Friday, August 1 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

मोबाईल न विचारता घेतल्याने 25 वर्षिय तरुणाची हत्या

नॅशनल फोरम/पुणे/दि/
देवा उर्फ देविदास पालते वय 25 वर्ष मूळ राहणार नांदेड जिल्हा सध्या रा. धायरी याने दुसऱ्याचा मोबाईल फोन त्याला न विचारता घेतल्याने, या तरुणास जबरी मारहाण करण्यात आली. या मारहाणीत त्याचा मृत्यू झाल्याची घटना नांदेड सिटी पोलीस स्टेशन हद्दीतील धायरी येथे घडली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की, पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर हे पोलीस स्टेशन हद्दीत पेट्रोलींग करीत असताना त्यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाली की, स.नं. 30/13, साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे येथे एक इसम हा जखमी अवस्थेत पडलेला आहे. पोलीस अंमलदार शिवा क्षिरसागर यांनी लागलीच घटनास्थळी जावुन खात्री केली असता सदर ठिकाणी इसम नामे देवा उर्फ देविदास पालते (वय 25 वर्षे ) रा.मु.पो.तागयाल पो. कलबर देवाची ता. मुखेड जि. नांदेड (सध्या स.नं. 30/13, साई धाम, जिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात प्रेस रोड, धायरी पुणे ) हा जखमी अवस्थेत मिळुन आला. सदरबाबत त्यांनी सर्व घटनेची माहीती वरीष्ठांना दिली. 

त्यानंतर लागलीच वरीष्ठ पोलीस निरीक्षक अतुल भोस, तपास पथकाचे सहा. पोलीस निरीक्षक राहुल यादव, व तपास पथकातील पोलीस अंमलदार घटनास्थळी पोहचुन सदर जखमी इसमास तात्काळ ॲम्युलन्याने ससुन येथे उपचार कामी रवाना केले. उपचारापुर्वीच इसम नामे देवा उर्फ देवीदास पालते हा मयत झाल्याचे डॉक्टारांनी घोषीत केले.


 घडलेल्या घटनेची माहीती घेवुन तपास पथकातील पोलीस अंमलदार यांना मिळालेल्या गोपनीय माहीतीच्या आधारे गुन्ह्यातील संशयीत आरोपी नामे 1) गजानन हरिशचंद्र राठोड (वय 32 वर्षे ) रा. मु. हिवाळणी तलाव पो. आडगाव, ता. पुसद जि. यवतमाळ, 2) महारुद्र शिवाजी गवते (वय 27 वर्षे) रा. स.नं. 30/13. साई धाम, त्रिनेश इंजिनिअरींग कंपनीचे वर पहीला मजला प्रभात मेरा रोड, धायरी पुणे यांना ताब्यात घेवुन त्यांचेकडे तपास करता त्यांनी देवा याने गजानन राठोड याचा मोबाईल फोन न विचारता घेतला या कारणावरुन मारहाण केल्याची कबुली दिली.
 सदरबाबत नांदेडसिटी पोलीस स्टेशन गु.रजि.नं. 158/2025 भा. न्याय संहीता कलम 103 (1), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल करून आरोपींना सदर गुन्हयात अटक करण्यात आलेली आहे.

ही कारवाई अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशिक विभाग पुणे शहर श्री राजेश बनसोडे,  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 3 पुणे, श्री. संभाजी कदम , सिंहगड रोड विभाग पुणे श्री. अजय परमार यांचे मार्गदर्शनाखाली,
  नांदेडसिटी सिटी पोलीस निरीक्षक श्री. अतुल भात, पोलीस निरीक्षक (गुन्हे) श्री. गुरुदत्त मोरे, सहा, पोलीस निरी. यादव, सहा. पोलीस निरीक्षक प्रविण जाधव, पोलीस अंमलदार संग्राम शिनगारे, राजु वेगरे,  स्वप्नील मगर, मोहन मिसाळ, शिवा श्रीरसागर, गिगराज गागुर्डे, उत्तम शिदे, निलेख कुलये, अक्षय जाधव, सतिश खोत यांनी केली आहे.