Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

कमला नेहरू जवळील शारदा स्वीटहोम मधील सामोसा- कचोरीच्या चटणीत आढळला शिजलेला उंदीर

पुणे/दि/

                सामान्यपणे सणांच्या काळात खवा-मावा आणि मिठाईची मागणी वाढते. त्यानुसार आता  गणेशोत्सव सुरू असून त्यानंतर नवरात्र, दसरा आणि मग दिवाळी असे सण ओळीत येणार नि खवा-मावा, मिठाईची मागणी आणखी वाढणार. पण या वाढत्या मागणीचाच फायदा घेत भेसळखोरही या काळात सक्रीय होतात. त्यामुळेच दरवर्षी खवा, मावा, मिठाई, दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसह इतर अन्नपदार्थांमधील भेसळीचे प्रमाण वाढते. म्हणूनच सणासुदीच्या काळात असे पदार्थ खरेदी करताना काळजी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

                पुण्यात मागील आठवड्यात साडेतीन हजार किलो भेसळयुक्त खवा पुणे शहर गुन्हे शाखा व अन्न व औषधण प्रशासनाच्या मदतीने जप्त करण्यात आला आहे. भावेश पटेल (रा. अहमदाबाद) याच्यासह तीन ट्रॅव्हल्स चालकांना पुढील कारवाईसाठी सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

                 दरम्यान खवा-मावा हा विशेषत शेजारच्या गुजरातसारख्या राज्यातून मोठ्या प्रमाणात पुण्या-मुंबईसह राज्यात आयात केला जातो. त्यामुळे बाहेरून येणार्‍या खवा-माव्यावर विशेष लक्ष ठेवण्याची जाबाबदारी एफडीएची असतांना देखील अधिकार्‍यांकडून निव्वळ पत्रकबाजीशिवाय काहीच केले जात नाहीये.  खरं पुण्यातील मिठाई आणि दुधाच्या दुकानांवरही करडी नजर ठेवून, मिठाई-दुधाच्या दुकांनांची, खवा-माव्याच्या गोदामांची तपासणी करणे आवश्यक आहे. तथापी एफडीएचे अधिकारी व कर्मचार्‍यांकडून नामधारी कारवाई होत असल्याने पुण्यासह राज्यात मोठ्या प्रमाणात भेसळयुक्त खव्याची आयात होत आहे.

                त्यामुळे पुणेकरांनी गणेशोत्सव काळात घरातील गणपती व सार्वजनिक गणपतीं साठी प्रसाद स्वतःच तयार करावा तसेच तांदूळ व गव्हापासून प्रसाद तयार करावेत. सध्या पुण्यातील बहुतांश मिठाईच्या दुकानातून भेसळयुक्त खव्यापासून वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये मोदक, बर्फी व पेढे तयार केले जात आहेत. अशा प्रकारच्या भेसळयुक्त खव्यामुळे विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे अन्न व औषध प्रशासनाच्या परिपत्रकात नमूद केले आहे. त्यामुळे अशा प्रकारचा प्रसाद स्वतःच तयार करून खव्यापासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

कमला नेहरू हॉस्पीटल जवळील शारदा स्वीटहोम मधील सामोसा- कचोरीच्या चटणीत आढळला शिजलेला उंदीर – मालक फरार, कॅमेर्‍यापुढे बोलण्यास नकार

                दरम्यान पुण्यातील प्रसिद्ध अशा कमला नेहरू हॉस्पीटल या पुणे महापालिकेच्या मालकीच्या हॉस्पीटल जवळ असलेल्या शारदा स्वीट होम या दुकानात सामोसा- कचोरीसाठी तयार केलेल्या पातळ सॉस मध्ये शिजलेला उंदीर आढळुन आल्याने एकच खळबळ माजली आहे. परवा गणेश मुर्तीची स्थापना करण्यासाठी अनेक मंडळांनी वाजत-गाजत श्रींची मिरवणूक काढली. मिरवणूकी दरम्यान मिरवणूकीतील भक्तांसाठी २०० सामोशांची ऑर्डर देण्यात आली. याच सामोसा- कचोरीत उंदीर असल्याचे आढळल्याने कित्येकांनी हे सामोसे फेकुन दिले.

                याबाबत शारदा स्वीट होमच्या मालकांकडे न्यूज नाईन मराठी व न्यूज २४ इंडिया या वृत्तवाहिनीच्या प्रतिनिधींने संपर्क केला असता, ते पुणे महापालिकेत गेले असल्याचे सांगण्यात आले. रात्री उशिरापर्यंत ते उपलब्ध झाले नाहीत. तथापी शारदा स्वीट होम मध्ये मिठाई तयार करत असल्याचे चित्रण केले असून, सर्वत्र घाण व दलदलीत ही मिठाई तयार करण्यात येत असल्याचे दिसून आले आहे. याबाबत कोणत्याही पोलीस ठाण्यात तक्रार वा गुन्हा दाखल झाल्याची माहिती उपलब्ध होवू शकली नाही.