Friday, February 20 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यामधील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशा विकोपाला पोहोचली, हाणामारी, कापाकापी, तोडातोडी… आणि लुटालुट…?

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील अल्पवयीन आणि नवतरूणांमध्ये भाईगिरीची नशने कौर्याचे टोक गाठले आहे. आजच्या दैनंदिन गुन्हेगारी वृत्तामध्ये सहकारनगर पोलीस स्टेशन, खडकी पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन व लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीत अल्पवयीनांसह नवतरूणांनी किरकोळ कारणांवरून हाणामारी व शस्त्राने मारहाण केल्याच्या घटना घडल्या आहेत. तर चंदननगर पोलीस स्टेशन, शिवाजीनगर पोलीस स्टेशन, विश्रामबाग पोलीस स्टेशन, लक्ष्मीनगर पोलीस स्टेशन, व लोहगाव पोलीस स्टेशन येथे चोरी व सोनसाखळी चोरीच्या व दरोड्याच्या घटना घडल्या आहेत. पुण्यात चाललय तरी काय… पोलीसांचा धाक राहिलाय की नाही असाच प्रश्न निर्माण होत आहे.

1) सहकारनगर पोलीस स्टेशन- अल्पवयीन बालकांमध्ये लाथाबुक्क्या आणि लोखंडी हत्याराने मारहाण
सहकारनरग पोलीस स्टेशन हद्दीत प्रियदर्शनी इंग्लिश मिडीयम स्कुलच्या पाठीमागे, धनकवडी येथे संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास तीन विधीसंघर्षित बालकाने एका 17 वर्षीय अल्पवयीनास शिवीगाळ करून हाताने व लाथा- बुक्क्यांनी मारहाण केली असून, लोखंडी हत्याराने देखील मारहाण केल्याची घटना घडली आहे. यात 17 वर्षीय फिर्यादी व त्याचा मित्र वरील ठिकाणी बोल असतांना विधीसंघर्षित बालकांनी जुन्या भांडणाच्या कारणावरून फिर्यादीस जिवे मारण्याची धमकी देवून मारहाण केली आहे. आरोपींविरूद्ध कायदयातील तरतुदीनुसार गुन्हे दाखल केले असून, दोन विधीसंघर्षित बालकांना ताब्यात घेतले असून तिसरा बालक अद्याप फरार आहे. या गुन्ह्याचा तपास सहकारनरग पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार एस. के. कोळगे करीत आहेत.

2) खडकी पोलीस स्टेशन – शिवीगाळ आणि लोखंडी हत्याराने मारहाण
खडकी पोलीस स्टेशन हद्दीतील शेवाळे चौक शिवसेना शाखेजवळ आठमुळा रोड खडकी पुणे (जनावरांचे गोठ्याजवळ) दि. 18 फेब्रुवारी रोजी सांयकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास, यातील एक 32 वर्षीय फिर्यादीचे वडीलांना आरोपी शुभम माने वय 29 व एक अनोळखी विधीसंघर्षित बालकाने भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून लाकडाने व लोखंडी हत्याराने मारून गंभीर जखमी केल्या प्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतच गुन्ह्याचा तपास पोलीस उप निरीक्षक गाडीलकर करीत आहेत.

3) कोंढवा पोलीस स्टेशन – जीवे ठार मारण्याची धमकी
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीतील वेस्टन बेकरीजवळ, मिठानगर कोंढवा व गोल्डर चायनिज फास्ट फुड या हॉटेलमध्ये नवाजीश चौक कोंढवा येथे दि. 18 व 19 रोजी सायंकाळी सात सव्वासात वाजण्याच्या सुमारा चार अनोळखी इसमांनी एका 42 वर्षीय फिर्यादी यांच्या भावाच्या मुलास मारहाण करून खंडणीची मागणी केली. तसेच खंडणीचे पैसे दिले नाही तर घरच्यांना जिवे ठार मारण्याची धमकी दिली. याबाबतची तक्रार पोलीस स्टेशन येथे देण्यासाठी गेल्यानंतर, त्याचा राग मनांत धरून फिर्यादी यांना शिवीगाळ करून, लाथाबुक्क्यांनी व लोखंडी हत्याराने मारहाण करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली आहे.
चार अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केला असून याबाबतचा तपास पोलीस उपनिरीक्षक रविंद्र गावडे करीत आहेत.

4) लोणीकंद पोलीस स्टेशन – भांडणाच्या कारणांवरून शिवीगाळ व जीवे ठार मारण्याची धमकी
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील शिंदेवस्ती पूर्व वाडेगाव ता. हजेली जि. पुणे येथे 18 व 19 फेबु्रवारी रोजी रोजी रात्रौ 10 व मध्यरात्रौ साडेबारा वाजण्याच्या सुमारास एक 29 वर्षीय फिर्यादी यांना आरोपी नामे 1) राजेंद्र गेणूभाऊ शिंदे (वय-38 रा. शिंदेवस्ती वाडेगाव) 2) आदेश तुषार शिंदे वय – 26 (रा. शिंदेवस्ती वाडेगाव) व इतर दोन अनोळखी इसमांनी भांडणाच्या कारणावरून शिवीगाळ करून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच फिर्यादी यांच्या भावाला व बहिणीला हाताने मारहाण करून जखमी केले व आईला शिवीगाळ करून घराचा दरवाजा व खिडकीचे व सोफाचे नुकसान केले प्रकरणी अटक आरोप विरूद्ध गुन्हे दाखल केले असून याबाबतचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक दिलिप पालवे करीत आहेत.

चोरी-घरफोडी आणि लुटालूट

पुण्यातील चंदननगर, शिवाजीनगर, विश्रामबाग, लक्ष्मीनगर व लोहगाव पोलीस स्टेशन हद्दीत घरफोडी, चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात-

1) चंदननगर पोलीस स्टेशन येथे लग्नाचे आमिष दाखवुन 59 लाखांची फसवणूक
चंदन नगर पोलीस स्टेशन हद्दीतील नोव्हेंबर 2024 ते 26/10/26 या कालावधीत एक 44 वर्षीय फिर्यादी महिलेस आरोपी एकुण 8 अनोळखी इसमांनी आपआपसात संगनमत करून फिर्यादीबरोबर शादी डॉट कॉम या वेबसाईटवरून मैत्री करून, फिर्यादीस लग्नाचे आमिष दाखवुन, तसेच वेळोवेळी वेगवेगळी कारणे सांगुन फिर्यादी बरोबर लग्न न करता त्यांची 59 लाख 37 हजार 59 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. तसेच देण्यात आलेले पैसे परत मागितले असता, फिर्यादीस शिवीगाळ करून, जीवे ठार मारण्याची धमकी देण्याची घटना घडली आहे. सर्व व्यवहार व संपर्क ऑनलाईन झाला आहे. याबाबत आठ अनोळखी इसमांविरूद्ध गुन्हा दाखल केले असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक जगदाळे करीत आहेत.

2) शिवाजीनगर पोलीस स्टेशन – लॉज बुकींगची तारीख बदलण्याच्या बहाण्याने 7 लाख 23 हजारांची फसवणूक-
शिवाजीनगर पोलीस स्टेशन हद्दीतील एक 53 वर्षीय फिर्यादी महिलेस मोबाईलधारक व वापरकर्ते यांनी 11 फेब्रुवारी रोजी ऑनलाईन माध्यमांव्दारे व्हिडीओ कॉल करून अगोडा कस्टमर केअर मधुन बोल असल्याचे खोटे सांगुन फिर्यादी यांनी नाशिक येथे बुक केलेल्या लॉज बुकींगची तारीख बदलण्यासाठी मदत करेन असे सांगुन मोबाईल स्क्रिन शेअर करण्यास सांगुन व मोबाईल हॅक करून फिर्यादी यांच्या खात्यातील 7 लाख 23 हजार 332 रुपयांची आर्थिक फसवणूक केली आहे. आरोपींना अटक केली नसून त्यांच्या विरूद्ध गुन्हे दाखल केले आहेत. याबाबतचा अधिक पास पोलीस निरीक्षक (गुन्हे) अमर काळंगे करीत आहेत.

3) विश्रामबाग पोलीस स्टेशन- प्रवासा दरम्यान 75 हजाराचे मंगळसुत्र चोरले
सिंहगड रोड, वडगाव बु येथे राहणारे एक 42 वर्षीय महिला स्वारगेट ते पिंपरी या पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असतांना, बाजीराव रोडने अप्पा बळवंत चौक सदाशिव पेठे पुणे येथे बस प्रवासा दरम्यान कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बस मधील गर्दीचा फायदा घेवून फिर्यादी यांच्या गळ्यातील 75 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्राची चोरी केली आहे. अज्ञात इमसाविरूद्ध गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस अंमलदार भोसले करीत आहेत.

4) लोहगाव पोलीस स्टेशन- पाय जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील 45 हजाराचे मंगळसुत्र हिसकावले
लोहगाव पोलीस स्टेशन हद्दीतील लोहगाव वाघोली रोड, दत्त मंदिराजवळ लोहगाव येथे एक 36 वर्षीय महिला दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पायी जात असतांना, मोटार सायकल वरील दोन अज्ञात इसमांनी त्यांच्या जवळ येवून त्यांचे गळ्यातील 45 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे मंगळसुत्र चोरी करून नेले आहे. याबाबत अज्ञात इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संतोष शिंदे करीत आहेत.