Saturday, February 21 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

स्वारगेट मध्ये बंदूकीतून गोळीबार, हवेत हत्यारे फिरविली, बिबवेवाडीत मर्डर, खडकीत हत्यारे उगारली, बाणेरमध्ये हाडच मोडले !

!

नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/
पुण्यात कायदा आणि सुव्यवस्था इतकी सक्षम आणि भक्कम आहे की, कोणताही गुन्हा करतांना, कोणत्याही सर्वसामान्य नागरीकाला, आरोपीला किंवा गुन्हेगाराला पोलीसांची भितीच राहिली नाही. गुन्हा केला तरी काही दिवसात आपण जेलच्या बाहेर येणारच असा पक्का विश्वास संबधितांच्या मनांत उभा राहिला आहे की काय अशी शंका उपस्थित होत आहे. पुणे पोलीसांच्या भक्कम सुव्यवस्थेवर, गुन्हे करणारांनी, सक्षमपणे शिक्कामोर्तब केल्याचे आजच्या गुन्हेगाडी घडामोडींवरून दिसून येत आहे.

स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील मिनाताई ठाकरे या झोपडपट्टीत चार विधीसंघर्षित बालकांनी पिस्टलने हवेत गोळीबार करून तसेच हत्यारे हवेत फिरवून आम्हीच इथले भाई आहोत असे मोठ मोठ्याने आरडा ओरडा करून या भागात चांगलीच दशहत निर्माण केली आहे. स्वारगेट पोलीसांनी या चार विधीसंघर्षीत बालकांना ताब्यात घेतले असून त्यांच्यावर भारतीय न्याय संहितेच्या कलम 308 (3), 3 (5) व आर्म ॲक्ट 3 (25) 4 (25) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलिस निरीक्षक अभिजित पाटील करीत आहेत. 

बिबवेवाडीत तर मर्डरच पडला –
बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील साई स्मार्ट हेअल सलून तिरूपती भेळ शेजारी, अप्पर जुना बसस्टॉप बिबवेवाडी येथे दुपारी 12 ते साडेबारा वाजण्याच्या सुमारास आरोपी 1. रोहित संतोष भालचिमकर वय- 24 (रा. घोलेनगर, जांभुळवाडी रोड, आंबेगाव) 2. सौरभ रोहितदास चोरघे वय 22 वर्ष (रा. लिपाणे वस्ती, जांभुळवाडी रोड आंबेगाव व 3) अनिकेत सतिश चऱ्हाटे वय 27 वर्ष (रा. अनुमाननगर जांभुळवाडी रोड) यांनी एक 18 वर्षीय फिर्यादीचा भाऊ मोहम्मद शमी फिरोज कुरेशी वय5 25 वर्ष (रा. अप्पर जुना बसस्टॉप) यास भांडणाच्या कारणावरून खाली पाडून छातीत व पोटात लाथा मारून त्यास ठार मारले.
आरोपींविरूद्ध भा.न्या.सं क. 103 (1) व 3 (5) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्रीमती अश्विनी सातपुते करीत आहेत.

बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत हाडच मोडले-
बाणेर पोलीस स्टेशन हद्दीत सुप्रिम ईस्टीया सोसायटी गेटवर पॉनकार्ड रोड बाणेर येथे दुपारी दोनच्या सुमारास आरोपी अनिल यशवंत बनसोडे वय 26 वर्ष (रा. सुसगाव, ता. मुळशी पुणे) याने एक 28 वर्षीय फिर्यादी हे सुप्रीम सोसायटीत सिक्युरिटी गार्डचे काम करतांना, आरोपीनेत्याची रिक्षा सोसायटीच्या आऊट गेटमधुन आतमध्ये घातली, त्यावेळी फिर्यादी यांनी त्याला, रिक्षा राँग साईडने आत घालु नका असे सांगितल्याने त्याला राग आला. रिक्षा चालक आरोपीने रागारागाने फिर्यादी यांना शिवीगाळ करून गाडीतील फायर सिलेंडर व लाकडाने मारहाण करून फिर्यादीचे हाड फ्रॅक्चर करून जखमी केले. याबाबत आरोपी अनिल बनसोडे याच्या विरूद्ध बाणेर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक झरेकर करीत आहेत.

खडकीत धारदार हत्यारे उगारली, एकाला जखमी केले
खडकी पोलीस स्टेशन हद्दीत 19 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6 वाजण्याच्या सुमारास पाटील इस्टेट गल्ली नं. 10 शिवाजी नगर पुणे येथे एक 22 इसम (रा. शिवाजीनगर पुणे) यांना एक अनोळखी आरोपी इसमाने जुन्या भांडणाच्या कारणांवरून शिवीगाळ करीत धारदार हत्याराने मारून जखमी केले. तसेच फिर्यादी यांना सोडविण्यासाठी आलेल्या लोकांवर हातातील हत्यार उगारून दहशत निर्माण केल्या प्रकरणी एका अनोळखी इसमाविरूद्ध गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक रेखा दिघे करीत आहेत.

पुण्यात अजुनही कायदा आणि सुव्यवस्था आहे असंच म्हणायचं…