येरवडा, स्वारगेट व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत लाखोंच्या चोऱ्या, येरवड्यात मेडीकल क्लिनिक फोडले तर येरवड्यात दारूच्या बाटल्या लांबविल्या, स्वारगेट मध्ये सोन्याची चैन लांबविली
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरात घरफोडी आणि चोऱ्यांचे सत्र सतत वाढत चालले आहे. घर कुलूप लावून बंद असताना घरफोडी करण्याचे प्रकार घडत आहेत. आता तर चोरांनी दुकानांवर लक्ष केंद्रित केले असल्याचे दिसून येत आहे. येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील, एका मेडिकल क्लिनिक मध्ये चोरी करून ड्रॉवर मध्ये ठेवलेले सुमारे 2 लाख पाच 5 रुपये चोरी करून नेले आहेत. तर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील एका वाईन शॉपचे शटर उचकटून एक लाख रुपयांच्या दारूच्या बाटल्या चोरून नेल्या आहेत. तसेच स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीत स्वारगेट एसटी स्टँड मध्ये 1 लाख 10 हजार रुपयांची सोन्याची चैन चोरी करून नेल्याचा प्रकार घडला आहे. याबाबतचे सविस्तर वृत्त असे की,
येरवडा पोलीस स्टेशन -येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील आनंद क्लिनिक, जावळे कॉम्प्लेक्स, गणपती मंदिरासमोर वडगाव शेरी, फिर्यादी मदन राठी, वय -58 वर्ष, रा. विमान नगर यांचे आनंद क्...