
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पोलीस असल्याची बतावणी करून संपूर्ण राज्यात चेन स्नॅचींग, घरफोडी, वाहन चोरी करणाऱ्या सराईत आरोपीस खंडणी विरोधी पथक क्र. 2 ने शिताफीने अटक केली आहे. मागील 8 महिन्यांपासून पोलीसांना गुंगारा देवून पळत होता. परंतु अखेर पोलीसांनी जमावातून देखील त्याला ओळखुन पकडण्यात यश आले आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
पुणे शहर खंडणी विरोधी पथक दोन कडील पोलीस अधिकारी व पोलीस अंमलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंग कामी व गोपनीय माहिती काढून गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेत असताना पोलीस अंमलदार नितीन मुंढे व पोलीस अंमलदार कानिफनाथ कारखेले यांना गोपनिय बातमी मिळाली की, वाघोली स्टेशन येथे दाखल गुन्ह्यातील पाहिजे आरोपी मुसली मनासीर बेग (इराणी) वय 37 (रा. पठारे वस्ती लोणीकाळभोर पुणे) येथे राहते घरासमोर बसल्याची गोपणीय माहिती मिळाली.
त्यानुसार सदरची बातमी खंडणी विरोधी पथक-2 चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राम राजमाने, यांना कळवुन, सदर ठिकाणी जावुन योग्य ती कारवाई करण्याबाबत मुफजल आदेश दिले. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली पोलीस अंमलदार नितीन गुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे असे पठारे वस्ती लोणीकाळभोर येथे रवाना झाले. तेथे जावुन जमलेल्या जमावातुन त्यास शिताफिने ताब्यात घेण्यात आले. नंतर त्यास रिपोर्टाने वाघोली पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले. आरोपीवर शिरुर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल असुन त्यात देखील तो पाहीजे आरोपी असल्याची माहीती समजली आहे वर नमुद आरोपीवर महाराष्ट्रातील विविध पोलीस येथे चेन स्नॅचिंगचे पोलीस बतावणी, वाहन चोरीचे तसेच घरफोडीचे गुन्हे दाखल असल्याचे समोर आले आहे.
वरील नमुद कारवाई ही खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलील अंमलदार नितीन मुंढे, कारखेले, जगदाळे, गोरे यांनी केली आहे.
