Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

चांदणं असून कशी रात काळी – काळी, चंदनाची चोळी माझी अंग अंग जाळी, स्वारगेट पोलीस स्टेशनच्या नाकाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायावर सामाजिक सुरक्षा विभागाचा छापा

Swarget police

पुणे/दि/ प्रतिनिधी/
सध्या अनलॉकडाऊन असले स्वारगेट पोलीस स्टेशनच्या आजूबाजुचे हॉटेल्स सुरू झाले नाहीत, त्यामुळे स्वारगेट पोलीस स्टेशन जवळ चहाची कोणतीही सोय नाही. त्यामुळे स्वारगेट पोलीस स्टेशन मधील बहुतांश कर्मचारी हे चहा घेण्यासाठी ज्या लक्ष्मीनारायण चौकात येतात अगदी त्याच चौकातील शहाज कॉम्प्लेक्सच्या पहिल्या मजल्यावर आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटर या नावाने कित्येक वर्षे मसाज पार्लरच्या नावाखाली वेश्याव्यवसाय सुरू होता. पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील सामजिक सुरक्षा विभागाने छापामारी करून, ३ पिडीत मुलींची सुटका केली असून, एका इसमास अटक केले आहे.


दिव्याखाली अंधार अशी म्हण फार पूर्वीपासून प्रचलित आहे. परंतु दिव्याखाली अंधारच असतो हे आता सर्वांनाच माहिती असल्याने त्या अंधाराचा बागुलबूवा करून, आपली पोळी अशी भाजुन घ्यायची हे ज्यानं त्यांन कला अंगी बाणगली आहे. स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत वर्षानुवर्षे अवैध धंदे व महिलांचा एकुण १५ ठिकाणी मसाज पार्लरच्या नावाखाली देहव्यापार होत असल्याची तक्रार सामाजिक संघटनांनी करून देखील त्या तक्रारीकडे साफ दुर्लक्ष करण्याची जुनी परंपरा आहे. आमच्या हद्दीचे आम्हीच मालक या अविर्भावात पोलीस स्टेशनचा कारभार सुरू असतो. सध्या कोरोनाचा प्रादूर्भाव असल्याने सगळेच घाबरे- घुबरे झाले आहेत. परंतु पुण्यातील शौकिन मंडळी मात्र सगळं बासनात गुंडाळून भर चौकात, मला घ्या, मला घ्या आणि पंचात न्या अशी अवस्था झाली आहे.
त्याच असं झालं सामाजिक सुरक्षा विभागातील पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके यांना मिळालेल्या गोपनिय माहितीनुसार, स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील लक्ष्मीनारायण थिएटर चौकात आयुर्वेदा बॉडी ट्रिटमेंट सेंटर सुरू असून, त्यामध्ये वेश्याव्यवसाय सुरू आहे. याबाबत पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली आयुर्वेदिक मसाज पार्लरवर छापा टाकण्यात आला. यामध्ये ३ पिडीत मुलींची सुटका करण्यात आली आहे तर या पार्लरचा मालक दामाजी उर्फ करण मुरडे वय ३८ वर्षे याच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वरील कारवाई ही अशोक मोराळे अपर पोलीस आयुक्त गुन्हे, श्री. बच्चनसिंग पोलीस उपआयुक्त गुन्हे शाखा, पोलीस आयुक्त गुन्हे श्री. शिवाजी पवार, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक श्रीमती वैशाली चांदगुडे व पोलीस उप निरीक्षक श्रीधर खडके यांच्यासह सामाजिक सुरक्षा विभागाकडील पो.ना. आण्णा माने, अश्‍विनी केकाण, मनिषा पुकाळे, संतोष भांडवलकर, हनुमंत कांबळे व गायकवाड यांनी केली आहे.