Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

बनावट पीएसडी व बोगस कामे करणार्‍या ठेकेदाराची देयक काढण्याचा आदेश सा.बां.मंडळींनी दिलाय?

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्याच्या सा.बां. खात्यातील निविदा कामांचे टेंडर भरत असतांना, बनावट व बोगस पीएसडी सादर करून, शासनाची फसवणूक करणार्‍या ठेकेदारावर बंडगार्डन पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. अद्याप पावेतो अटक केली नसली तरी पुण्याच्या सा.बां. नियमावलीनुसार, फसवणूक करणार्‍या ठेकेदारावर काळ्या यादीत टाकण्याची शिक्षा दिल्याचे तोंडी सांगण्यात येत आहे. दरम्यान ठेकेदाराने बोगस कामे दाखवुन ज्या प्रकारे बील सादर करून देयक काढली जात आहेत, त्यावरून, बनावट व बोगस कामे आणि पीएसडी सादर करणार्‍याची देयक काढण्याचा आदेश अधीक्षक अभियंत्यांनी दिला आहे काय अशी प्रश्‍नावली दस्तुरखुद्द पुण्यात विचारली जात आहे.


पुण्याच्या सा.बां विभागात १० लाखापासून ते २ दोन कोटीपर्यंतची निविदा कामे २० टक्के बिलो, ३० टक्के बिलो या दराने भरून, निविदा कामांच्या वर्कऑर्डर पदरात पाडून, पुन्हा कामे विहीत वेळेत झाल्याचे मोजमापाचे पुस्तक तयार करून, थेट बील सादर केली आहेत. आज त्याच्या काळ्या कर्तूत्वाची माहिती झाल्यानंतर, खडबडुन जागे झालेल्या सा.बां. मंडळींनी संबधित ठेकेदारावर कारवाई केली असली तरी त्याची देयक धडाधड काढली जात आहेत. मग ही कारवाई की देयक काढण्याची कार्यवाही सुरू आहे असाही प्रश्‍न उभा राहत आहे. संबंधित काळ्या यादीत टाकण्यात आलेला ठेकेदार व पुणे मंडळाचे अधीक्षक अभियंता हे एकाच जिल्हा,गाव व विभागातील असल्यामुळे आपल्या गावाकडचा माणूस म्हणून त्य ठेकेदाराची कारकीर्द सुरू केली. अतुल चव्हाण पुणे सा.बा. विभागात असल्यापासून संबंधित ठेकेदाराला कामे दिली जात आहेत, ती कामे देण्याची परंपरा आजही सुरू आहे. ई टेंडरींग असले तरी ती कामे एकाच विशिष्ठ ठेकेदाराला कशी मिळतात हा देखील एक संशोधनाचा विषय आहे.
या सर्व कारणांमुळे पुणे सा.बा. मंडळाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अधिक माहिती घेण्याचे काम सुरू आहे. पुण्याच्या कार्यालयातून या सप्ताहात तरी माहितीचं गोठोडं मिळणार असल्याची शक्यता आहे, त्यामुळे या सर्व प्रकरणांशी निगडीत असल्या ठेकेदारांची नावे यापुढील काळात जनपटलावर मांडण्याचा प्रयत्न आहे.