Thursday, March 12 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

30 लाखाच्या फॉर्च्युनर गाडीतून 10 लाख 60 हजाराचा गांजा जप्त

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
थेऊर येथील धुमाळ मळा येथून 30 लाख रुपयांच्या फॉर्च्युनर गाडीतून सुमारे 10 लाख 60 हजार रुपये किंमतीचा एकुण 53 किलो 14 ग्रॅम वजनाचा गांजा अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. 1 ने पकडण्यात यश आले आहे. मध्यरात्रौ 11 वाजल्यापासून ते पहाटे 5 वाजेपर्यंत थेऊर येथे सापळा लावण्यात आला होता.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील गुन्हे शाखा अंमली पदार्थ विरोधी पथक-1. चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण व त्यांचेकडील पोलीस अधिकारी व पथक असे पुणे शहर हद्दीत दि. 11 मार्च रोजी गस्त करीत असताना स्वतः वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांना त्यांचे बातमीदारामार्फत बातमी मिळाली की,
एक इसम पांढऱ्या रंगाच्या अलिशान फॉर्च्युनर गाडीमधून गांजाचा मोठा साठा विक्री करीता थेऊर परीसरात घेवून येणार आहे अशी बातमी प्राप्त झाली. लगेचच मध्यरात्रौ 11 वाजण्याच्या सुमारास अंमली विरोधी पथक-1 कडील पोलीस अधिकारी व अंमलदार यांनी थेऊर येथे ठिक ठिकाणी सापळा रचुन गुन्हेगारावर पाळत ठेवली.

यावेळी प्रितम रविंद्र कुंजीर वय 32 वर्ष (रा. मु.पो. धुमाळ मळा, म्हसोबा मंदिराजवळ, थेऊर, पुणे ) यास दिनांक 11 मार्च रोजी रोजी पहाटे 05 वाजण्याच्या सुमारास, मु.पो. धुमाळ मळा, थेऊर फाटा, पुणे येथून ताब्यात घेवून त्याच्या कब्जातून 10 लाख 60 हजार 280 रुपये किंमतीचा सुमारे 53 किलो 14 ग्रॅम वजनाचा गांजा हा अंमली पदार्थ, तसेच 30 लाख रुपये किंतीची फॉर्च्युनर गाडी, व 10 रुपये किंमतीचा मोबाईल असा एकुण 40 लाख 70 हजार 280 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे

वरील नमुद कारवाई ही पोलीस आयुक्त श्री. अमितेश कुमार, सह पोलीस आयुक्त, श्री रंजन शर्मा, अपर पोलीस आयुक्त, गुन्हे, श्री पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त, श्री निखील पिंगळे,  सहा पोलीस आयुक्त, गुन्हे 3 श्री. शंकर खटके यांचे मार्गदर्शनाखाली,

 अंमली पदार्थ विरोधी पथक 1 गुन्हे शाखा पुणे शहर कडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे सहा पोलीस निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस अंगलदार विठ्ठल साळुंखे, संजय राजे, रिहान पठाण, अमोल सरडे, निलेश जाधव, विजय कांबळे, गंगेश गुंड, विशाल भिलारे, राहुल शिंदे, अक्षय शिके व महिला पोलीस अंमलदार आशा भिंगारे, तसेच लोणीकाळभोर पोलीस ठाणेकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे, पोउपनिरी योगेश पैठणे, पोलीस अंगलदर आण्णा गाने, सुरज कुंभार व अशोक गिरी यांनी केली आहे.