
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात साजरा होत असलेल्या होळी, धुलिवंदन, रमजान सणांच्या पार्श्वभूमीवर पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात सार्वजनिक शांतता आणि सार्वजनिक सुरक्षितता राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) अन्वये प्रतिबंधात्मक आदेश जारी करण्यात आले आहेत. तसेच प्रतिबंधात्मक आदेशांचे उल्लंघन करणाऱ्यांविरूद्ध दंडाच्या आकारणीसह जप्ती व शिक्षा केली जाणार असल्याची माहिती विशेष शाखेचे पोलीस उपआयुक्त डॉ. संदीप भाजीभाकरे यांनी दिली आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयामार्फत प्रसिद्धीस देण्यात आलेल्या निवेदनात त्यांनी खालील प्रमाणे निदेश देण्यात आलेले आहेत.
डॉ. संदीप भाजीभाकरे, पोलीस उप-आयुक्त, विशेष शाखा, पुणे शहर यांनी महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून संपुर्ण पुणे शहर पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात दिनांक 03/03/2026 रोजी 00.01 वा. पासून ते दिनांक 16/03/2026 रोजी 24.00 वा पर्यत 14 दिवसांसाठी खालील नमूद केलेली कृत्ये करण्यास या आदेशान्वये मनाई करण्यात आली आहे. यात-
अ) कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
ब) दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
क) शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
ड) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे
इ) मोठ्याने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे
फ) पुणे शहरात तैनात असलेल्या कोणत्याही पोलीस अधिका-याच्या मते, शालीनता किंवा शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारीत करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथुन टाकणेस कारणीभुत ठरु शकेल.
ग) यामुळे सम्यता अगर नितीमत्ता यास धोका पोहचेल किंवा राज्याची सुरक्षितता धोक्यात येईल किंवा राज्य उलथवून देण्यारा प्रवृत्त करेल अशी आवेशपूर्ण भाषणे करणे किंवा आविर्भाव करणे, कोणतेही जिन्नस तयार करून त्याचा जनतेत प्रसार करणे या कृत्यावर बंदी घालीत आहे
ह) ज्यायोगे वरील परिसरात कायदा व सुव्यवस्था धोक्यात येईल अशा पद्धतीने महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 (1) (2) (3) विरुध्द वर्तन करणे,
तसेच महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन-1951 च्या कलम 37 चे पोटकलम (3) पाच किंवा पाच पेक्षा जास्त लोकांचा जमाव करण्यास पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचे पुर्व परवानगी शिवाय सभा घेणेस किंवा मिरवणुक काढणेस बंदी घालण्यात आली आहे.
या शिवाय वरील संपूर्ण आदेश हा शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपुर्तीसाठी हत्यार बाळगणे आवश्यक आहे त्यांना लागू होणार नाही.
हा आदेश खाजगी सुरक्षा रक्षक किंवा गुरखा किंवा घौकीदार जे 3.5 फूट पर्यंत लांबीपर्यंतच्या, लाठ्या बाळगत आहेत, इत्यादींना लागू होणार नाही. दरम्यान गुन्हेगाराची रिल बनवुन सोशल मिडीयावर टाकून दहशत पसरविणे किंवा धकमी देणे वा कोणताही तपास किंवा कायदेशीर कार्यवाही सुरु केली जावु शकते, चालु ठेवली जावु शकते किंवा लागु केली जावु शकते.
या आदेशारचे कोणत्याही प्रकारचे उल्लंघन केल्यास दंड, जप्ती किंवा शिक्षा लागु केल्या जावु शकतात.तसेच संबंधीत व्यक्ती महाराष्ट्र पोलीस अधिनियम सन 1951 चे कलम 135 प्रमाणे शिक्षेस पात्र होईल असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.
