Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

सरकार विरोधात द्रोह करणार्‍या त्या पोलिसांना मोक्का खाली अटक करा, अन्यथा धरणे आंदोलन करू – बाळासाहेब आंबेडकर

balasaheb ambedkar

पुणे/दि/प्रतिनिधी/
सरकारविरोधात द्रोह करणार्‍या पोलीस अधिकार्‍यांना मोक्का तसेच एन आय ए अंतर्गत अटक झाली पाहीजे ही आमची मागणी असून गृहमंत्री अनिल देशमुख यांनी द्रोह करणार्‍या त्या पोलीस अधिकार्‍यांची नावे जाहीर करावी, अन्यथा त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल, असा इशारा वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे.
एका वेबसाईडला मुलाखत देताना राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी सांगितले की राज्यातील काही आयपीएस अधिकारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे सरकार पाडण्यासाठी प्रयत्नशील होते. त्यांचा हा प्रयत्न हाणून पाडला असल्याचा त्यांनी धक्कादायक खुलासा केला आहे. राज्याच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या सत्ताधारी पक्षाला पाडण्याचा प्रयत्न पोलीस अधिकार्‍यांमार्फत केला जात होता. अशाप्रकारे सरकार विरोधात द्रोह करणार्‍या अधिकार्‍यांना मोक्का एन आय ए अंतर्गत अटक करण्यात यावी, अशी मागणी वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब आंबेडकर यांनी केली आहे. त्याचबरोबर या अधिकार्‍यांचे नावे जाहीर करण्यात यावी, गृहमंत्री अनिल देशमुख यांनी नावे जाहीर केली नाही तर त्यांच्या कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येईल येईल असा इशारा ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी दिला आहे. या द्रोह करणार्‍या अधिकार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे. आता अनिल देशमुख यांच्या कोर्टात चेंडू असून त्यांनी निर्णय घ्यायचा आहे. असेही शेवटी ऍड. बाळासाहेब आंबेडकर यांनी नमूद केले आहे.