
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेकडील खंडणीविरोधी पथक 2 चे पोलीस अधिकारी व पोलीस अंगलदार पुणे शहर पोलीस आयुक्तालय हद्दीतील गुन्हे प्रतिबंधक पेट्रोलिंगकामी व गोपनीय माहिती काढुन गुन्ह्यातील पाहिजे व फरारी आरोपीतांचा शोध घेण्याचे काम करीत असतात. दरम्यान पेट्रोलिंग करीत असतांना, पोलीस अंमलदार सुरेंद्र जगदाळे व प्रशांत शिंदे यांना गोपनिय बातमी मिळाली की, पोलीस रेकॉर्डवरील आरोपी रोहित दुर्गेश धर्माधिकारी, हा शिवाजीनगर ज्ञानेश्वर पादुका चौक पुणे येथे येणार आहे व तो जवळ अग्निशस्त्र बाळगतो.
अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने शिवाजीनगर येथे 1) रोहित दुर्गेश धर्माधिकारी, वय 24 वर्षे रा. प्रियदर्शननगर जुनी सांगवी शेवट बस स्टॉप पुणे व त्याचा मित्र 2) अभिषेक राजु टेंकल, वय 23 वर्षे रा. विष्णु कृपानगर, जुने शिवाजीनगर बस स्टैंड मागे, शिवाजीनगर पुणे यांना पोलीस स्टाफचे मदतीने कायदेशीर प्रक्रिया करून ताब्यात घेतले. तसेच त्याच्याकडे एकुण 04 लोखंडी धातूचे गावठी बनावटीचे सिल्व्हर रंगाचे मॅग्झीनसह पिस्टल किंमत एक लाख 60,अजार रूपये व 05 जिवंत काडतुसे 7.65 किंमत 4000/- रुपये, असा एकुण 1 लाख 64 हजार 300 रु. किमंतीचा मुद्देमाल मिळुन आला.
वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त, पुणे शहर, अमितेशकुमार, पोलीस सह आयुक्त, रंजनकुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त, पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, गुन्हे, श्री निखील पिंगळे, सहा पो आयुक्त, गुन्हे 2 श्री राजेंद्र मुळीक, यांचे मार्गदर्शनाखाली,
खंडणी विरोधी पथक 2 गुन्हे शाखा कडील पोलीस निरीक्षक राम राजमाने, पोलीस उप-निरीक्षक गौरव देव, सुरेंद्र जगदाळे, रविंद्र रोकडे, दिलीप गोरे, अनिल कुसाळकर, अमोल घावटे, अजिनाथ येडे, पवन भोसले, साहिल शेख, अमोल राऊत, प्रशांत शिंदे, आझाद पाटील, गणेश खरात, शेखर खराडे, चेतन आपटे, किरण पड्याळ यांनी केली
