Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

गृहमंत्रालयाकडून पोलीस दलातील बदल्यांचे घाऊक आदेश

झोन क्र. १ वर ठाणे शहराच्या उपायुक्त प्रियंका नारनवरे तर झोन क्र. ४ वर वाहतुक शाखेचे पंकज देशमुख, स्वप्ना गोरे प्रतिक्षेत

पुणे/दि/ प्रतिनिधी/
राज्याच्या गृह मंत्रालयाने पोलीस दलातील उपायुक्त, अधीक्षक व सहायक पोलीस आयुक्त संवर्गातील अधिकार्‍यांचे बदल्यांचे आदेश काढण्यात आले आहेत. कोरोना साथ रोगामुळे यावर्षी बदल्या करणार नाही असं सांगितल्याच्या दुसर्‍याच्या महिन्यापासून राज्यातील एका एका खात्यांच्या बदल्यांचे आदेश काढले जात आहेत. पोलीस दलात नियुक्तीसाठी जे अधिकारी प्रतिक्षेत आहेत, त्यांना कुठेही नियुक्ती न देता, आहे त्या पदावरील अधिकार्‍यांची एका ठिकाणाहून दुसर्‍या ठिकाणी बदली आदेश काढले जात आहेत.


एमपीएससी मार्फत परिक्षा उत्तीण झालेल्या कित्येकांना मागील दोन ते तीन वर्षांपासून नियुक्त्या देण्यात आलेल्या नाहीत. उपायुक्त दर्जाच्या अधिकार्‍यांना देखील वर्षानुवर्षे प्रतिक्षेत ठेवण्यात येत आहे. त्यामुळे राज्यात ज्या प्रकारचे राज्यकर्ते येतील त्याच प्रकारे नियुक्तीचा खेळ खेळला जात असल्याचे दिसून येत आहे. पुण्यातून पोलीस उपायुक्त परिमंडळ एकच्या उपायुक्त स्वप्ना गोरे यांची बदली करण्यात आली असली तरी त्यांना नवीन जागी नियुक्ती देण्यात आली नाही. त्यांना प्रतिक्षेत ठेवण्यात आले आहे. थोडक्यात राज्यकर्ते जे म्हणतील तेच करायचे, कायदयात काय नमूद आहे ते करायचेच नाही, जर तसे केले तर मग प्रतिक्षा आणि उपेक्षा ह्या ठरलेल्या आहेतच. याच राजकीय अभिनिवेशामुळे सामाजिक कार्यकर्त्यांवर गुन्हे दाखल का होतात त्याच हे मुख्य कारण आहे. थैलीशाही हे कारण असू शकते, पण अकारण सामाजिक कार्यकर्त्यांना गुन्हे का दाखल होतात त्यांचही हेच कारण असण्याची शक्यता आहे.
पोलीस आयुक्तांवर दबाव असेल तर उपायुक्त, अधीक्षक व सहा आयुक्तांवर किती दबाव असू शकतो
पुणे शहराचे नुतन पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी पोलीस आयुक्तालयाचा पदभार स्वीकारल्यानंतर, लगेचच शहरातील गुन्हेगारी मोडीत काढण्याबाबतचे सुतोवाच केले. तसेच कोरोनामुळे बेरोजगारीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. त्यातुनच गुन्हेगारीच्या घटना वाढत आहेत ही सत्य परिस्थिती त्यांनी मांडल्यानंतर, लगेचच राज्यकर्त्यांकडुन कायदा आणि सुव्यवस्था राखणार्‍या अधिकार्‍यांनी अशा प्रकारची वक्तव्य करू नयेत असे जाहीर फर्मान बाहेर काढले जाते.
दरम्यान पोलीस आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच आठवड्यात पुणे शहरातील बहुतांश पोलीस स्टेशनने, त्यांच्या हद्दीतील खुन, घरफोडीतील अनेक गुन्हेगारांना जेरबंद केल्याचे वृत्तही पोलीस आयुक्तालयानेच दिले आहे. कायदा आणि सुव्यवस्था सांभाळत असतांना उपायुक्त, अधीक्षक व सहा आयुक्तांवर किती दबाव असू शकतो अशी सर्वसामान्य पुणेकरांच्या मनांत शंका निर्माण होते.
शुक्रवारी उपायुक्त, अधीक्षक व सहा आयुक्तांच्या बदलीचे आदेश जारी केले आहेत. पुणे शहरा बाहेरील चार अधिकार्‍यांना पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पदभार देण्यात आलेला आहे. १. ठाणे शहर उपायुक्त प्रियंका नारनवरे यांची नियुक्ती पोलीस उपायुक्त परिमंडळ एक या जागी करण्यात आली आहे. २. पुणे शहर परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त राहुल श्रीरामे यांची नियुक्ती पुणे शहर वाहतुक विभागाच्या पोलीस उपायुक्तपदी करण्यात आली आहे. ३. प्रकाश गायकवाड पोलीस अधीक्षक गुन्हे अन्वेषण पुणे यांची बदली अपर पोलीस अधीक्षक पालघर येथे करण्यात आली आहे. ४. पंकज देशमुख पोलीस उपायुक्त वाहतुक शाखा यांची बदली पोलीस उपायुक्त परिमंडळ चार येथे करण्यात आली आहे. ५. सुहास नाडगौडा (पोलीस उप अधीक्षक ते महामार्ग सुरक्षा पथक नागपुर ते अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंधक विभाग पुणे) ६. सुरज गुरव (सहायक पोलीस आयुक्त नागपुर ते अपर पोलीस अधीक्षक लाचलुचपत प्रतिबंध विभाग पुणे) ७. संजय पाटील ( पोलीस उप अधीक्षक जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती भंडारा ते अपर उपायुक्त राज्य गुप्तवार्ता विभाग पुणे) येथे बदली करण्यात आली आहे.
दरम्यान राज्यातील पोलीस विभागातील बदल्यांचे आदेश जारी केले असले तरी पदोन्नतीबाबत देखील तातडीने निर्णय घेवून, जे नियुक्तीच्या प्रतिक्षेत आहेत, त्यांना देखील नियुक्ती आदेश व्हावा अशी अनेकांची मागणी असल्याचे समजते.