
नॅशनल फोरम/पुणे/दि/ ANIRUDDHA SHALAN CHAVAN
पुणे शहर पोलीस आयुक्तपदी अमितेश कुमारांनी पदभार स्वीकारल्याच्या पहिल्याच महिन्यात सुमारे 8 हजार कोटींचे एमडी हे अमंली पदार्थ जप्त करून दमदार पदार्पण केले होते. त्यानंतर गुन्हेगारांची परेड झाली. पुढे त्या कारवाई नंतर मागील दीड वर्षात कोणतेही उल्लेखनिय कामगिरी झाल्याचे दिसत नसले तरी, भारतीय प्रशासकीय सेवेतील अधिकाऱ्यांच्या बदलीचा कालावधी पूर्ण होण्याच्या कालावधीत पुणे शहरात पुन्हा दमदार कामगिरी बजाविली जात आहे. 10 फेब्रुवारी रोजीचे कोंम्बिग ऑपरेशन फसल्यानंतर आता पुन्हा फरासखाना व खडक पोलीसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 11 बांगला देशी महिलांना अटक करण्यात आली आहे. त्यातच पुण्यामध्ये कित्येक पोलीस आयुक्तांनी कामकाज केल्यानंतर देखील त्यांनी कधीच फरासखाना इमारतीत कधीच पाऊल ठेवले नाही. तसे पाहता कित्येक पोलीस आयुक्तांनी पुण्याच्या मध्यवर्ती फरासखाना इमारतीत क्वचित आलेले आहेत. तथापी अमितेश कुमारांचे फरासखाना इमारतीत अनेकदा येणे झाले आहे. त्यामुळे पुण्यात नेमकं घडतय तरी काय हा सहज प्रश्न निर्माण झालेला आहे. अमितेश कुमार पुण्याचे पोलीस आयुक्त आहेत, त्यामुळे ते कुठेही जाऊ-येऊ शकतात, तो त्यांच्या कार्यालयीन कामकाजाचा भाग आहेच, त्यात वाद नाही. परंतु … प्रश्न अनुत्तरीत राहत आहेत.
पुण्यातील बुधवार पेठेत 11 बांगलादेशी महिलांना अटक, बनावट आधारकार्ड आणि रेशनिंग कार्डाआधारे रहिवास
पुण्यातील बुधवार पेठेत 11 बांगलादेशी महिलांना वेश्याव्यवसाय करताना अटक करण्यात आली आहे. या महिला नकली कागदपत्रांद्वारे गेल्या अनेक महिन्यांपासून येथे राहात होत्या. बांगलादेशी नागरिकांचा मुद्दा सध्या गाजत असताना अशा प्रकारे बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याने गोंधळ उडाला आहे.
पुण्याच्या रेड लाईट भागात बांगलादेशी महिला वेश्या व्यवसाय करत असतात अशी माहिती मिळाली होती. त्याआधारे बुधवार पेठेतील रेड लाईट एरियातून या 11 बांगलादेशी महिलांवर कारवाई झाल्याचे पोलिस उपायुक्त कृषीकेश रावळे यांनी सांगितले. आम्ही एकूण 22 महिलांवर कारवाई केली त्यातील 11 महिला या बांगलादेशी असल्याचे उघडकीस आले आहे. या महिला काही महिन्यांपासून शहरात बेकायदेशीरपणे रहात होत्या हे उघडकीस आले आहे. या प्रकरणाचा सखोल तपास सुरु आहे अशीही माहिती पोलिसांनी दिली आहे.
अमितेश कुमार यांनी घेतला आढावा
पुण्यातील बांग्लादेशी नागरिकांवरील ही कारवाई झाल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी आढावा घ्यायला सुरुवात केली आहे. फरासखाना व खडक पोलीसांच्या संयुक्त कारवाईत सुमारे 11 बांगलादेशी महिलांना अटक केली आहे. सातत्याने बांग्लादेशी महिला सापडत असल्याने आज स्वतः पोलीस आयुक्त फरसखाना पोलीस ठाण्यात दाखल होवून, कारवाईचा आढावा घेतला.दरम्यान सर्व महिलांना ताब्यात घेतले असून आता त्यांना मायदेशी पाठवण्यासंदर्भात पुढील कारवाई सुरूअसल्याची पोलिसांनी म्हटले आहे.
बांगला देशी महिलांवरील कारवाई, काही अनुत्तरीत प्रश्न –
बांगला देशी महिलांनी पुण्याच्या रेड लाईट एरियात अनेक वर्षांपासून घुसखोरी केली आहे. त्यामुळे हा मुद्दा नवीन नाही. नॅशनल फोरमच्या मागील अंकात (बातमीत) याबाबतचे विवेचन केले आहे. यात बांगला देशी महिलांचे कारणामे व पोलीसांनाच बळीचा बकरा कसा बनवायचा याचे किस्से नमूद केले आहे. यात मी नमूद केले होते की,
1. ज्यांच्या बरोबर देण्या-घेण्यात, व्यवहारात काही बिनसले तर, फुकटात पुण्यातून निघून जाण्यासाठी पोलीसांचा वापर केला जातो. अल्पवयीन आहे, वेश्या व्यवसाय करायला लावले म्हणून खोटी फिर्याद द्यायची आणि अटक करून घ्यायची. पुढे पोलीसी संरक्षणात ते मायदेशी परतात.
2. परराज्यात धुमाकुळ घालुन महाराष्ट्रात व पुण्यात आल्यानंतर, व्याजाने पैसे घेणे, व्याजाने पैसे देणे, व्याजाच्या पैशांची वसुली करणे, तसेच पुणे व पिंपरी चिंचवड मधील चिखली, पिंपरी, हिंजवडी, बाणेर, मुंढवा,कात्रज, अप्पर इंदिरा नगर येथील त्यांचे सगे सोयरे यांना कामासाठी, धंदयासाठी मदत करणे, यासाठी व्यापारी, राजकीय लोकांना आपल्या पाशात अकडकाविणे, भुलथापा मारून त्यांचा कार्यभाग उरकणे असे उद्योग बांग्लादेशी करीत आहेत. जिथं व्यवहारात अडचण आली, की तिथं लगेच पोलीसांत फिर्याद देवून स्वतःला अटक करून घेणे आणि पोलीस संरक्षणात मायदेशी निघून जाणे असे प्रकार पुण्यातही सर्रासपणे सुरू आहेत. व्यापारी व राजकारणी देखील बांग्लादेशीच्या प्रेमात पडत आहेत. दिसायला देखील गोऱ्यापान, नाकीडोळी सरळ, लालभडक, उंचापुऱ्या असल्याने त्यांच्या सौंदर्यावर इथले भले, भले अडकलेत व अडकत आहेत. त्यात नवीन काहीच नसल्याची माहिती स्थानिक नागरीकांनी दिली असल्याचे त्या बातमीत नमूद केले होते.
तसेच स्थानिक पोलीसांना म्हणजे फरासखाना पोलीसांना विश्वासात घेवून कारवाई करणे अपेक्षित असल्याचेही मी नमूद केले होते. आज स्थानिक असलेल्या फरासखाना व खडक पोलीसांना विश्वासात घेवून, संयुक्त माहिमेत सुमारे 11 बांगला देशी महिलांना अटक केली आहे. तथापी दि. 10 फेब्रुवारी रोजी झालेल्या कोंम्बिग ऑपरेशनमध्ये 41 वाडे व 700 नागरीकांना चेक केल्याचे पोलीस आयुक्तालयाकडून सांगण्यात आले होते. त्यावेळी ह्या 22 पैकी 11 महिलांना चेक केले नव्हते काय असाही प्रश्न पुन्हा निर्माण होत आहे. ह्या 11 बांगला देशी महिला आल्या तरी कुठून... किंवा कारवाईवेळी त्या निघून गेल्या होत्या असा समज करून घेतला तरी, आता पोलीसांची कारवाई होणार आहे, हे त्यांच्या एजंटांना माहिती मिळाली नव्हती काय... मग त्या पुन्हा पळून का गेल्या नाहीत... असंख्य शेकडो प्रश्न उपस्थित होत आहेत.
बांगला देशींचा बिमोड करायलाच पाहिजे त्यात वाद नाही. अल्पवयीन मुलींची सुटका केलीच पाहिजे, अंमली पदार्थांवर कारवाई केलीच पाहिजे. त्यात काहीच वाद नाही. मग कोंम्बिग ऑपरेशनमध्ये पोलीसांच्या हाती काहीच कसे लागले नव्हते, ह्या प्रश्नाचे आजही उत्तर मिळत नाही. तसेच स्थानिक 4 अल्पवयीन मुलींची सुटका केली वा कसे हे देखील समजण्यास वाव नाही. अनेक शंका उपस्थित होत आहेत.
