Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

दरवर्षी सव्वा लाख मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित- आंबेडकर

नागपुर/दि/
दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित असून, यासाठी भाजपा आणि कॉंग्रेस आघाडी हे दोघेही दोषी आहेत अशी टीका वंचित बहुजन आघाडीचे नेते बाळासाहेब आंबेडकर यांनी पत्रकार परिषदेत केली.


बाळासाहेब आंबेडकर म्हणाले की, २००६ साली शिक्षण क्षेत्रात काम करणार्‍या विविध संघटनांनी सरकारला एक कायदा करायला भाग पाडले. तो कायदा म्हणजे, खाजगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षणाचा कायदा होय. यात एसटी, एससी, ओबीसी, व्हीजेएनटी, आदिंना विविध जागांचे आरक्षण देण्यात आले. हा कायदा एक वर्ष बरोबर चालला. नंतर सरकारने एक अधिनियम पास करून, या कायदयात ५० टक्के कपात केली.
त्यामुळे दरवर्षी १ लाख २५ हजार मागासवर्गीय विद्यार्थी उच्च शिक्षणापासून वंचित राहत आहेत. हे देशाचे मोठे नुकसान आहे. याविषयावर इतक्या वर्षात शिक्षक पदविधर मतदार संघातून निवडणून गेलेल्या एकाही आमदाराने आवाज उठविला नाही, त्यामुळे आम्ही शिक्षक व पदवीधरची निवडणूक लढवित आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.
मराठा आंदोलकांचा सरकारने विश्‍वासघात केला –
सरकारने मराठा आंदोलकांचा विश्‍वासघात केल्याचा आरोपही बाळासाहेब आंबेडकर यांनी केला. ते म्हणाले, सरकारने न्यायालयाच्या अधिन राहून जे विद्यार्थी शिकत आहेत, त्यांना फ्री शिप व स्कॉलरशिप दयायला हवी होती. पण सरकार करायला तयारच नाही.