पुण्यामधील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशा विकोपाला पोहोचली, हाणामारी, कापाकापी, तोडातोडी… आणि लुटालुट…?
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/पुणे शहरातील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशने कौर्याचे टोक गाठले आहे. आजच्या दैनंदिन गुन्हेगारी वृत्तामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीनांसह नवतरूणांनी किरकोळ कारणांवरून हाणामारी व शस्त्राने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर चंदननगर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, व लोहगाव पोलीस स्टेशन येथे चोरी व सोनसाखळी चोरीच्या व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात चाललय तरी काय… पोलीसांचा धाक राहिलाय की नाही असाच प्रश्न निर्माण होत आहे.
1) सहकारनगर पोलीस स्टेशन- अल्पवयीन बालकांमध्ये लाथाबुक्क्या आणि लोखंडी हत्याराने मारहाणसहकारनरग पोलीस स्टेशन हद्दीत प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पाठीमागे, धनकवडी येथे संध्याकाळी साडेपाच ...
