
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
होळी सण दोन दिवसांवर आलेला असतांना, वाघोली पोलीसांनी हातभट्टी बनविणाऱ्यांच्या अड्डयावर छापा मारून सुमारे साडेसहा लाख रुपयांचे मिश्रण जप्त करीत कारवाई केली आहे. होळी सणासाठी हातभट्टी तयार केली जात असल्याचे समोर आले आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की,
क्राईम ब्रॅंच युनिट 7 कडील पथक अवैध धंदे विरोधी कारवाईचे अनुषंगाने वाघोली पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करत असताना, पोलीस अंमलदार नितीन धाडगे व प्रतिक्षा पानसरे यांना माहीती मिळाली की, मौजे भावडी गावचे हद्दीत तांबे यांचे क्रशर प्लांट जवळ एक महीला गावठी हातभट्टीची दारू भट्टी लावुन तयार करीत आहे. ही माहिती मिळाल्यानंतर, पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे हे गुन्हे शाखा युनिट 7 कडील पथकासह छापा कारवाई केली.
भावडी येथे भट्टी राखण करताना आरोपी महीला अनिशा योगेश गुडदावत, वय 20 वर्षे, (रा. 5 नंबर भावडी, हवेली जि. पुणे) मिळुन आल्याने तिच्याकडे अधिक विचारपुस केली असता, तिचा नवऱ्याच्या मदतीने सदर हातभट्टी होळी सणाच्या निमीत्त लावुन दारु तयार करुन त्यादिवशी विक्री करण्याकरीता लावली असल्याचे आढळुन आले. या छापा कारवाई सुमारे 18.122/-लिटर तुरटी व गुळमिश्रीत कच्चे रसायन त्याची किंम्मत 6 लाख 34 हजार 270 रुपये तसेच 1300 रुपये किमतीचे इतर साहित्य याप्रमाणे एकुण 6 लाख 35 हजार 579 रुपयांचा माल मिळुन आला.
आरोपीतांविरुद्ध वाघोली पोलीस स्टेशन येथे महाराष्ट्र दारूबंदी कायदा कलम 65 (फ) (ब) (क) (ई) अन्वये गुन्हा दाखल करून पुढील तपास वाघोली पो.स्टे. यांचेकडून करण्यात येत आहे.
ही कामगिरी गुन्हे शाखा युनिट 7 चे प्रभारी पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखा युनिट 7 कडील पोलीस अंमलदार सारंग दळे, गिरीष नाणेकर, निलेश साळवे, सुहास तांबेकर, प्रशांत कापुरे, निर्णय लांडे, म.पो. अंमलदार नेहा तापकीर, सोनाली नरवडे, प्रतिक्षा पानसरे, पोलीस अंमलदार ऋषीकेश ताकवणे बाळासाहेब तनपुरे, नितीन धाडगे, यांनी केली.
