Tuesday, July 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

गुन्हे शाखेकडून पुण्यातील कुंटणखान्यावर रट्टा,१४ जणींची सुटका

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       पुण्यातील रेड लाईट एरिया म्हणून ओळखल्या जाणार्‍या बुधवार पेठेतील कुंटणखान्यावर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली रट्टा मारून वेश्या व्यवसायाकरीता प्रवृत्त केल्याप्रकरणी कुंटनखाना मालकींनीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिवाय नेपाळ, बांग्लादेशातील तरूणींसह चौदा जणाना ताब्यात घेण्यात आले आहे.

       बुधवार पेठेतील कुंटणखाना चालक काजल गोरे तमांग वय ५२ रा. डायमंड बिल्डींग, बुधवार पेठ पुणे मुळ रा. नेपाळ हीला अटक करण्यात आली आहे. पोलीसांकडून या प्रकरणांत ४/५ कुंटणखाना चालक महिलांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

       बुधवार पेठेतील ताजमहाल बिल्डींग, डायमंड बिल्डींग या इमारतीमधील कंटणखान्यात परराज्यातील तरूणींना डांबून त्यांना वेश्याव्यवसाय करण्यास प्रवृत्त केले जात असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. गुन्हे शाखेने कुंटणखान्यावर छापे टाकुन, या कारवाईत दोन नेपाळमधील चार तरूणींसोबत चौदा जणींची सुटका करण्यात आली. न्यायालयाच्या आदेशाने त्यांना निरीक्षणगृहात ठेवण्यात आले आहे. ही कारवाई गुन्हे शाखेचे उपायुक्त बच्चनसिंह यांच्या मार्गदर्शनाखाली व पोलीस निरीक्षक वैशाली चांदगुडे आणि पथकाने केली आहे.