलीस एकाएकी ऍक्टीव्ह होत आहेत. परंतु न्यायासाठी जे पोलीस चौकीची पायरी चढतात त्यांना मात्र पोलीस रिऍक्ट होताना दिसत नाहीत. तिथं पोलीसांची मानसिकता निगेटिव्ह स्वरूपाची होत चालली आहे. अशीच अवस्था सध्या डेक्कन पोलीस स्टेशन व त्यांच्या अधिनस्थ पोलीस चौकींत प्रकार सुरू आहेत.


शिवाजी नगर पोलीस स्टेशन हद्दीतील एका कार्यालयातील एका इसमाला ऑफ दी रेकॉर्ड व ऑफ दी वे जावून, मदत करायची आहे. त्यासाठी डेक्कन पोलीस स्वतःचे पद आणि खाकी वर्दीचा वापर करून, सहजपणे सर्वसामान्य नागरीकाला बळीचा बकरा करून, त्या तिर्‍हाईत कर्मचार्‍याला मदत करतात. बळी ठरलेला न्यायासाठी लढतोय की मरतोय हे महत्वाचे नाही. मदत दिली आणि मदत पोहोचती झाली एवढ्यावरच आजचे डेक्कन पोलीस स्टेशन कारभार सुरू आहे.
दुसरं, डेक्कन पोलीस स्टेशन हद्द म्हणजे पॉश एरिया. एैष करण्यासाठी पुण्यात आलेला रंगिलाबाबू कोरेगाव पार्क आणि डेक्कन-एफसीरोडवर आला नाही तर नवलच म्हणायचं. डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत मसाज पार्लर आणि स्पाच्या नावाखाली २४ बाय ७ वेश्यालये सुरू आहेत. मानवी देह व्यापार कायदयाने प्रतिबंधित आहे. स्त्रीयांचा अपव्यापारावर कायदयाने बंदी आहे. मग ही वेश्यालये पोलीस स्टेशन हद्दीत कशी काय सुरू आहेत, हा प्रश्‍न स्थानिक राहणार्‍यांना निश्‍चित पडलेला आहे.
डेक्कन पोलीस हद्दीत गुडलक चौक सागर आर्किड शीलाज स्पा, ड्रिम बॉडी स्पा डेक्कन जिमखाना, फोर फाऊंटन,इनरीच,इजिजनस – भांडारकर रोड वर तीन, जंगली महाराज रोड वर दोन, आतल्या मधल्या गल्ली बोळात देखील मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार सुरू आहे. पुण्यातल्या रास्ता पेठेत जशी खाऊ गल्ली आहे, तस्सं कोरेगाव पार्क, कल्याणी नगर, विमाननगर, खराडी, वारजे, बाणेर, आणि डेक्कन पोलीस स्टेशन हद्दीत वेगवेगळ्या चवीचे ग्राहक आहेत. त्यांना विदेशातील महिलां विषयी प्रचंड आवड. मग दलालांनी देखील रशियन, उज्बेकीस्तान, कजाकिस्तान, थायलंड येथील मुली व महिलांचा अपव्यापार सुरू केला आहे. विदेशातील मुली व महिला ह्या टुरिस्ट परवान्यावर आलेल्या आहेत. काहींचा व्हिसा संपला तरी पुण्यातच आहेत हे विशेष. काहीजणांना पर राज्यातील मुली आणि महिलांचे आकर्षण आहे. बिहार, कर्नाटकी नको म्हणून, आता जम्मु, पंजाब, हरियाणा, युपी-एमपीतील मुली व महिलांचा अपव्यापार सुरू आहे.
पुणं देखील या कामात मुळीच मागे नाही. पुण्यातही कॉलसेंटर, मॉल व वेगवेगळ्या मल्टिनॅशनल कंपनीत कार्यरत देखील शौक म्हणून या उद्योगात उतरले आहेत.
हे नागरीकांना दिसते, बातमीदारांना जाणवते. मग कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणार्‍या पोलीसांना माहिती नाहीये काय असाही प्रश्‍न पडू शकतो. आता हा प्रश्‍न डेक्कन पोलीस स्टेशन मधील गुजरासंहित वरीष्ठांना विचारलेला बरा. ह्याचं उत्तर नेमकं पणानं तेच देवू शकतील. प्रश्‍न करतांना, कारवाई करून, देहव्यापार कधी बंद होणार हे मात्र विचारायला विसरू नका म्हणजे मिळविले…