Saturday, February 7 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

स्वारगेटचा एसटी स्टँड-सहकारनगरचा बस स्टँड, दोन्हीकडे प्रवाश्यांची लुटालुट,खरा आरोपी का सापडत नाही …

सहकारनगर पोलीस स्टेशन *स्वारगेट पोलीस स्टेशन *बंडगार्डन पोलीस स्टेशन *वारजे माळवाडी पोलीस स्टेशन *वानवडी पोलीस स्टेशन

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील आजच्या गुन्हेविषयक घडामोडींमध्ये नेहमीप्रमाणे स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील स्वारगेट एसटी स्टँड आणि सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील के.के. मार्केट, बालाजीनगर मध्ये सार्वजनिक वाहनातून नागरीक प्रवास करीत असतांना, त्यांच्यावर दरोडे पडले आहेत. तर बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीत एका 50 वर्षीय महिलेचे 1 लाख 44 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्राची चोरी झाली आहे. वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीतही सोनाराच्या दुकानात महिलांनी सोने खरेदीच्या बहाण्याने 2 लाख 35 हजार रुपयांची चोरी केली आहे, तर वानवडी पोलीस स्टेशन हद्दीत मारहाण व शिवीगाळीचा गुन्हा दाखल झाला आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील सर्व पोलीस स्टेशन हद्दीत शेकडो गुन्ह्यांची नोंद होते, काही पोलीस स्टेशन हद्दीत तर तोच तोच गुन्हा घडत असतांना, खरा आरोपी आजपर्यंत का सापडत नाही हा प्रश्न असून नेमका वहीम कुणावर ठेवायचा असा सहज प्रश्न मनांत निर्माण झाला आहे.

सहकारनगर पोलीस स्टेशन, 90 हजाराची सोन्याची बांगडी चोरली
सहकारनगर पोलीस स्टेशन हद्दीतील के.के. मार्केट बस स्टँड धनकवडी बस प्रवासा दरम्यान एक 77 वर्षीय महिला प्रवास करीत असतांना, भर दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बस मधील गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या हातातील 90 हजार रुपये किंमतीची सोन्याची बांगडी चोरी करून नेली आहे. याबाबत सहकारनगर पोलीस स्टेशन येथे भान्यास 303 (2) नुसार गुन्हा दाखल झाला असून अधिक तपास सपोफौ खुटवड अधिक तपास करीत आहेत.

स्वारगेट पोलीस स्टेशन- 40 हजाराचे मंगळसुत्र लांबविले
स्वारगेट पोलीस स्टेशन हद्दीतील एसटी स्टँड मध्ये एक 85 वर्षीय महिला रा. तरडगाव, ता. फलटण जि. सातारा ह्या बसमधुन पावणेसात वाजता उतरत असतांना, कोणीतरी अज्ञात व्यक्तीने बसमधील गर्दीचा फायदा घेवून त्यांच्या गळयातील 40 हजार रुपये किंमतीचे मंगळसुत्र चोरी करून नेले आहे. अज्ञात इसमाविरूद्ध भान्यांस 303 (2) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सहा. पोलीस निरीक्षक संजय शिरसाठ करीत आहेत.

बंडगार्डन पोलीस स्टेशन – 1 लाख 44 हजाराची चोरी
बंडगार्डन पोलीस स्टेशन हद्दीतील डच पॅलेस आयबी चौक रूम नं. 2 येथे लग्नाच्या कार्यक्रमासाठी गेलेल्या असतांना, त्यांच्या गळ्यातील 1 लाख 44 हजार रुपयांचे सोन्याचे मंगळसुत्र काढुन पर्समध्ये ठेवले असता, कुणीतरी अज्ञात व्यक्तीने चोरी केल्या प्रकरणी अज्ञात व्यक्ती विरूद्ध भान्यांस 303(2) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक संदीप खेडेकर अधिक तपास करीत आहेत.

वारजे माळवाडी पोलीस स्टेशन – 2 लाख 35 हजाराची चोरी
वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत सांयकाळी सव्वाआठ ते साडेआठ दरम्यान गणेश ज्वेलर्स विकास मित्र मंडळ चौक, कर्वेनगर येथे तीन अनोळखी महिला सोने खरेदी करण्याच्या बहाण्याने दुकानात आल्यानंतर, दुकानदार फिर्यादीची नजर चुकवुन दुकानातील सुमारे 2 लाख 35 हजार रुपये किंमतीचे टॉप्स चोरी करून नेले आहेत. अनोळखी महिलांविरूद्ध भान्यांस 305 (अ) , 3 (5) नुसार गुन्हा दखल केला असून अधिक तपास मपो उपनिरीक्षक भांबेरे करीत आहेत.

वानवडी पोलीस स्टेशन – माझ्याकडे का बघितले म्हणून नाकावर,डोक्यावर मारून जखमी केले
वानवडी पोलीस स्टेशन हद्दीतील रात्री सव्वाबारा वाजता लक्ष्मी माता चौक, शारदाबाई लोंढे शाळेजवह रामटेकडी येथे एक 25 वर्षीय फिर्यादी युवक घरी जात असतांना, आरोपी इसम शुभम उर्फ चम्या संजय कांबळे वय- 21 वर्ष रा. रामटेकडी, असे एकुण चार इसमांसह एक विधीसंघर्षित बालक व दोन इतर साथीदारांनी, आमच्याकडे हा बघितले या कारणांवरून फिर्यादीस मारहाण व शिवीगाळ करून, त्यांना धमकी देवून फिर्यादीच्या नाकावर व डोक्यावर मारून गंभिर जखमी केले. चार आरोपींसह विधीसंघर्षित बालकाला अटक केली असून इतर दोन साथीदार पळून गेले आहेत. आरोपींविरूद्ध गुन्हे दाखल केले असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेखर मोकाटे करीत आहेत.