Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोपे झाले आहे काय…? वारजे, लोणीकंद व कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत ताजीराते हिंद तिनसौ दो… आत्ताचा 103 च्या घडल्या घटना

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यात एखादयाला जीवानिशी ठार मारणे इतके सोप्पे झाले आहे काय… पुणे शहरात पोलीसांचा धाक राहिला आहे की नाही असाच प्रश्न वारंवार उभा राहत आहे. मारणे, कापणे, दगडाने ठेचणे, चाकुने, ब्लेने वार करणे, लोखंडी हत्यारांचा बेमालूम वापर… इतक्या पराकोटीला लोक उतरले आहेत. पुण्यातील वारजे पोलीस स्टेशन, लोणीकंद पोलीस स्टेश व कोढवा पोलीस स्टेशन हद्दीतही जुना ताजीराते हिंद तिनसौ दोन म्हणजे आत्ताचा 103 खुनाच्या घटना घडल्या आहेत.

लोणीकंद पोलीस स्टेशन – पत्नीच्या दागिन्यांची मागणी केल्याने, पतीने पत्नीला ठार मारले
लोणीकंद पोलीस स्टेशन हद्दीतील एक 23 वर्षीय व्यक्तीने फिर्यादी दिली आहे. त्यात आरोपी शैलेंद्र प्रकाश व्हटकर वय 30 वर्ष रा. बकोरी, पुणे हे 22 जानेवारी रोजी सात्रौ साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जोगेश्वरी हायस्कुलच्या पाठीमागे वाडेबोल्हाई यांनी त्यांची पत्नी नम्रता शैलेंद्र व्हटकर वय 19 वर्ष हीने आरोपी पती याच्याकडे सोन्याच्या दागिन्यांची वारंवार मागणी करीत असल्याचा राग मनांत धरून त्याने नम्रता व्हटकर हीच्या गळ्यावर, चेहऱ्यावर चाकुने वार करून तिला गंभीर जखमी करून जीवे ठार मारले.
आरोपी प्रकाश व्हटकर विरूद्ध भा.न्या.सं. 103 (1) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास लोणीकंद पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक गुन्हे श्रीमती स्वाती खेडकर तपास करीत आहेत.

वारजे पोलीस स्टेशन – अज्ञात व्यक्तीचा दगडाने ठेचून खुन केला
वारजे पोलीस स्टेशन हद्दीत फिर्यादी पोलीस अंमलदार भूषण निकम, नेमणूक गुन्हे शाखा युनिट 3 पुणे शहर प्रतिनियुक्ती वारजे माळवाडी पोलीस स्टेशन यांनी फिर्याद दिली आहे की, 23 जानेवारी रोजी दुपारी साडेबाराच्या पूर्वी आकाशनगर जवळील वनविभागाच्या टेकडीवरील, सिमेंटच्या विसाव्या शेजारील, निर्जन ओबड धोबड जागेत वारजे पुणे येथे एक अनोळखी इसम वय अंदाजे 40 वर्ष याला अज्ञात इसमाने, कोणत्याही कारणाने व कोणत्यातरी हत्याराने शरीरावर ठिकठिकाणा वार करून तसेच दगडाने चेहरा चेंबवुन त्याला जीवे ठार मारले आहे.
अधिक तपास वारजे पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. विश्वजित काइंगडे करीत आहेत.

कोंढवा पोलीस स्टेशन- मित्राने शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण केली
कोंढवा पोलीस स्टेशन हद्दीत एक 18 वर्षीय इसमाने फिर्याद दिल्यानुसार आरोपी इसम व त्याचे तीन साथीदार (अटक नाही) यांनी 22 जानेवारी रोजी मध्यरात्रौ साडेबाराच्या सुमारास कोंढव्यातील आयडीएल बेकरी शिवनेरीनगर येथे आरोपी व त्याचे इतर तीन साथीदारांनी फिर्यादी व त्याचा मित्र यांना शिवीगाळ करून लोखंडी हत्याराने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे.
आरोपींविरूद्ध कोंढवा पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलस निरीक्षक सुकेशिनी जाधव करीत आहेत.