Wednesday, January 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

खडकीतील मटका किंग बबलु नायरच्या अड्ड्यावर पोलीसांची धाड— खडकी पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर होता धंदा,

पोलीस उपायुक्त परिमंडळ एक यांच्या र्रफ् कारवाईत अडीज लाख रुपये रोख,

४५ मोबाईल जप्त तर ६३ जणांना अटक

पुणे/दि/ प्रतिनिधी/

       खडकी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर बललु नायर याचा जुगाराचा मोठा अड्डा सुरू असल्याची माहिती, पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांना समजल्यानंतर, त्यांनी तत्काळ परिमंडळ एकच्या पोलीस उपायुक्त सप्ना गोरे यांना सदर ठिकाणी तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले. स्वप्ना गोरे यांनी देखील परिमंडळ एक मधील संपूर्ण पोलीस कर्मचारी वर्ग व फरासखान्यातील काही अधिकार्‍यांना बरोबर घेवून खडकी येथे कारवाई करण्यात आली. या कारवाईत अडीज लाख रुपये रोख, ४५ मोबाईल सह ६३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

       बबलु नायर याचा धंदा, पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर  रेल्वे स्टेशनजवळ सुरू होता. मटका किंग ही बिरूदावली मिरविणार्‍या बबलू नायर याचा हा अड्डा असल्याने तो निर्वेधपणे सुरू होता. या अड्ड्यावर जेंव्हा पोलीसांनी छापा टाकला असता, कारवाईसाठी आलेले पोलीस थोडावेळ चक्रावून गेले. एकाच वेळी या अड्डयावर शेकडो लोक जुगार खेळत होते.

       तसेच  शेकडो लोक एकाच वेळी कल्याण मटका लावण्यासाठी रांगा लावुन थांबले असल्याचे दिसून आले. या ठिकाणी मटक्यासह तीन पत्ती, रम्मीवर पैसे लावुन खेळत असल्याचेही दिसून आले.

       खडकी पोलीस स्टेशनपासून हाकेच्या अंतरावर हा धंदा म्हणजे, पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या नाकावर टिच्चुन हा धंदा सुरू असल्याचे दिसून आले आहे.

       स्थानिक पोलीस पूर्णपणे मॅनेज असल्यानेच बबलु नायर याच्यावर कारवाई झाली नव्हती. त्यामुळे पोलीस आयुक्त डॉ. के व्यंकटेशम यांनी या प्रकरणात स्थानिक पोलीस किंवा उपायुक्तांना जवळ न करता, परिमंडळ एकच्या उपायुक्त स्वप्ना गोरे यांना कारवाईसाठी पाठविण्यात आले.

       पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे यांनी त्यांच्याकडील पोलीस उपनिरीक्षक सूर्यवंशी, हवालदार सचिन इनामदार, पोलीस नाईक ज्ञानेश्‍वर पालवे, जगदाळे, शिपाई गायकवाड साळुंके, देशमुख भोकरे यांच्यासह फरासखान्यातील काही अधिकार्‍यांना बरोबर घेतले होते.

       या सर्वांनी केलेल्या कारवाईत बललु नायर याच्या अवैध धंद्यावर २ लाख २९ हजार १३ रुपयांची रोकडे, ४५ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. शिवाय नोटा मोजण्याचे मशिनसह ६३ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.