पुणे/दि/ रिजवान शेख/
पुण्यातील स्वारगेट- बिबवेवाडी परिसरातील प्रसिद्ध हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याचा उरूस उत्साहात संपन्न झाला. यावेळी शहर व उपनगरातील विविध भागातून आलेल्या भाविकांनी संदल, ऊर्स शरिफ व जियारत अशा तीन दिवस सुरू असलेल्या कार्यक्रमात सहभाग घेतला.
हजरत राजा बागशहा शेर सवार दर्ग्याच्या ऊरूसाच्या पहिला दिवशी संदल हा कार्यक्रम पारंपारीक पद्धतीने साजरा करण्यात आला. यावेळी हजरत राजा बागशहा शेर सवार यांना संदल लावण्यात आला. तसेच पारंपारिक वाद्य वाजवुन मिरवणूक काढण्यात आली. दुसर्या दिवशी ऊर्स शरीफ व तिसर्या दिवशी जियारत कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी सार्वजनिक स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी पाच ते सात हजार नागरीकांनी यामध्ये सहभाग नोंदविला.
बिबवेवाडी येथील हजरत राजा बागशहा शेर सवार हा दर्गा प्रसिद्ध असून, पुणे शहरासह विविध भागातून भाविक मोठ्या भक्तीभावाने येत असतात. भाविकांची अशी श्रद्धा आहे की, इथे मनातील इच्छा (मन्नत) पूर्ण होतात. मनातील इच्छा, मन्नत पूर्ण झाल्यानंतर त्याचा नवस फेडण्यासाठी नागरीक येत असल्याची माहिती दर्ग्याचे प्रमुख विश्वस्त जावेद भाई यांनी नॅशनल फोरमला दिली.