
नॅशनल फोरम/पुणे/दि/ श्रीनाथ चव्हाण/
धनकवडी क्षेत्रिय कार्यालय व सहकारनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील तळजाई पठारावर ड्रायव्हींग स्कुलच्या ट्रेनिंग मुळे विद्यार्थी व ज्येष्ठ नागरीकांच्या जीविताला अक्षरशः धोका निर्माण झालेला असून, नागरीकांनी पोलीसांना वारंवार कळवुन देखील पोलीस त्याकडे साफ दुर्लक्ष करीत असल्यामुळे दाद मागायची तरी कुठे असा प्रश्न नागरीकांच्या मनांत निर्माण होवून भितीचे वातावरण निर्माण झाले आहे. दरम्यान तळजाई पठारावरील रस्त्यावर स्पीड ब्रेकर बसविण्याची नागरीकांकडून मागणी केली जात आहे.
तळजाई पठारावर चाटे पब्लिक स्कुल असुन तेथे हजारो विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी आलेले असतात. शाळेची वाहने, पालकांच्या वाहनांची संख्याही मोठी असते. त्यातच तळजाई पठरावर सकाळी आणि संध्याकाळी व्यायामासाठी, शुद्ध हवेत फिरायला येणाऱ्यांची संख्या मोठी आहे, त्यातच ज्येष्ठ नागरीक देखील पायी चालण्यासाठी तळजाई पठारावर येत असतात. दरम्यान तळजाई पठारावरील रस्त्यावर पुण्यातील विविध ठिकाणचे ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनांची संख्या वाढली आहे. चार चाकी वाहनांचे ड्रायव्हिंग शिकविण्यासाठी अनेक वाहने रस्त्यावर असतात. तळजाई पठारावर नागरीवस्ती वाढलेली आहे. त्यामुळे शाळेतील विद्यार्थी, ज्येष्ठ नागरीक यांच्या जिविताला अनेकदा धोका निर्माण झालेला असतांना, ड्रायव्हींग स्कुलची वाहने देखील बेदरकारपणे चालवित असल्याचे वृत्त नॅशनल फोरमध्ये प्रकाशित झाल्यानंतर, आता रस्त्यावर स्पीड ब्रेकर करण्याची स्थानिक नागरीकांनी मागणी केली आहे.
दरम्यान ड्रायव्हिंग स्कुलच्या वाहनांवर कठोर कारवाई करून, सिमेंट काँक्रिट मिक्स ये-जा करणाऱ्यांवर देखील कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे. तसेच स्थानिक नागरीकांना आरेरावी करणाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे. ड्रायव्हींग स्कुलची मनमानी थांबविण्यात आली नाही तर नागरीक स्वतः रस्त्यावर उतरून आंदोलन करण्याच्या तयारीत असतांनाच आता रस्त्यावर स्पीड ब्रेकर लावण्याची मागणी करण्यात येत आहे. दरम्यान धनकवडी-सहकारनगर क्षेत्रिय कार्यालयाने देखील याबाबतचा अर्ज पोलीस व धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाकडे सादर केल्यानंतर त्यावर कार्यवाही करता येईल अशी माहिती धनकवडी क्षेत्रिय कार्यालयाच्या सहायक महापालिका आयुक्त यांनी कळविले आहे.
