Thursday, January 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बिबवेवाडीत बेकायदा मंदिर व बेकायदा बांधकामांना संरक्षण दिल्या प्रकरणी अभियंता राखी चौधरी यांना पुणे महापालिकेतून बडतर्फ करण्याची मागणी

unligal mandir pmc

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील बहुतांश सर्व पेठांमध्ये भगवान शंकर, गणपती व मारूतीची अनेक मंदिर आहेत. सोमवार मंगळवार कसब्यात तर जागोजाग शिवमंदिर शिवलिंग आहेत. त्यातील काही समाधीस्थळ आहेत. मारूतीची तर प्रत्येक ठिकाणी मंदिर आहेत. गणपतीसह विविध देवी देवतांची मंदिर आहेत. जुन्या काळातील मस्जिद व दर्गा आहेत. परंतु १९९० नंतर जागतिकीकरणानंतर देवी देवतांचे अधिक महत्व वाढले. त्यामुळे पुण्यातील पूर्वी अस्तित्वात असलेल्या मंदिर – मस्जिदची संख्या पाच हजार पटींनी वाढली. पुण्यातील सोमवार, मंगळवार व रास्तापेठेत जुन्या वाहनांची खरेदी विक्री केली जाते. त्यामुळे त्यांच्या धंद्यासाठी रस्त्यावरच साईबाबा, स्वामी समर्थ व गजानन महाराज व गणपतीची मंदिर उभी करण्यात आली.

पुण्यातील ५०० ते ६०० झोपडपट्यांमध्ये तर एका एका गल्ली बोळात विविध देवी देवतांची मंदिर, मस्जिद व इतर धर्मियांची प्रार्थनास्थळे वाहतुकीला जाणिवपूर्वक अडथळे करण्यासाठी उभी केली आहेत असा भास व्हावा या पद्धतीने निर्मिती केली असल्याचे दिसते. पुण्यातील सर्व पेठांमध्ये व झोपडपट्या व चाळीमध्ये प्रार्थनास्थळे उभारण्याची ही रस्सेखेच सुरू आहे.
न्यायालय, राज्य शासनाकडून बेकायदा मंदिर हटविण्याचे आदेश –
दरम्यान संपूर्ण राज्यातच बेकायदा धार्मिक स्थळे काढुन टाकण्याचे निर्देश न्यायालयाने राज्य शासनाला दिले आहेत. पुण्यातील बहुतांश पोलीस ठाण्याने त्यांच्या त्यांच्या हद्दीतील बेकायदा मंदिरांची यादी देखील तयार केली आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार काही ठिकाणी कारवाई केली परंतु कारवाई संथ गतीने सुरू आहे.
बेकायदा धार्मिक स्थळं उभारण्याचे काम युद्धपातळीवर पुण्यात सुरू आहे. पुणे महापालिका व पोलीस आयुक्तालय पुणे शहर यांनी धार्मिक स्थळ निर्मितीवर प्रतिबंध घालण्याएैवजी त्याला बळ देण्याचे काम सुरू ठेवले आहे.
राखी चौधरी यांच्याकडून जाणिवपूर्वक बेकायदा मंदिर उभारणीत साथ संगनमत –
बिबवेवाडीत बेकायदा बांधकामांना ऊत आला आहे. डोंगर माथा व डोंगर उतारावर प्रचंड बेसुमार बांधकामे झाली आहेत. तरी देखील त्यांच्यावर कारवाई केली जात नसल्याचे दिसून येत आहे. बेकायदा बांधकामे करीत असतांना, समोरच्यांना अधिक त्रास व्हावा किंवा इतर वाईट हेतूने काही धार्मिक स्थळ उभी करण्यात आली आहेत. बिबवेवाडी जागडे चाळ येथे किसन आगरवाल नामक इसमाने बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळावे या हेतूने मंदिर उभे केले आहे. याबाबत तक्रार केल्यानेतर, बांधकाम विकास विभागाच्या राखी चौधरी यांनी या बांधकामाला नोटीस दिली, परंतु बांधकामे सुरळीत पार पाडण्यात मदत केली असल्याचे दिसून आले आहे. आज त्या ठिकाणी मंदिर उभे करून मुर्तीची प्रतिष्ठापणा केली आहे.
बिबवेवाडी येथे रस्त्याच्या वादाला व बेकायदा बांधकामांना संरक्षण मिळावे यासाठी स्वतःच्या स्वार्थासाठी धार्मिक वळण देण्यासाठी हा प्रकार केला असल्याचे स्थानिक नागरीकांकडून सांगण्यात येत आहे. फेब्रवारीत नोटीस दिल्यानंतर पोलीसांच्या मदतीने ते काढुन टाकणे आवश्यक असतांना देखील त्याला प्रतिबंध राखी चौधरी यांनी केला नाही. त्यामुळे राखी चौधरी यांनी उच्च न्यायालय, राज्य शासन व राज्यपालांच्या आदेशाचा अपमान केला असून, राखी चौधरी यांना याबाबत पुणे महापालिका आयुक्तालयाने कठोर कारवाई करून, राज्य शासनाच्या आदेशाची प्रामाणिकपणे अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. (क्रमशः)
पुढील अंकात
होळी पुनवेला झुंबड उठली- ठिगणी भिडली ठिणगीला, स्थळ काळाचं भान राहिना- तुर्‍या संगती कलगीला
अनुरेखक संतोष शिंदेला झोन ५ चा घरजावई करून घेतलाय की काय…

  • १) किसन आगरवाल व श्रीनिवास बुड्डू यांच्या बेकायदा बांधकामांवर कारवाई करण्यात एवढी कसुर कशासाठी …
    २) कार्यकारी अभियंता सौ शिंदे व उपअभियंता श्री. मचाले यांनी आदेश देवून देखील पोलीस विभागाला संरक्षण विषयक पत्र देण्यास विलंब लावुन कारवाई का टाळली जात आहे.
    ३) बांधकाम विकास विभागाने संतोष शिंदे या अनुरेखकाला झोन क्र. ५ चा घरजावई म्हणून धोषित केले आहे काय… बदली का नाही….बहुतांश कारवाई थांबविण्यात शिंदेचा नेमका वाटा किती…. झोन ५ मधील शिंदे म्हणजे विठाबाई व काळुबाळू तमाशा फडातील अव्वल दर्जाचा नकलाकार….