Monday, December 23 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मराठा आरक्षण प्रकरणी………… छत्रपती संभाजीराजे मराठा समाजाची दिशाभूल करून दुटप्पीपणे वागत आहेत – प्रविण गायकवाड

पुणे/दि/ प्रतिनिधी/
संसदेत एक आणि बाहेर दुसरी भूमिका घेवून मराठा समाजाची दिशाभूल करीत असल्याची टिका संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केली आहे.
राज्यसभेत २०१८ मध्ये मंजूर झालेल्या १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे मागासवर्ग आयोगाच्या कादयाने आरक्षणासाठी नवे प्रवर्ग तयार करण्याचे राज्यांचे अधिकार रद्दबातल ठरले. या घटना दुरूस्तीला भाजपाचे खासदार छत्रपती संभाजीराजे मराठा आरक्षणाच्या आंदोलकांसमोर जाऊन आर्थिक मागास प्रवर्गातून (एसईबीसी) मराठा आरक्षणाची मागणी करण्याचा दुटप्पीपणा करतात. संसदेत एक बोलतात आणि समाजासमोर त्याच्या विरोधी भूमिका म्हणजे मराठा समाजाची दिशाभूल असल्याची टीका त्यांनी केली आहे.


मराठा समाजाला राखीव जागा मिळाव्यात यासाठी सातार्‍याचे भाजपाचे खासदार छत्रपती उदयन राजे भोसले व कोल्हापूरचे छत्रपती युवराज संभाजी महाराज यांना मराठा मेळाव्यांतून बोलाविले जात आहे. या मेळाव्यांतून छत्रपती संभाजी महाराज एसईबीसी आरक्षणाचा आग्रह धरीत आहेत.
मात्र महा त्यांचा दुटप्पीपणा असल्याचे गायकवाड यांनी सांगितले. दरम्यान १०२ व्या घटना दुरूस्तीमुळे राज्य सरकारांचा अधिकार संपुष्टात आला आहे. यासाठी संभाजी महाराज यांनी कायदयाच्या बाजूले मतदान केले होते. तेच संभाजी महाराज आता १०३ दुरूस्तीनुसार मराठा समाजाला मिळू शकणारे आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचे (ईडब्ल्युएस) १० टक्के आरक्षण नाकारत आहेत.
वास्तविक पाहता, विशेष आर्थिक मागास प्रवर्गातून राज्य सरकारने मराठा समाजाला दिलेल्या आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे, हा निर्णय घटनापीठ केंव्हा घेईल हे माहित नाही. सद्यःस्थितीत ईडब्ल्युएसचे आरक्षण सहजपणे मिळू शकते.
मात्र ते नाकारायचे आणि एसईबीसी चा आग्रह धरारयला ही मराठा समाजाची फसवणूक आहे असा आरोपही संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांनी केला आहे.