पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्याच्या गृहमंत्रालयात सचिव पदावर कार्यरत असलेले अमिताभ गुप्ता आता पुण्याचे पोलीस आयुक्त म्हणून रुजु झाले आहेत. राज्याच्या कानाकोपरर्यातून मंत्रालयात येणार्यांची संख्या मोठी असते, तसेच अर्जांचा ढिगारा उपसण्याचे काम उच्च स्तरावर सुरू असतो. एकाच दिवसात शंभर/ शंभर फाईल्स हातावेगळ्या करण्याची हातोटी आपल्या नुतन पोलीस आयुक्तांकडे आहे. त्यामुळेच पुणे शहरातील पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्या दिवसा पासूनच, पुणे शहरातील गुन्हेगारी मोडून काढण्याचे आदेश त्यांनी जारी केले. तसेच पुणेशहर पोलीस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या पाचही युनिटला सतर्क करून, गुन्ह्याचा शोध व प्रकटीकरणाची अंमलबजावणी करण्याचे आदेश जारी केले. नुतन पोलीस आयुक्तांच्या आदेशामुळे पुण्यातील बहुतांश पोलीस स्टेशनने त्यांच्या हद्दीतील खुनाच्या घटनांची उकल केली आहे. चालुच्या आठवड्यात एकुण ६ पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या खुनी हल्यांचे मुख्य सुत्रधार पकडले असल्याचे दिसून येत आहे. यावरून पोलीस स्टेशनने मरगळ झटकुन कामाला लागले असल्याचे दिसून येत आहे.
फरासखाना पोलीसांनी देखील पोलीस आयुक्तांच्या आदेशाचे गांभिर्य लक्षात घेवून, गुन्हेगारांवरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी धडाधडा पावले उचलणे सुरू केले आहे. त्यांच्या हद्दीतील दिपक मारटकर खुन प्रकरणातील सर्व आरोपींना गजाआड करण्यात आले आहे.
फरासखाना पोलीसांनी निवेदन दिले आहे की, २ ऑक्टोंबर रोजी रात्री सव्वाबाराच्या सुमारास बुधवार पेठ गवळी आळी येथील सार्वजनिक रोडवर दिपक मारटकर यास आरोपी अश्विनी कांबळे, सनी कोलते, व महेंद्र सराफ यांच्या सोबत असलेल्या जुन्या राजकीय वादाचे कारणावरून त्याचा राग मनात धरून, महेंद्र सराफ व अश्विनी कांबळे यांच्या सांगण्यावरून सनी कोलते व त्याच्या सोबत नेहमी असणारे संदीप कोलते, रोहित कांबळे, राहुल रागीर, व आणखी दोन इसमांनी दिपक मारटकर याचे डोक्यावर, हातावर, व तोाडावर धारदार लोखंडी शस्त्राने वार करून त्याला जखमी करून जिवे ठार मारले. याबाबत फरासखाना पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल होवून, दादा गायकवाड पोलीस निरीक्षक गुन्हे हे तपास करीत होते.
दरम्यान गुन्ह्याचा तपास करीत असतांना, अश्विनी सोपान कांबळे, महेंद्र सराफ, निरंजन म्हंकाळे, प्रशांत उर्फ सनी प्रकाश कोलते, राहुल रागीर, राहित उर्फ बाळा कमलाकर कांबळे, राहित क्षीरसागर, संदीप उर्फ मुंगळ्या प्रकाश कोलते, लखन ढावरे यांनी बुधवार पेठ, मंडई परिसरात स्वतःचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वांनी कट कारस्थान रचुन दिपक मारटकर याला संपविण्याच्या उद्देशाने बेकायदेशीर वर्चस्व स्थापन करता यावे म्हणून दिपक मारटकर याचा धारदार शस्त्राने सपासप वार करून कु्ररपणे खुन केला असल्याची माहिती फरासखाना पोलीसांनी दिली आहे.