
कायदा व सुव्यवस्थेच्या नावाखाली रिपब्लिकन कार्यकर्त्यांची घरे खाली करण्याचा मार्केटयार्ड पोलिसांचा डाव
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/रिपब्लिकन मातंग सेनेचे अध्यक्ष अमोल तुजारे यांचे मार्केटयार्ड येथील घरावर मागील पंधरा दिवसांपासून काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमानी कब्जा करण्याचा प्रयत्न करीत असल्याबाबतचा तक्रार अर्ज मार्केटयार्ड पोलीस स्टेशन पुणे शहर यांना देण्यात आलेला आहे. तथापि मार्केटयार्ड पोलीस स्टेशन हे रिपब्लिकन नेते अमोल तुजारे यांचे काहीच ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नाहीत. श्री.अमोल तुजारे हे मागील 25 वर्षांपासून मार्केटयार्ड येथील न्यू. स्नेह नगर सोसायटीत राहत आहेत. याच ठिकाणावरून सामाजिक व राजकीय संघटनांचे कामकाज चालवले जाते ही बाब पुणे शहरातील पोलिसांना माहिती असताना देखील जाणीवपूर्वक गुन्हेगारी प्रवृत्तीच्या इसमांना पोलीस पाठबळ देऊन अमोल तुजारे यांना राहत्या घरातून निष्कासित करण्याचे डाव आखले जात आहेत. पुणे शहरातील पोलीस आता जमीनीचे सौदे, फ्लॅट/ घरे खरेदी विक्री करणे, जमिन/ फ्...