Saturday, February 28 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

गुंड निलेश गायवळ टोळीतील फरार आरोपीला सोलापूरच्या बार्शीतून अटक

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुण्यातील वारजे माळवाडी पोलीस स्टेशन व कोथरूड पोलीस स्टेशन हद्दीतील दाखल गुन्ह्यातील आरोपी अमोल दत्तात्रय लाखे हा मागील काही महिन्यांपासून गुन्हे केल्यापासून फरार होता. पोलीस त्याचा तपास करीत असतांना, तो सोलापूर जिल्ह्यातील बार्शी येथे असल्याची खबर लागल्यानंतर, वारजे माळवाडी पोलीसांनी थेट बार्शी गाठत लाखे याला अटक केली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
अमोल लाखे याने वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील कायदा कलम भा.न्या.सं.क 189 (1),189(2).190. 308(4),126(2):351 (1).351 (2),111 सह मोक्का, कोथरुड पोलीस स्टेशन गु.र.नं. 277/2025 भा.न्या.सं.क 189(1). 189(2). 191(2), 191(3), 190, 329 (4), 308(2), 308(4), 308 (5), 352, 351 (2) (3) सह मोक्का गुन्ह्यामधील व वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत केलेल्या गुन्ह्यातील कायदा कलम भा.न्या.सं.क 318(4) सह टेली कम्युनिकेशन ॲक्ट 42 (3) (ई) प्रमाणे दाखल गुन्ह्यामधील पाहीजे आरोपी अमोल दत्तात्रय लाखे, वय-27 वर्षे, (रा. मु.पो. ईटखेडा, छ. संभाजीनगर) हा गुन्हा केल्यापासून फरार होता.

दरम्यान वारजे माळवाडी पोलीस ठाणे कडील तपास पथकाचे प्रभारी अधिकारी पोलीस उपनिरीक्षक संजय नरळे यांना मोक्का गुन्ह्यातील पाहीजे आरोपी अमोल दत्तात्रय लाखे हा बार्शी, जि सोलापूर येथे असल्याची गोपनिय बातमीदारांमार्फत व तांत्रिक विश्लषणाद्वारे खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार दि. 26 फेब्रुवारी रोजी पहाटे अमोल दत्तात्रय लाखे, वय 27 वर्षे,( रा. मु.पो. ईटखेडा, छ. संभाजीनगर) यास बार्शी, जि. सोलापूर येथून ताब्यात घेतले. आरोपी लाखे हा वारजे माळवाडी व कोथरुड पोलीस स्टेशन येथे दाखल दोन मोक्का गुन्ह्यामध्ये पाहीजे आरोपी होता.


ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक, वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, श्री महेश बोळकोटगी, पोलीस निरीक्षक (गुन्हे), वारजे माळवाडी पोलीस ठाणे श्री. प्रकाश धेंडे, यांचे सुचनेप्रमाणे पोलीस उप-निरीक्षक संजय नरळे, पोलीस अंमलदार अमित शेलार, सागर कुंभार, योगेश वाघ, शरद पोळ, निखील तांगडे, अमित जाधव, महादेव शिंदे अमोल सुतकर, गणेश शिंदे व सत्यजित लोंढे यांनी केली.