
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी नागपुरहून पुण्यात आल्यानंतर, लगोलच पुण्यातील गुन्हेगारांची परेड घेवून, सर्व गुन्हेगारांचे चेहरे पुणेकर नागरीकांना दाखविण्यात आले. आमचे तत्कालिन क्राईम एसीपी गुन्हेगारांना कॅमेऱ्यापुढे कसे दम देत होते, हे देखील पुणेकरांनी त्यावेळी पाहिले आहे. गुन्हेगारांची वरात काढल्यामुळे सगळे अवैध धंदे पटापट बंद होतील, गुन्हेगारी संपुष्टात येईल असे भाकीत केली गेली. परंतु पोलीस आयुक्त दोन वर्षांचा कालावधी पूर्ण करीत आले आहेत. तरी देखील पुणे शहरातून अवैध धंदे बंद झाले नाहीत किंवा मसाज पार्लर आणि स्पा च्या नावे सुरू असलेला वेश्याव्यवसाय देखील बंद झाला नाही. पूर्वी अवैध धंद्यावर कारवाया होत नव्हत्या, किंवा झाल्या तरी पोलीस आयुक्तालयातून अधिकृत बातमी येत नव्हती. आता मात्र अवैध धंदयावर कारवाया होवू लागल्या व त्याच्या अधिकृत बातम्या देखील बाहेर येऊ लागल्या आहेत. तसेही अवैध धंदे पूर्णपणे बंद नव्हते, परंतु स्थानिक पोलीसांची जरब होती. आता ती जरब कमी होऊ लागली आहे की काय असे वाटतेय.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
दि.04 फेब्रुवारी 2026 रोजी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडील अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, यांना माहिती मिळाली की, योगिराज कॉम्पलेक्स फ्लॅट नं 101, पहिला मजला, सरस्वतीनगर, उत्तमनगर, पुणे येथे मुलींना वेश्याव्यवसायासाठी आणुन त्यांचेकडुन जबरीने वेश्याव्यवसाय करुन घेत असलेबाबत समजले. याबाबत अनैतिक मानवी वाहतुक व व्यापार प्रतिबंध कक्ष, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक छगन कापसे पुणे शहर यांचे मार्गदर्शनाखाली तात्काळ बातमीची पडताळणी करुन बनावट ग्राहक याचे सहाय्याने, योगिराज कॉम्पलेक्स, उत्तमनगर, पुणे येथे अचानक छापा टाकुन महिला आरोपी गौरी विकास पवळे वय 45 वर्षे, रा. बधे कॉम्पलेक्स, उत्तमनगर, पुणे यांनी वेश्याव्यवसायासाठी आणलेल्या दोन पिडीत महिलेची सुटका करण्यात आली.
सदर प्रकरणी वरिल महिला आरोपीं विरुध्द उत्तमनगर पोलीस स्टेशन पुणे येथे भा.न्या.सं. कलम 143 (3), अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध अधिनियम 1956 कलम 3, 4, 5, 7, प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
तसं पाहिलं तर पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडे अनेक गुन्हे शाखा कार्यरत आहेत. त्यातील कित्येक गुन्हे शाखा एकाच गुन्हे प्रकरणांचा अनेक ठिकाणी कारवाई रिपोर्ट सादर करतात असा अनुभव आहे. त्यातच आता मार्च एंड सुरू होत आहे. त्यामुळे गुन्हे शाखेच्या कामगिरीचा अहवाल सादर करावा लागणार असल्यामुळे (कदाचित) कारवाया केल्याचे व त्याची अधिकृत बातमी पुढे आली आहे एवढेच. परंतु पुणे शहरातून गुन्हेगारी कधीच कमी झाली नाही, ना.. अवैध धंदे बंद झाले, सगळे अलबेल आहे.
दरम्यान वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त श्री. अमितेशकुमार, सह. पोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे पंकज देशमुख, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप-आयुक्त, गुन्हे, निखील पिंगळे, सहा पोलीस आयुक्त, गुन्हे.-3. शंकर खटके, पोलीस निरीक्षक छगन कापसे, पोलीस उप-निरीक्षक विशांत चव्हाण पोलीस अंमलदार तुषार भिवरकर, दत्ताराम जाधव बबनराव केदार, अमेय रसाळ, म. पोलीस अंमलदार वैशाली इंगळे. खेडेकर गुन्हे शाखा पुणे शहर यांनी केली.
