Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

आंबेडकर नगराला गुन्हेगार बनविण्याचा मा. यार्ड पोलीसांचा संकल्प न्यायालयाने निर्दोष केलेल्यांना माघाहून १४९ व आता तर १०७ करण्याचा प्रयत्नपूर्वक महासंकल्प –

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       महाराष्ट्र पोलीस दलाकडून आलेल्या सूचनेनुसार, पुणे शहर पोलीसांचे ध्येय आहे की, पुणे शहरातील कायदा व सुव्यवस्था टिकविणे, सज्जनांना सुरक्षा व दुर्जनांना कायद्याव्दारे स्थापित नियमानुसार दंडीत करणे, महिला व मुलींची सुरक्षा करणे, गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन अशा प्रकारचे ध्येय ठेवण्यात आले आहे. परंतु पुणे शहर पोलीस दलातील काही पोलीस स्टेशन ही स्वतःला पोलीस महासंचालक दर्जाची समजु लागली आहे. नशिबाच्या थैलीने पोलीस स्टेशन मिळालेल्यांना, आभाळ देखील एक बोट ठेंगणं वाटू लागलं आहे. जे मिळालं आहे, ते टिकवुन ठेवण्यासाठी पोलीस दलाचे ध्येय साकारणे आवश्यक आहे की, गुन्हेगारांना गोंजारून, त्यांचे लांगुन चालन करून, यांची खुर्ची टिकतेय की अशी आजची मार्केटयार्ड पोलीस स्टेशनची परिस्थिती निर्माण झाली आहे. हद्दीतील अवैध कृत्य करणारे उजळ माथ्याने फिरत आहेत, तर सर्वसामान्य नागरीक व महिला, पोलीसांच्या असुरी इच्छेपाई भीतीने पळ काढत आहेत. एखाद्याने सुपारी दिलीच तर नेमकं कुणाला पोलीस स्टेशनमध्ये बोलवावं याची काही परंपरा आहे. परंतु इथ तर सात दिवसाच्या ओल्या बाळंतीन बाईला देखील मार्केटयार्ड पोलीस सोडत नाहीत, यासारखी दुसरी दुर्देवाची बाब नाही.

       भयमुक्त व गुन्हेगारीमुक्त राज्याचे स्वप्न, भाजपा सेना सरकारने साकारण्याचा संकल्प केला. परंतु पारंपारीक कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या कारभारात पारंगत झालेल्यांना आजही इथला दलित, आदिवासी, मुस्लिम वा तमाम इथल्या बहुजन वर्गाला दर दिवशी कोणत्या ना कोणत्या गुन्ह्यात अडकाविण्याचे प्रयत्न होत होते व संकल्पपूर्वक अडविले जातही आहे. हे सध्या सत्ताधारी असलेल्या पक्षाला कितीस माहिती आहे, याची खानेसुमारी झाली नसली तरी सत्ताधारी भाजपा सेनेला देखील पारंपारीक दोन्हीकॉंग्रेसी थाटाचा कारभार करण्याची हौस काही सुटत नसल्याचे दिसून येत आहे.  जिथं जिथं आर्थिक उन्नतीचे मार्ग  असतात, तिथं तिथं कावेबाजपणे ही मंडळी मांड-ठोकून बसलेली असतात. कृषी उत्पन्न बाजार समितीवर सध्या गुन्हेगारांचे साम्राज्य पसरलं आहे. त्यांना मुजरा वा कुर्निसात केल्याशिवाय कुणीही प्रवेश करू शकत नाहीत अशी आजची परिस्थिती आहे.

       मागील सप्ताहात नमूद केल्यानुसार, १. पिंटूसिंग दुधानी, २.महेश गायकवाड, ३.आरबाज बागवान व ४.सचिन मंडलिक या बहुजन समाजातील अंहमेहनती कष्टकरी कामगारांसहीत सुमारे ५० ते ६० कामगारांना बाजार पेठेतून या ना त्या कारणाने हटविण्यात आले आहे. बाजारात अंगमेहनती कामे करण्यासाठी आल्यानंतर त्यांच्यावर खोटीनाटे मोघम स्वरूपाखे अर्ज पोलीसांकडे कडून, पोलीसांव्दारे ना ना तर्‍हेचे गुन्हे पदरी टाकून यांची रवानगी इतरत्र केली जाते व आहे. आत्ता देखील मार्केटयार्डातील  १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे यांनी मोघम स्वरूपाचे अर्ज केल आहेत. त्यांच्या अर्जानुसार वरील चारही कामगारांना मार्केटयार्ड पोलीसांनी कोणतेही संयुक्तीक कारण वा प्रकरण नसतांना, त्यांना भादवी १४९ ची नोटीस दिली आहे. एवढं करूनही मार्केटयार्ड पोलीस थांबले नाहीत. त्यांनी आता वरील चारही कामगार युवकांवर १०७ नुसार कारवाई करणार असल्याचे सांगण्यात आले आहे.

       खरं तर १. विजय यशवंत वायदंडे २. बाळा यशवंत वायदंडे ३. अतुल शिवाजी शिंदे यांच्याविरूद्ध मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे भा.द. वी. ३०७ व ३४ अ तसेच ५०४ व ५०६ नुसार गुन्हे दाखल आहेत.तसेच शिवाजीनगर न्यायालयातील मे. गोसावी कोर्ट येथे केस क्र. ४४५/१८ नुसार कोर्ट केस सुरू आहे. तसेच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजि. नं. २४०/१७  नमूद आहे. तरी देखील १. पिंटूसिंग दुधानी, २.महेश गायकवाड, ३.आरबाज बागवान व ४.सचिन मंडलिक या बहुजन समाजातील अंहमेहनती कष्टकरी कामगारांना कसुरदार ठरवुन त्यांच्याविरूद्ध १०७ नुसार कारवाई करणार असल्याचे मार्केटयार्ड पोलीसांनी या बेरोजगार युवकांना पोलीस ठाण्यात बोलावून सांगितले आहे. म्हणजे न्याय मागणार्‍यांना दंडाधिकार्‍यांचा दंडा आणि खंडणीखोरांना पोलीसांची पॉलिसी. हा कसला न्याय. मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हे तर बहुजन समाजाला गुन्हेगार बनविणारा कारखाना आहे की काय अशी शंका येते.

       मार्केटयार्डातील पोलीस हे कुणाच्या सांगण्यावरून गैरकृत्य करीत आहेत, कोणते व्यापारी, कोणती संघटना, कोणता राजकीय भांडवलदार आहे हे यापुढील काळात स्पष्ट तर होणाच आहे. परंतु ज्या मार्केटयार्ड पोलीस स्टेशनने ज्या बेकसुरदारांना कसुदार व गुन्हेगार बेकायदा ठरविले. त्यांच्यावर गुन्हेगाराचा जबरी शिक्का मारला त्या त्या सर्वांची माहिती यापुढील अंकातून प्रसिद्ध केली जाणार आहे. जे जे बाजारपेठेत अंगमेहनती व काबाडकष्ट करीत होते, त्यांच्यावर जबरी गुन्हेगार म्हणून शिक्का मारण्यात आला आहे. मग याच मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हद्दीत  स्वतःच्या खाकीच्या बळावर जे ९ ते ११ गैरउद्योग चालवित आहे, त्याच्या ९ ते ११ गैरधंद्यावर काम करणार्‍यांवर अशा प्रकारची कारवाई का केली जात नाहीये. म्हणजे खंडणीखोर, गैरधंदा, बेकायदा कृत्य करणारे मार्केटयार्ड पोलीस स्टेशनसाठी दैवत आणि कायदयाचं पालन करणारे आदमखोर ही संकल्पना नव्या पोलीस आयुक्तांची आहे की, नव्या पोलीस उपायुक्तांची. की पोलीस ठाण्याची. प्रश्‍न अनेक आहेत. आता पोलीस नव्याने किती जणांना जबरी गुन्हेगार करणार आहेत, त्याच मागावर सध्या आम्ही आहोत. आज संपूर्ण आंबेडकरनगराला जबरी गुन्हेगार असल्याचा शिक्का मार्केटयार्ड पोलीस स्टेशनने मारला आहे. (क्रमशः)