Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

पुणे शहरातील पोलीस उपायुक्त व सहा आयुक्तांच्या बदल्या प्रस्तावित – पोलीस आयुक्त

पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहर वाढत असून, लोकसंख्येचीही घनता वाढत आहे. त्यातच ग्रामीण पोलीस दलातील काही भाग हा पुणे शहर पोलीस आयुक्तालयात समाविष्ठ करणार आहे. यासाठी नवीन पोलीस ठाणी निर्माण करून, त्यासाठी आणखी एका परिमंडळाची आवश्यकता असल्याचे नमूद करून, पुणे शहर पोलीस दलाची फेररचना करून उपायुक्त व सहायक आयुक्तांच्या लवकरच बदल्याच्या प्रस्तावित असल्याचे पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता यांनी सांगितले.


पुण्याच्या ग्रामीण भागातील हवेली व लोणीकाळभोर पोलीस ठाणे शहर पोलीस दलात समावेश करण्याच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाली असली तरी त्यांची अंमलबजावणी झाली नाही. दरम्यान पुणे शहरातील बहुतांश प्रस्ताव गृह विभागाकडे प्रलंबित असून, हडपसर व चतुःश्रृृंगी या दोन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत आणखी एक नवीन पोलीस ठाणे तयार करण्याचाही प्रस्ताव प्रलंबत आहे.