Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यात २२ सप्टेंबर ते ५ ऑक्टोंबर पर्यंत प्रतिबंधात्मक आदेश जारी, सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांची सार्वजनिक दवंडी

j.cp pune

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात जनतेच्या मागण्यांसाठी विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना मोर्चे, धरणे आंदोलन, निदर्शने, बंद पुकारणे व उपोषणा सारखे आंदोलनाचे आयोजन करतात. शहर परिसरात ठिकठिकाणी महानगरपालिकेच्या वतीने अनाधिकृत बांधकाम हटविण्याच्या कार्यवाहीच्या वेळेस कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याचा संभव आहे. तसेच बाल सुरक्षा दिन, महात्मा गांधी जयंती, लालबहाद्दुर शास्त्री जयंती आहे. त्या निमित्त पुणे शहरत पोलीस आयुक्तालयाने पुणे शहरात कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम ३७ (१) (३) व (४) नुसार प्रतिबंधात्मक आदेश जारी केले आहे.


दरमन जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना विषाणुमुळे पसरत असलेला आजार हा साथीचा संसर्गजन आजार म्हणून घोषित केला आहे. तसेच कोरोना विषाणूचा प्रसार भारतात, महाराष्ट्रात, पुणे शहरात गतीने पसरत आहे असे दिसून येत आहे. तसेच राज्य शासनाने कोरोना विषाणू कोविड १९ चा प्रादूर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथीचा रोग प्रतिबंधात्मक कायदा लागु केला आहे. त्यामुळे कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनांचा भाग म्हणून पोलीस आयुक्त क्षेत्रात या पूर्वी वाहनांचा वापर व वाहतुक बंदी, जमावबंदी, सर्व धर्माची प्रार्थनास्थळे बंद ठेवणे तसेच संचारबंदी आदेश लागु करण्यात आला होता. यामुळेच यापुढेही १४ दिवसांसाठी पुणे शहरात प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आल्याची माहिती सहपोलीस आयुक्त डॉ. रविंद्र शिसवे यांनी पत्रकाव्दारे दिली आहे.
प्रतिबंधात्मक आदेश लागु असतांना, कुणीही शस्त्रे, भाले, तलवारी, दंड काठ्या, बंदूका, शारिरीक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तु, दाहक पदार्थ, कोणत्याही इसमाच्या चित्राचे, प्रेताचे, पुढार्‍यांचे चित्राचे प्रतिमेचे दहन करणे, मोठ्याने घोषणा देणे, वाद्य वाजविणे, तसेच सभ्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलटथवुन देण्यास प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा अविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे, या कृत्यांना बंदी करण्यात आली आहे.