Thursday, February 26 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून पुणे शहरातील सराईत गुन्हेगारासह ड्रग्ज तस्करांवर कारवाई

नॅशनल फोरम/पुणे/दि/प्रतिनिधी/
पुणे शहर पोलीस आयुक्तालयाकडील खंडणी विरोधी पथक 1 व दरोडा-वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखांकडून सराईत गुन्हेगारांसह ड्रग्ज तस्करांविरूद्ध कारवाई केली आहे. यात दरोडा व वाहन चोरी पथ क्र. 1 यांनी बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत 1 लाख 92 हजार रुपयांचे एम.डी हा अंमली पदार्थ जप्त केला आहे, तर खंडणी विरोधी पथक क्र. 1 यांनी एक गावठी पिस्टल व एक जीवंत काडतूसासह सराईत गुन्हेगाराला जेरबंद केले आहे.

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा-
1 लाख 92 हजार रुपये किंमतीचा 9 ग्रॅम 63 मिलीग्रॅम एम. डी. (मेफेड्रान) अंमली पदार्थ बाळगणा-या इसमावर कारवाई –

दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखा यांनी पुणे शहरात विविध भागात बिबवेवाडी पोलीस स्टेशन हद्दीत गस्त करीत असताना संध्याकाळी 7 वाजण्याच्या सुमारास पि.के.जी.एम शाळेसमोर, गंगाधाम ते अप्पर येथे सार्वजनिक रोडवर सार्वजनिक ठिकाणी आदिल करीम बागवान, वय 35 वर्षे, (रा. 570 आंबेडकरनगर, दिनार बेकरी समोर, मार्केटयार्ड, पुणे) यांच्या ताब्यात एकुण 1 लाख 92 हजार 600रुपये किंमतीचा 9 ग्रॅम 63 मिली ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) हा अंमली पदार्थ व इतर ऐवज संगनमातने, अनाधिकाराने, बेकायदेशिररित्या, विक्रीकरीता जवळ बाळगताना मिळुन आला. म्हणुन सदर आरोपी विरुध्द बिबवेवाडी पोलीस स्टेशन येथे एन.डी.पी.एस. ॲक्ट कलम 8 (क), 20 (ब) गुन्हे दाखल करण्यात आला आहे. 
ही कारवाई, दरोडा व वाहनचोरी पथक 01 गुन्हे शाखा, पुणे शहर वरिष्ठ पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, सहा. पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, सहा. पोलीस निरीक्षक छबु बेरड, सहा. पोलीस निरीक्षक वर्षा कावडे, पोलीस अंमलदार, बाळु गायकवाड, गणेश ढगे, प्रदिप राठोड, रेहाना शेख, साईकुमार कारके, विनायक येवले, गणेश लोखंडे या पथकाने केलेली आहे.

खंडणी विरोधी पथक 1, गुन्हे शाखा-
सराईत गुन्हेगाराकडून गावठी पिस्टल व काडतुसे केली जप्त

खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेकडील अधिकारी व अंमलदार पुणे शहर आयुक्तालयात विना परवाना शस्त्र बाळगणा-या, रेकॉर्डवरील पाहिजे, फरारी व तडीपार आरोपींचा शोध घेऊन कारवाईच्या अनुषंगाने पेट्रोलिंग करीत असताना पोहवा सचिन माळवे व पोशि दयानंद तेलंगे यांना त्यांचे गुप्त बातमीदारांमार्फत बातमी मिळाली की, भारती विद्यापीठ पोलीस ठाणेच्या रेकॉर्डवरील आरोपी संकेत चोरघे याच्याकडे पिस्टल आहे. खंडणी विरोधी पथकातील अंमलदार यांनी संकेत चोरघे याच्याबद्दल माहिती घेतली असता संकेत चौरघे (रा.सर्वे नं 16/1 आंबेगाव पठार, साई सिध्दी अपार्टमेंट, पुणे)  येथे राहत असून त्याचे आंबेगाव पठार, तुकाई दर्शन व सिंहगड कॉलेज परिसरात येणे जाणे असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार दि. 24 फेब्रुवारी रोजी खंडणी विरोधी पथकास संकेत चोरघे सिंहगड कॉलेज कॅम्पस, वडगाव बु. येथे आला असल्याची माहिती मिळाली. पथकातील स्टाप सदर ठिकाणी गेला असता संकेत चोरघे त्याच्याकडील दुचाकीवरून पळून गेला.

खंडणी विरोधी पथकातील अधिकारी व अंमलदार यांनी संकेत चोरघे राहत असलेल्या स.नं 16 आंबेगाव पठार, पुणे या ठिकाणी रात्रभर सापळा रचून दि. 25 फेब्रुवारी रोजी (मुळ राहणार कोलवडी ता वेल्हा, जि. पुणे) यास ताब्यात घेवून त्याच्याकडून 1 गावठी पिस्टल व त्याचे मॅग्जिनमध्ये 1 जिवंत काडतुसे असे एकूण 35 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून याबाबत भारती विद्यापीठ  पोलीस स्टेशन येथे आर्म ॲक्ट कलम 3(25), म.पो.का. क. 37 (1) (3) सह 135 अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास भारती विदयापीठ पोलीस स्टेशन, पुणे शहर हे करीत आहेत

ही कारवाई खंडणी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत काईगडे यांचे सुचनेनुसार सहायक पोलीस निरीक्षक श्री. राजेश माळेगावे, पोलीस अंमलदार सचिन माळवे, दयानंद तेलंगे, राजेंद्र लांडगे, प्रफुल चव्हाण, अमर पवार, नितीन कांबळे, गितांजली जांभुळकर, रहिम शेख व अमोल आवाड यांनी केली आहे.