Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुण्यातील हमाल पंचायतीचा आठमुठेपणा, व्यापार्यांकडून जबरी तोलाईची वसुली- दि पूना मर्चंट चेंबरची भूमिका

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       राज्यात पुणे सोडून अन्य कुठेही स्वतः खरेदी करून आणलेला माल, अर्थात घाऊक मालास तोलाई नाही. त्यात राज्य शासनाने १ डिसेंबर २०१८ मध्ये इलेक्ट्रॉनिक काटे बसविण्यात आलेल्या ठिकाणी मालाचे वजन करतांना कोणत्याही प्रकारची मोलाई न आकारण्याचे अआदेश काढले. त्यानुसार गुलटेकडी येथील मार्केट यार्डातील भुसार बाजारातील व्यापार्‍यांनी तोलाई आकारणे बंद केले आहे. हमाल पंचायतीने मात्र या विरोधात काम बंद आंदोलनाचा निर्णय घेतला आहे. हमाल पंचायतीचा हा निर्णय बेकायदेशीर असल्याचे दि पूना मर्चंट चेंबरने म्हटले आहे. तसेच तोलाईबाबत प्रशासन आणि हमाल पंचायतीने व्यापार्‍यांवर बॠळजबरी करू नये अशी भूमिका व्यक्त केली आहे.

       मार्केटयार्डातील गुळ भुसार विभागातील व्यापारी बाजार समिती प्रशासनाने सांगुनदेखील अद्यापही तोलणारांना काम नाहीत. त्यामुळे व्यपार्‍यांनी तोलणारांना कामावर न घेतल्यास हमाल देखील पुन्हा काम बंद करणार असल्याचा इशारा हमाल पंचायतीने दिला आहे.

        या सर्व पार्श्‍वभूमीवर दि पूना मर्चंट चेंबरने प्रसिद्धी पत्रकाव्दारे त्यांची भूमिका स्पष्ट केली आहे. त्यांनी नमूद केले आहे की, पुणे गुळ भुसार विभागात ३३ मापाडी आहेत. त्यात ८ मापाड्यांचे वय ६० वर्षापेक्षाही अधिक असून, त्यांच्याकडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे लायसन देखील नाहीत. शिल्लक २५ मापाडी व प्रत्यक्षात ६०० दुकानदार आहे. हे मापाडी वजन देखील करीत नाहीत. केवळ संध्याकाळी व्यपार्‍यांच्या दुकानात येऊन बिलावरून नोंद करून तोलाईची रक्कम वसूल करतात.

       त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून ही तोलाई बंद करण्याची मागणी व्यापार्‍यांनी शासनाकडे केली होती. त्यानुसार शासनानेदेखील इलेक्ट्रॉनिक वजन कोटे असलेल्या ठिकाणी कोणत्याही प्रकारची तोलाई न आकारण्याबाबत आदेश दिले आहेत. त्यानुसारच मार्केटयार्डातील गुळ भुसार बाजारातील व्यापार्‍यांनी तोलाई न आकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हमाल पंचायसत व्यापार्‍यांवर चुकीचा दबाव टाकत असून, बेकायेदशीररित्या बाजार बंद करत असल्याचे दि पूना मर्चंट चेंबरची भूमिका आहे.

हमाल पंचायतीला निव्वळ पुळका- प्रत्यक्षात हमालांसाठी काहीच केले जात नाहीये –

       हमाल पंचायतीने आजपर्यंत केलेली आदोलने ही हमालांसाठी केली असली तरी मार्केटयार्डातील हमालांसाठी हमाल पंचायतीने नेमक काय केलं आहे याचा जाब विचारण्याची वेळ आली आहे. डाळींब यार्डात हमाली काम करणार्‍या स्थानिक बेरोजगार युवकांना दहशतीखाली ठेवून, प्रसंगी वृत्तपत्रांतून खोट्या बातम्या प्रसारित करून, न्याय मागणारांवर गुन्हे दाखल करण्याची केली जात आहे. मागील दोन महिन्यांपासून हे प्रकरण अधिक गंभिर स्वरूपाचे झाले आहे. थोडक्यात व्यापार्‍यांवर दबाव टाकणे, हमाल व अंगमेहनती कष्टकर्‍यांवर दबाव टाकणे, बाजारात अशांतता निर्माण करणे असे प्रकार सध्या गुलटेकडी मार्केटयार्डात होत असल्याचे दिसून येत आहे. तरी बाजार समितीने व स्थानिक पोलीसांनी या सर्व प्रकरणी योग्य तो निर्णय घेण्याची वेळ आली आहे.

       दि पूना मर्चंट चेंबरने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, ३३ मापाड्यातून  ८ मापाडी ६० वर्षापेक्षा अधिक वयाचे आहेत. त्यांच्याकडे बाजार समितीचे लायसन देखील नाहीत. अर्थात २५ मापाडी ६०० व्यापार्‍यांना कोणतेही काम न करता बिलावरून तोलाई वसूल करीत आहेत. ही तोलाई नसून खंडणीच म्हणावी लागेल. त्यामुळे मार्केटयार्ड पोलीसांनी या प्रकरणी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता असल्याचे मत रिपब्लिकन फेडरेशन महाराष्ट्रचे मार्केटयार्ड स्थानिक कामगार न्याय हक्क परिषदेने नमूद केलं आहे.