Thursday, January 2 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क पदाचा सौदा, एका टेलिफोन ऑपरेटर पदाच्या सेवकाला वर्ग एकचे पद,

प्रशासकीय राजवटीचा कारभार – पैसे दया- बदली घ्या, पैसे दया – पदोन्नती मिळवा, पैसे दया -अतिरिक्त व प्रभारी पदभार मिळवा
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महापालिकेत प्रशासकीय राजवट सुरू असल्याने, महापालिकेच्या आस्थापना विभागात कमालिचा भ्रष्टाचार व गैरव्यवहार वाढला आहे. आता जनसंपर्क अधिकारी या पदाचा देखील सौदा केला आहे. एका टेलिफोन ऑपरेटर या वर्ग 3 मधील कर्मचाऱ्याला माहिती व जनसंपर्क या पदावर बसविण्यासाठी त्या सेवकाच्या शैक्षणिक पात्रतेनुसार आकृतीबंधामध्ये बदल करून ते राज्य शासनाकडे मंजुरीस्तव पाठवुन त्यात बदल केले आहेत. थोडक्यात तुम्ही पुणेकरांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेतील सेवकांना लुटा, तुम्ही पुणे महापालिकेच्या बजेट मध्ये हात घालुन पैसे काढा पण पैसे आम्हाला आणून दया असेच सध्या पुणे महापालिकेतील प्रशासकीय राजवटीत घडत आहे. राज्य सरकारकडे तर लक्ष दयायला वेळ नाही, जुने नगरसेवक पुणे महापालिकेत पायही ठेवत नाहीत. त्यामुळे सर्वत्र भ्रष्टाचाराची दलदल माजली आहे.

पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क अधिकारी पदाची रचना-
पुणे महानगरपालिकेतील माहिती व जनसंपर्क अधिकारी म्हणजेच (पी.आर.ओ.) हे पद अतिशय महत्त्वाचे असून जबाबदारीचे आहे. पुणे महानगरपालिकेतील सर्व बातम्या व पुणेकरांना उपयोगी असे उपक्रम जनसंपर्क विभागामार्फत प्रसारीत करून प्रबोधन केले जाते. पुणेकरांना असणाऱ्या अडचणी या जनसंपर्क विभागामार्फत त्यांना मार्गदर्शन करण्यात येते. तरी यामध्ये प्रशासकीय सेवा, श्रेणी-दोन मध्ये हे पद येत असून माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदासाठी नामनिर्देशन, पदोन्नती व प्रतिनियुक्ती अशी प्रस्तावित सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये अटी व शर्ती दिलेले आहेत.

यामध्ये नामनिर्देशनामध्ये मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष पत्रकारिता व जन संज्ञापन मधील पदविका आवश्यक शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थेतील सहाय्यक माहिती जनसंपर्क विभागातील या संवर्गातील (पाच वर्षाचा) अनुभव अशा तरतुदी आहेत. तर पदोन्नतीसाठी नामनिर्देशनासाठी विहित केलेली पात्रता धारण करणाऱ्या पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेकडील सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे सहाय्यक माहिती जनसंपर्क अधिकारी व पदावरील किंवा तीन वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे. तसेच प्रतिनियुक्तीवर राज्य शासनाच्या माहिती जनसंपर्क संचालनालय येथील समकक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुक्तीने नियुक्ती ही तरतुद आहे.

टेलिफोन ऑपरेटर योगेश हेंद्रे यांच्या कब्जात जनसंपर्क अधिकारी पद-
आता पुणे महापालिकेतील माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावर योगेश हेंद्रे यांची नेमणूक झालेली आहे. योगेश हेंद्रे यांचा मूळ सुद्धा हा टेलीफोन ऑपरेटर असून हे पद तांत्रिक प्रकारामध्ये गणला जातो. तांत्रिक पदावरील सेवकांची आतांत्रिक पदांवर नेमणूक देऊ नये असे शासन आदेश सेवा प्रवेश नियमावली 2014 अट क्रमांक नऊ मध्ये स्पष्टपणे नमूद आहे. तरीही, येथे टेलिफोन ऑपरेटर ही पात्रता असलेल्या योगेश हेंद्रे या सेवकास जनसंपर्क अधिकारी वर्ग एकचे पद व सहाय्यक जनसंपर्क अधिकारी वर्ग दोन चे प्रभारी स्वरूपात देण्यात आलेले आहे.

पुणे महापालिकेचे वाचनालय धुळखात का पडले आहे-
या पदाच्या प्रभारी भरतीच्या वेळी पुणे महानगरपालिकेने कोणतेही कार्यालयीन परिपत्रक काढलेले नव्हते व नाही ते काढण्यात यावे अशी सर्वांची मागणी आहे. जे सेवाज्येष्ठतेने व गुणवत्तेनुसार अनुभवानुसार पात्र आहेत. ज्यांची सेवाज्येष्ठता शैक्षणिक पात्रता ही योगेश हेंद्रे यांच्यापेक्षा जास्त आहे. त्यांची येथे नियुक्ती करणे गरजेचे आहे. माहिती अधिकार वाचनालय हे फक्त स्टोअर रूम झालेली असून येथे कोणत्याही सेवकाची नेमणूक योगेश हेद्रे यांनी केलेली नाही. तेथे अत्यंत महत्त्वाची पुणे महानगरपालिकेतील सर्व माहिती विनामूल्य उपलब्ध असून ते बंद को पडले याकडेच हेंद्रे यांनी लक्ष दिलेले असल्याचे दिसून येत आहे. तसेच सर्व खात्याकडून वेळोवेळी माहिती घेणे व ती (अपडेट करणे) अद्ययावत करणे हे काम योगेश हेद्रे यांनी केलेले नाही. त्यामुळे यांच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी होत आहे.

 ग्रंथालयातून काही पुस्तके चोरीला गेलेली आहेत व या वाचनालयासाठी पुणे मनपाचे बजेट वापरले गेलेले आहे त्याचीही चौकशी करण्याची मागणी होत आहे. भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांमुळे म्हणजेच विक्रम कुमार आयुक्त, रवींद्र बिनवडे अतिरिक्त आयुक्त व इतर हे भ्रष्ट अधिकारी आल्यामुळेच प्रभारी, अतिरिक्त, प्रशासकीय कामकाजासाठी, प्रतिनियुक्ती, भरती, बदली, पदोन्नती यांसारखी अनेक कामे तात्काळ हातोहात होत आहेत. सिंगल बदलीच्या व सिंगल प्रमोशनच्या ऑर्डर तात्काळ होत आहेत, ज्या ऑर्डर ऑनलाइन टाकल्या जात नाहीत. 

आयुक्त व अति. आयुक्तांची बेनामी मालत्ता -कोरेगाव पार्क मधील मालमत्ता कुणाची-
फक्त आर्थिक भ्रष्टाचार करून रवींद्र बिनवडे व विक्रम कुमार हे दोघे भ्रष्टाचार करत असल्याचे दिसून येते. तसेच यांची वेळोवेळी प्रशिक्षणासाठी मागणी करण्यात आली होती परंतु हे प्रशिक्षणाला न जाता महाराष्ट्रातील मंत्र्यांकडून वशिले लावून हे पुन्हा पुणे महानगरपालिकेत भ्रष्टाचार करण्यासाठी थांबलेले आहेत व भ्रष्टाचार करत आहेत. इथून पुढे कुठल्या मंत्रांची शिफारस यांनी आणलेली आहे तेही जाहीर करण्यात येणार आहे. या सनदी अधिकाऱ्यांच्या मालमत्तांची काही माहिती समोर आली असून, ती पुणेकरांपुढे यापुढील काळात जाहीर करण्यात येणार आहे. तसेच कोरेगाव पार्क लेन नंबर 7 या ठिकाणी यांनी बेकायदेशीररित्या आर्थिक भ्रष्टाचार करून स्थावर मालमत्ता संपादित केलेली आहे अशी प्राथमिक माहिती आहे. तसेच काही अधिकाऱ्यांची स्थावर व जंगम मालमत्ता ही 100 कोटी पेक्षा जास्त असल्याचा संशय आहे. त्यामुळे यांची मालमत्ता विवरण पत्रांसह यांचे पगार, यांची तपासणी करून यांची माहिती व सर्व चौकशी करण्यात यावी हीच मागणी करण्यात येत आहे.

सामान्य प्रशासन विभागातील सेवकांची आरेरावी-
पुणे महापालिकेतील काही सेवकांच्या बदली, पदोन्नती, अतिरिक्त व प्रभारी पदभार देण्याच्या प्रकरणांमध्ये कुठलेही आक्षेप त्रुटी आलेल्या नाहीत. ही तत्काळ प्रकरने फास्ट पळाली आहेत. तसेच हे सर्व भ्रष्टाचारी अधिकारी आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांच्या यावर सह्या व मान्यता ठराव आहेत. तसेच यातील मनपा सेवक राजेश उर्डे, दिनेश घुमे, योगेश यादव हे सेवकांच्या व उमेदवारांच्या वतीने पैसे गोळा करत आहेत अशा अनेक तक्रारी पुणे महापालिकेत प्राप्त झालेले आहेत. परंतु त्यांची बदली न करता रवींद्र बिनवडे, विक्रम कुमार यांनी त्यांना सामान्य प्रशासन विभागातच काम करावयास सांगितले आहे. तसेच दुसऱ्या खात्यात सही करतात व दिवसभर सेवक वर्गातच पडीक असतात व येथे कलेक्शन करतात हे सर्व सेवकांना माहिती आहे.

पुणे मनपातील कोणत्याही पदांचा पदभार देताना कुठलेही कार्यालयीन परिपत्रक न करता जाहीर न करता मनमानी पद्धतीने आर्थिक भ्रष्टाचार करून लाखो रुपये घेऊन थेट नेमणुका देण्याची प्रथा आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी पाडलेली आहे. सेवा प्रवेश नियमावली मध्ये अपेक्षित असलेले बदल 1. जनसंपर्क अधिकारी या पदासाठी विधी शाखेची पदवी अथवा पदवोत्तर पदवी, कामगार कायद्याची पदवी, समाजसेवकची पदवी अथवा पदवीत्तोर पदवी असणाऱ्या सेवकास व उमेदवारास प्राधान्य देणे गरजेचे आहे. तसेच आकृतीबंध म्हणजे सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये या पदांसाठी बदल करणे गरजेचे आहे.

पुणे मनपा सेवा नियमावलीतील भ्रष्टाचार –
पुणे महापालिका सेवा प्रवेश नियमावली 2014 मध्ये अनुभवामध्ये कसे भ्रष्टाचार केलेले आहेत व बदल केलेले आहेत ते पहा – येथे शैक्षणिक पात्रता व अनुभव हा जनसंपर्क अधिकारी वर्ग दोन या नामनिर्देशनासाठी पदासाठी (पाच वर्षाचा) अनुभव हा सहाय्यक माहिती व जनसंपर्क विभागातील अधिकारी या पदासाठी ठेवण्यात आलेला आहे. परंतु पदोन्नतीसाठी, नामनिर्देशनासाठी विहित केलेली अर्हता व पुणे महानगरपालिकेच्या आस्थापनेवरील सेवाजेष्ठता व गुणवत्ता या आधारे सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी या पदावरील किमान (तीन वर्षाचा) अनुभव असणे आवश्यक, म्हणजे पदोन्नतीसाठी तीन वर्षाचा अनुभव व नामनिर्देशनासाठी पाच वर्षाचा अनुभव अशी वेगवेगळ्या अटी व शर्ती येथे टाकलेले आहेत. म्हणजेच एकसारखे समकक्ष अनुभव व समकक्ष पात्रता कोठेही नाही. तसेच इतर महानगरपालिकांमध्ये माहिती व जनसंपर्क अधिकारी हे पद वर्ग एक मध्ये असून त्यांना वर्ग एकची वेतन श्रेणी देण्यात येत आहे. तसेच प्रतिनियुक्ती वर राज्य शासनाच्या माहिती व जनसंपर्क संचालनालयातील समकक्ष अधिकाऱ्यांच्या प्रतिनियुतीने नियुक्ती देता येईल असे येथे नमूद केलेले आहे.

 परंतु येथे त्या अधिकाऱ्यांना किती अनुभव असावा? हे नमूद केलेले नाही. यामुळे ही सेवा प्रवेश नियमावली मनमानी व भ्रष्ट पद्धतीने बनवून काही सेवकांच्या मनाप्रमाणे बनवलेली असल्याचे दिसून येत आहे. सहाय्यक माहिती व जनसंपर्क अधिकारी सेवा नामनिर्देशनाने- मान्यता प्राप्त विद्यापीठाची कोणत्याही शाखेची पदवी किंवा समकक्ष आहेत. पत्रकारिता व जन संज्ञापन मधील पदविका आवश्यक तेथे अनुभवाची कुठलीही अट नमूद केलेली नाही. याची कारणे काय आहेत? ते योगेश हेंद्रे यांना या पदावर बसवण्यासाठी हे सर्व कारस्थान केलेले आहे. त्यामुळे येथे योगेश हेद्रे यांना प्रभारी पदभार दिलेला आहे तो बोगस, भ्रष्टाचारी पद्धतीने देण्यात आलेला आहे असे स्पष्टपणे दिसत आहेत. योगेश हेद्रे यांचे अनेक भ्रष्टाचार समोर येत आहेत. 

योगेश हेंद्रे यांचा भ्रष्टाचार –
त्यापैकी काही ठराविक वृत्तपत्रांनाच जाहिराती देणे, ठराविक वृत्तपत्रांनाच प्रेस मीटिंगची माहिती पाठवणे, ठराविक वृत्तपत्रांचे संपादकांनाच ग्रुप मध्ये ॲड करून घेणे, ठराविक वृत्तपत्रांचे संपादकांना ग्रुप मध्ये ॲड न करणे, जे काही अधिकारी असतील त्यांच्याविरुद्धची माहिती, पुणे महानगरपालिकेच्या विरुद्ध ची माहिती पत्रकारांना व संपादकांना पुरवणे, ज्या पुणे महानगरपालिकेच्या बाजूने अथवा विरुद्ध बातम्या येत आहेत त्या बातम्या रोज आयुक्तांपर्यंत न पोहोचवणे व संबंधित खाते प्रमुखांपर्यंत न पोहोचवणे. लोकशाही दिनासाठी आलेले पुणेकर नागरिक त्यांचे नियोजन न करणे, त्यांच्या तक्रारी वेळेत निकाली न काढणे, इतर अनुषंगाने जनतेचे व नागरिकांचे प्रश्न माहिती व जनसंपर्क अधिकारी यांना त्यांनी न सोडवणे. तसेच टेलिफोन ऑपरेटर या हुद्याच्या सेवकास जनसंपर्क अधिकारी हे पद देणे कितपत योग्य आहे?

तसेच या भ्रष्टाचारी अधिकाऱ्याला आयुक्त विक्रम कुमार व अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी कशाच्या आधारे व कोणती गुणवत्ता व पात्रता बघून नेमणूक दिलेली आहे. म्हणजेच हे पद भ्रष्टाचारांनी भरलेले असून यामध्ये जे पात्र व सेवाज्येष्ठ उमेदवार/सेवक आहेत, अनेक सेवकांनी अर्ज केलेले असूनही त्यांना अपात्र करण्यात आलेले आहे हे येथे स्पष्ट दिसत आहे. याची माहिती सविस्तरपणे पुराव्यानिशी पुणेकरांपर्यंत पोहोचवलेली आहे व इथून पुढेही पोहोचवत राहणार आहोत.