
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
काळेपडळ पोलीस स्टेशन हद्दीतील तरवडेवस्ती महंमदवाडी हडपसर येथील बंद घराचे दरवाजाचा कोयंडा तोडुन कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे घरी सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असे सुमारे चार लाख रुपयांचा मुद्देमाल चोरी केला होता. काळेपडळ पोलीस स्टेशन येथे तक्रार दिल्याने घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
काळेपडळ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक, श्री. मानसिंग पाटील व तपासी अधिकारी पोलीस उप निरीक्षक विनायक गुरव यांनी तात्काळ काळेपडळ पोलीस ठाणे तपास पथकास तपासाचे आदेश दिले होते. त्यानुसार पोलीस अंमलदार प्रतिक लाहिगुडे यांनी तांत्रिक तपास करुन आणि पोलीस अंमलदार अतुल पंधरकर व गिरीराज जगदाळे यांनी हद्दीतील गोपनीय बातमीदारामार्फत आरोपींबाबत माहिती मिळवली.
त्यानुसार सापळा लावुन वैभव ऊर्फ बाब्या संजय गायकवाड वय 19 वर्षे व प्रशांत ऊर्फ चिक्या भारत कसबे वय 19 वर्षे (रा. दोघे साठेनगर तरवडे वस्ती पुणे) यांना शिताफीने ताब्यात घेण्यात आले.
सुरवातीस आरोपींनी उडवा उडवीची उत्तरे दिली नंतर त्यांचेकडे कसुन चौकशी करता त्यांनी गुन्हा केल्याची कबुली दिली असुन त्यांचेकडुन चोरी झालेले 15.1 ग्रॅम वजनाचे सोन्याचे दागिने अंदाजे किं 2 लाख 18 हजार 890/-चोरी झालेले 220.6 ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने अंदाजे किं 61हजार 740/-, ओपो कंपनीचा मोबाईल कि रु 3000/-असे एकुण 2 लाख 83 हजार 630/- रुपयांची चोरी झालेला मुद्देमाल हस्तगत करण्यात आलेला आहे. पोलीस उप निरीक्षक गुरव अधिक तपास करीत आहे.
ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री मानसिंग पाटील, काळेपडळ पोलीस स्टेशन यांचे सुचनेप्रमाणे स.पो.नि. अमित शेटे, पो.उप.नि विनायक गुरव, पोलीस हवालदार प्रविण काळभोर, प्रतिक लाहिगुडे, दाऊद सय्यद, पंकज गाडे पोलीस अंमलदार अतुल पंधरकर, शाहिद शेख, विशाल ठोंबरे, लक्ष्मण काळे, महादेव शिंदे, नितीन ढोले, प्रदिप बेडिस्कर, सदाम तांबोळी, गिरीराज जगदाळे, अमोल जाधव यांचे पथकाने करुन प्रशंसनीय कामगिरी केली.
