Tuesday, March 17 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

दहशत माजविण्यासाठी देशी पिस्तोल बाळगणाऱ्या सराईत आरोपीस पर्वती पोलीसांनी केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने जवळ देशी पिस्तुल बाळगणाऱ्या व धनकवडी आंबेगाव पठार येथे राहणाऱ्या अजित कसबे याला जेरबंद करण्यात पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्यासह तपास पथकाचे किरण पवार व महेश मंडलिक यांना यश आले आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
पर्वती पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राजेंद्र सहाणे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी किरण पवार व पोलीस अंमलदारासह गस्त घालत असतांना, पोलीस हवालदार महेश मंडलिक यांना गोपनिय माहिती मिळाली की, एक इसम दहशत माजविण्यासाठी देशी बनावटीचे बंदुक जवळ बाळगत आहे.

लागलीच पर्वती पोलीस स्टेशनकडील तपास पथकाचे प्रमुख किरण पवार यांनी सापळा रचुन आरोपी अजित सागर कसबे वय 21 वर्ष (रा. स.नं. 15. विघ्नहर्ता सोसायटी, फ्लॅट नं. 504, आंबेगाव पठार धनकवडी पुणे ) यास अत्यंत शिताफीने पकडुन त्याच्या ताब्यातुन एकुण 40 हजार पाचशरे रुपये किंमतीचे एक  देशी बनावटीचे पिस्तोल व 1 जिवंत काडतुस जप्त करण्यात आले आहे. 

आरोपी विरुध्द पर्वती पोलीस स्टेशन येथे भारतीय हत्यार कायदा कलम 3 (25), महाराष्ट्र पोलीस अधि. कलम 37 (1) सह 135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे.

सदरची कामगिरी अपर पोलीस आयुक्त पश्चिम प्रादेशिक विभाग, पुणे शहर श्री राजेश बनसोडे, पोलीस उप आयुक्त परि-02 श्री मिलिंद मोहिते,  सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग श्री धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक पर्वती पोलीस स्टेशन, पुणे शहर श्री राजेंद्र सहाणे, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्रीमती अनिता हिवरकर यांचे मार्गदर्शनाखाली 
पोलीस उप निरीक्षक किरण पवार, पोलीस अंमलदार प्रकाश मरगजे, महेश मंडलिक सुर्या जाधव, अमित विव्हे, मनोज, बनसोड, राकेश सुर्वे, सदाम शेख, अमोल दबडे यांनी केली.