
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील, जिल्हा व सत्र न्यायालय शिवाजीनगर येथे जामीनासाठी खोटे सात बारा उतारे, बनावट प्रॉपर्टी कागदपत्रे आता तर बनावट पगार पावती देणाराला शिवाजीनगर पोलीसांनी गजाआड केले आहे. न्यायालयात एखादा कागद सादर केल्यानंतर, तो खरा आहे की खोटा आहे, हे तपासण्याचे काम महसुल विभागाकडे आहे. न्यायालय केवळ सर्टीफाईड म्हणजे खरी नक्कल प्रत देण्याचे काम करते, परंतु ते खरे की खोटे हे तपासण्यासाठी कोर्टाकडे तशी यंत्रण उपलब्ध नसल्यामुळे वर्षानुवर्षे कोर्टात बनावट कागदपत्रे देवून, न्यायालयाची फसवणूक करण्याचे प्रकार वाढलेले आहेत. शिवाजीनगर पोलीसांनी सातत्याने अशा प्रकारांना पायबंद घालण्याचा प्रयत्न केला तरी, नव नवीन प्रकरणे समोर येत आहेत.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
शिवाजीनगर पोलीस स्टेशनकडे श्री. अरविंद ललित सोमाणी, (रा- खडकवासला, पुणे ) यांनी फिर्याद दिली की, आरोपी इसम गणेश अजिनाथ बोराटे (रा. कोंढवे धावडे ता. हवेली जि. पुणे) याने त्याच्यावर न्यायालयाने काढलेल्या वॉरंटवर दुमास इंडस्ट्रीज शेड नं.1 नवले इंडस्ट्रीयल इस्टेट नऱ्हे पुणे या कंपनीची जामीनदार नामे विक्रम भिमाजी धोंडगे (रा. कोंढवे धावडे ता. हवेली जि.पुणे) यांच्या नावाची खोटी बनावट पेमेन्ट स्लीिप सादर करुन फिर्यादी व न्यायालयाची गणेश अजिनाथ बोराटे व त्याचा साथीदार आरोपी विक्रम भिमाजो धोंडगे या दोघांनी संगणमताने फसवणूक केली.
शिवाजीनगर पोलीसांनी केलेल्या सदर गुन्हयाचे तपासा दरम्यान आरोपी गणेश अजिनाथ बोराटे याने वरील कंपनीची बनावट पेमेन्ट स्लीप तयार केल्याचे निष्पन्न झाले होते. त्याअनुषंगाने आरोपी नामे गणेश अजिनाथ बोराट व विक्रम भिमाजी धोंडगे या दोघांचा तांत्रिक विश्लेषण व गुप्त बातमीदारामार्फत शोध घेत असताना, या गुन्हयामधील पाहिजे आरोपी विक्रम भिमाजी धोंडगे यांस शिवाजीनगर पोलीसांनी दि. 23 जानेवारी रोजी अटक करुन गजाआड केले असून सदर आरोपी हा सध्या न्यायालयीन कोठडीत येरवडा मध्यवर्ती कारागृह, पुणे याठिकाणी आहे. तसेच सदर बनावट स्लीप तयार करणारा पाहिजे आरोपी गणेश आजीनाथ बोराटे याचा पोलीस कसोशीने शोध घेत आहेत.
सदरची कामगिरी सह पोलीस आयुक्त सो, श्री. रंजन कुमार शमां, अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, श्री राजेश बनसोडे, पोलीस उप-आयुक्त परिमंडळ-1. श्री. ऋशीकेश रावले, तत्कालीन सहा पोलीस आयुक्त श्री. साईनाथ ठोंबरे, विश्रामबाग विभाग यांचे मार्गदर्शनाखाली
मा.वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. गिरीशकुमार नलिनी क्षिरसागर, सचिन जाधव, तेजस घोपडे, दिपक चव्हाण यांनी केली आहे.
