Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पोरगी पळवून आणू, तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आलीय? अजित पवारांचा घणाघात

Ajit-Pawar

पुणे/दि/ प्रतिनिधी/

                सरकार म्हणतंय बेटी बचाव आणि बेटी पढाव आणि यांचा एक निर्लज्ज आमदार म्हणतोय पोरगी पळवून आणू. तुझ्या काय बापाची ठेव आहे का? कशाची मस्ती आली? आणि हे भाजपचे प्रवक्ते म्हणून मिरवतात. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायची वेळ आली आहे, असा घणाघात अजित पवार यांनी केला.

                पुणे जिल्हा शिक्षण मंडळाच्यावतीने आयोजित बाबुरावजी घोलप पुरस्कार प्रदान समारंभात अजित पवारांनी राम कदम यांच्यावर जोरदार टीका केली.

                ते म्हणाले की पक्षाचा एक आमदार महिलांबाबत असे बोलतो. मात्र, पक्षाचे प्रमुख लोक काही बोलू शकत नाहीत हे घातक आहे. यावर माफी मागणे तर दुरच, पण खेद काय व्यक्त करतात, दिलगिरी काय व्यक्त करतात. मात्र, त्यांना पाठिशी घालण्यात येत आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून द्यायलाच हवी.