Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील लोकसेवक ते प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक, श्रीधर येवलेकरांचा जुजबी प्रवास.

pmc pune yewalkar

छत्रपती संभाजी महाराज मालिकेतील आणाजी पंत सुरनीस आणि पुणे महापालिकेतील बांधकाम विभागाचे श्रीधरपंत येवलेकर

थोडक्यात………….

 ते आणाजी पंत आणि हे श्रीधरपंत, दोघात नेमकं साम्य आहे काय…?

पुणे/दि/अनिरूद्ध शालन चव्हाण/

       पुणे महापालिका आणि राज्य शासनाचं प्रचंड आर्थिक नुकसान करायच. पुणे महापालिकेच्या नागरी सुविधांवर प्रचंड ताण आणायचा. प्रसंगी नगरसेवकांनाही हाताशी धरायचं, विधानसभा/ विधानपरिषद सदस्यांना यामध्ये नाहक गुंतवून ठेवायचं. आणि मुठभर भांडवलदारांचा आर्थिक फायदा करून  दयायचा  व त्यायोगे स्वतःचाही आर्थिक फायदा करून घ्यायचा हे सुत्र भयंकर आहे. पुणे महापालिकेने दिलेल्या पदांचा आणि अधिकारांचा एवढा वापर पुणे महापालिकेच्या इतिहासात कधीचा झाला नव्हता. त्याचा हा इतिहास पुणेकरांपुढे सादर करीत आहोत.

       काही लोकांना सांगुन पैसे खाण्याची सवय असते, तर काही लोकांना पैसे खाऊन सांगण्याची सवय असते. पुणे महापालिकेतील बांधकाम विभागातील एका कार्यकारी अभियंत्याला पैसे खाल्ले आहेत हे सांगण्याची भलतीच सवय आहे. त्यासाठी ते पाठीमागे पुरावा नेहमी ठेवतात.

       प्रत्येक गुन्हेगार हा गुन्हा करीत असतांना कोणताही पुरावा मागे ठेवत नाहीत. अस्सं प्रत्येक गुन्हेगाराला नेहमी वाटत असतं की त्यांनी ज्या प्रकारचा गुन्हा केलाय, त्यासाठी त्यान कोणताही पुरावा मागे ठेवला नाही. तथापी आमच्या पोलीस खात्याच्या भाषेत सांगायचं झाल्यास, एखाद्या गुन्हेगाराने कितीही मोठा वा छोटा गुन्हा केला तर तो लपत नाही किंवा प्रत्येक गुन्हेगार गुन्हा करीत असतांना, तो केसाइतका तरी पुरावा मागे ठेवतो असा आजवरचा पोलीस खात्याचा १७५ वर्षाचा अनुभव आहे.

       पैसे खाण्याचं सांगणं किंवा पैसे खाऊन सांगणे. किंवा गुन्हा करीत असतांना, पुरावा मागे ठेवला नाहीये अस्सं काहींना वाटते. परंतु पोलीस खात्याच्या भाषेत सांगायचं तर प्रत्येक गुन्हेगार हा गुन्ह्यामागे एक तरी पुरावा सोडत असतो. पैसे खाणे, गुन्हेगार, पोलीस आणि भ्रष्टाचार किंवा अपसंपदा हे सर्व गुण शासनाच्या आस्थापनेवरील प्रत्येक कर्मचार्‍याच्या अंगात भिनलेले आहेत. थोडक्यात विष्णुगुप्तांच्या मते पाण्यातील मासा नेमकंपणांन पाणी कधी पितो याचा भरवसा देता येत नाही, अगदी तस्सं.

       पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील १०० लोकसेवकांनी एकत्र येवून पैसे खाण्याचा (थोडक्यात वरकमाईचा) जेवढा पराक्रम केला नसेल तितका भयाण पराक्रम याच खात्यातील कार्यकारी अभियंता श्रीधरपंत येवलेकर यांनी केला असल्याचे अनेक पुरावे त्यांनी पाठीमागे ठेवले असल्याने, त्यांच्यावर दोषारोप पत्र सादर करण्यात आम्हाला मुळीच शंका वाटत नाहीये. परंतु हे महाशय सफाईदार गुन्हा करीत असतांना, त्यांनी शहर अभियंता कार्यालयास वेठीस धरले आहे. त्याचं जवळचं उदाहरण द्यायच तर ….

       सध्या एका खाजगी वृत्तवाहीनीवर छत्रपती संभाजी ही मालिका अगदी जोरात सुरू आहे. सध्या या मालिकेचा प्रवास, छत्रपती संभाजी महाराजांना विषप्रयोग केला व त्यात मंत्रिमंडळातील प्रमुखांना हत्तीच्या  पायी देण्यापर्यंत आला आहे. मूळात इतिहास नेमका काय आहे हे आम्हाला ज्ञात नाहीये. ११ वी. १२ वी व पुढे प्रथम वर्षापर्यंत इतिहास हा माझा आवडीचा विषय होता. परंतु द्वितीय वर्षात मराठी हा स्पेशल घेतल्याने, सनावळी सोडून, आमच्या काळात संगित संशय कल्लोळातील पात्रांचा अभ्यास करावा लागला.

       इतिहास सांगण्याचं काहीच कारण नाहीये. परंतु छत्रपती संभाजी महाराजांवर ज्यांनी विषप्रयोग केला, अकबराला अर्धे राज्य देवून, त्या बदल्यात छत्रपती राजाराम महाराजांना पुढे करून, संपूर्ण राज्यकारभार स्वतःच्या म्हणजे अणाजी पंतांच्या हाती एकवटण्याचा डाव होता. अस्सं छत्रपती संभाजी मालिकेत दाखविण्यात आले आहे. त्यासाठी अणाजी पंतांनी महाराणी सोयराबाईसाहेबांना हाताशी धरून ही खेळी खेळली असल्याचेही छत्रपती संभाजी मालिकेत दाखविले आहे. अगदी त्याच मालिकेला साजेस असं दृष्य सध्या पुणे महापालिकेत दिसून आले आहे. श्रीधरपंत येवलेकरांनी स्वतःच्या स्वैर कारभारासाठी शहर अभियंता कार्यालयाचा सफाईदारपणे वापर नक्कीच सुरू केला आहे.

       श्रीधरपंत येवलेकरांनी पुणे महापालिकेतील बांधकाम विभागात लायजेनिंग एजंट म्हणून काम करणारे, ठेकेदारी काम करणारे तसेच पारंपारिक बिल्डरांच्या कार्यालयात सर्व प्रकारची पडीक कामे करणारे तसेच ज्यांना मालकापेक्षा स्वतःला मोठ्ठं व्हायचं आहे, अशा प्रकारच्या होतकरूंना हाताशी धरून, त्यांनी बांधकाम खात्यात मोठी दुकानदारी सुरू केली. यासाठी मालकापेक्षा कामगार मोठ्ठा हे सुत्र समोर ठेवून, बंडखोरी करण्यास किंवा मालकाविरूद्ध बंड करून उठणार्‍यांना मोठ्ठं करणारी छुपी यंत्रणा येवलेकरांनी मोठ्या हुशारीने उभी केली. काही भांडवलदारांना देखील हाताशी धरून, पुणे शहरातील नामांकित बिल्डरपेक्षा सर्वात मोठा बिल्डर होण्याचे मार्ग सुरू केले. पुण्यात डी.एस. कुलकर्णी पेक्षाही मोठ्ठा बिल्डर बनण्याचे स्वप्न नसले तरी त्यापेक्षाही कोटीची उड्डाणे सुरू केली.

       सांगुन पैसे खाण्यापेक्षा, पैसे खाऊन सांगण्याची, (थोडक्यात मागे पुरावा ठेवून ) त्यांची मोठी सवय आहे. पैसे खाल्लेले पुरावे देखील त्यांना मागे ठेवण्याची सवय आहे. छत्रपती संभाजी मालिकेतील आणाजी पंतांचे प्रताप प्रेक्षकांपुढे आले आहेत. आता पुणे महापालिकेतील अधिकार्‍यांचे प्रताप पुढे आणण्याचा आमचा हेतू आहे.

       पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागात येण्या पूर्वी किमान १०/१२ वर्षे पाणी पुरवठा विभागात काढली. बदलीचा अधिनियम खरं तर सीईच्या जवळच्या लोकांना कधीच नसतो म्हणतात, राज्यपालांच्या आदेशापेक्षा सीईंच्या दयाळू कृपेने ते पाणी पुरवठ्यात अनेक वर्षे राहिले. पुढे बांधकाम विभागात त्यांनी उडी मारली. प्रथम झोन १ व ७ हे दोन विभाग, नंतर खुपच बोंबाबोंब झाल्यानंतर, त्यांनी विभाग ६ मध्ये पलायन केलं. थोडक्यात सीईंच्या दया व प्रेमळ वृत्तीमुळे नियुक्ती मिळविली.

       ते एकाच खात्यात व विभागात अनेक वर्ष राहतात. येवलेकरांना बदलीचा अधिनियमच लागु नाही. कागदोपत्री पुरावा मात्र ते चोख ठेवतात. असु द्यात. असे प्रकार सध्या शासनात जोरात सुरू आहेत. पुणे महापालिकेत असल्याने दुखण्याचे काही कारण नाही. परंतु बांधकाम विभागातील क्र. १ व ७ मध्ये कार्यरत असतांना, कित्येक बांधकाम व्यावसायिकांना त्यांनी आपलसं केलं आहे. परंतु हे सर्व करीत असतांना, महाराज साहेब अर्थात शहर अभियंत्यांना अडचणीत आणता येईल किंवा त्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुढील प्रवास करता येईल एवढी शिदोरी त्यांनी स्वतःजवळ बाळगली आहे. येवलेकरांविषयी अनेकांच्या मनांत चिड आहे. दरम्यान मियॉं बीबी राजी, तो क्या करे काजी  अस्सं म्हटलं तर नवल वाटू नये. अणाजी पंत काय किंवा श्रीधरपंत. या दोघांनीही शहर आणि राज्य बुडविण्याचे कोर्सेस इतके जबरदस्त लावले आहेत व होते की, विष्णुगुप्तांना देखील या दोघांचा हेवा वाटेला असता. (क्रमशः)