
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे महानगरपालिकेचे शहर अभियंता प्रशांत वाघमारे हे येत्या शनिवारी म्हणजे 31 जानेवारी 2026 रोजी सेवानिवृत्त होत आहेत. त्यांच्या सन्मानार्थ होणाऱ्या कार्यक्रमासाठी, पुणे महापालिकेच्या बांधकाम विभागातील काही अतिउत्साही अभियंत्यांनी, प्रत्येकी एक लाख रुपये वर्गणी काढावी असा सुर आळविण्याचे काम मागील काही दिवसात सुरू होते. दरम्यान हॉल व लॉन बुक झाले, जेवणावळीचा मेनूही ठरला होता. दरम्यान प्रत्येकी एक लाखाचे टारर्गेट काही पूर्ण झाले नव्हते. काहींनी बळजबरीने एक/एक लाख रुपये दिलेही होते. दरम्यान गुरूवार दि. 28 जानेवारी रोजी राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे आकस्मित निधनामुळे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करून, कोणतेही शासकीय कार्यक्रम करण्यास बंदी आदेश जारी झाला. त्यामुळे पुणे महापालिकेतील कित्येक अभियंत्यांनी सुटकेचा निःश्वास सोडला असल्याचे वृत्त आहे.
कशासाठी दयायचे प्रत्येकी एक लाख रुपये –
पुणे महापालिकेतील काही अभियंत्यांनी सांगितले की, आम्ही कशासाठी एक लाख रुपये दयायचे. आमच्यासाठी शहर अभियंत्याने काय केले आहे. शहर अभियंता हे ना अधिकारी- कर्मचाऱ्यांचे झाले नाहीत… ना, विकसक… डेव्हलपर्स यांचे झाले नाहीत. एका विकसकाला, दुसऱ्या विकसकाच्या अंगावर पाठवुन दयायचे, त्याच्या विरोधात कार्यकर्त्यांना पाठवायचे, त्याच्या विरोधात कोर्टात जायला सांगायचे, त्याच्या विरोधात सन्माननियांकडे जायला सांगायचे… असेच उद्योग मागील अनेक वर्ष शहर अभियंता कार्यालयात सुरू होते. त्यामुळे एक विकसक दुसऱ्याचे तोंडही पाहत नव्हते. एकमेकांविरूद्ध लावुन दिल्यामुळे विकसकांमध्ये व्देषाची भावना निर्माण झाली आहे.
तर दुसरीकडे एका अधिकाऱ्याला दुसऱ्या माहिती अधिकार कार्यकर्त्याला वठणीवर आणा म्हणून सांगायचे, आणि पुढे जावून त्याच माहिती अधिकार कार्यकर्त्याला, त्याच अधिकाऱ्याच्या अंगावर पाठवून देण्याचे कामही शहर अभियंता यांनी केले आहे.
बदली, पदोन्नती आणि पदस्थापनेसाठी कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंत्याला गुराढोरासारखे वागविले. कनिष्ठ अभियंता ते शाखा अभियंता आणि शाखा अभियंता ते उपअभियंता या पदावर पदोन्नतीवेळी देखील मूग गिळून बसले. कित्येकांना तर सेवानिवृत्ती जवळ आली तरी शाखा अभियंता ते उपअभियंता पदोन्नती मिळू दिली नाही. काही विशिष्ठ अभियंत्यांला केवळ बांधकाम विभागच दिला, तर काहींना सेवानिवृत्तीपर्यंत बांधकाम खात्यात प्रवेश दिला नाही, कित्येकाला सडविण्याचे काम शहर अभियंत्याने केले आहे, जणू प्रत्येकाला मराठी चित्रपटातील (ललित पवार सारख्या खलनायिकेसारखे) एकादया सासु सारखे छळले असल्याची माहिती काही अभियंत्यांनी दिली आहे. त्यामुळे आम्ही कशासाठी प्रत्येकी एक लाख रुपये दयायचे असाही सवाल त्यांनी व्यक्त केला होता.
सात/आठ लाखात होणाऱ्या कार्यक्रमासाठी 24 लाख रुपये कशासाठी-
बांधकाम विभागातील 24 उपअभियंत्यांकडून प्रत्येकी एक लाख रुपये प्रमाणे 24 लाख रुपये जमा करण्याचा काहींचा बेत होता. तथापी काही अभियंत्यांनी सांगितले की, कार्यक्रमासाठी पाच/सहाशे अधिकारी, कर्मचारी व कार्यकर्ते जरी आले तरीही एका थाळीस 600 ते 700 रुपये प्रमाणे ठरल्यास, लॉनचे भाडेही माफ केले जाते. शिवाय 7 ते 8 लाख रुपयांत कार्यक्रम पूर्ण होऊ शकतो. मग आमच्याकडून प्रत्येकी एक लाख रुपये कशासाठी मागितले जात आहे असाही सवाल काही अभियंत्यांनी व्यक्त केला करून याबाबत तीव्र असंतोष निर्माण झाला होता.
बरे झाले सेवानिवृत्तीचा कार्यक्रम झाला नाही –
सेवानिवृत्तीच्या कार्यक्रमात बळजबरीने शहर अभियंत्याने किती मोठी कामे केली, कुणावर कसे उपकार केले, कुणाला कसे मायेने जवळ केले, हे बळजबरीने बोलावे लागते. किमान शहर अभियंत्याचा मान राखण्यासाठी तरी सार्वजनिक कार्यक्रमात अधिकाऱ्यांचे गोडवे गावे लागतात. तथापी शासकीय दुखवट्यामुळे पुणे महापालिकेतील अभियंते या बळजबरीच्या भाषणबाजीतून मुक्त झाले आहेत. आता कुणालाही खोटंच बोलावे लागणार नाही, विनाकारण गोडवे गावे लागणार नाही, त्यामुळे पुणे महापालिकेतील अभियंते भयंकर खुष झाले असल्याचे पहायला मिळत आहे. नाहीतरी शहर अभियंत्याने काय केले ते अभियंत्यांनी वर सांगितलेच आहे.
कार्यकर्त्यांची छळवणूक व फसवणूक-
शहर अभियंत्याकडे काही कामे घेवून येणाऱ्या कार्यकर्त्यांना तर पशुपेक्षाही हीन दर्जाची वागणूक शहर अभियंता वाघमारे यांनी दिली असल्याची शेकडो कार्यकर्त्यांची भावना आहे. दरम्यान एखाद्या भांडवलदार पक्षाचा नेता किंवा कार्यकर्ता आला तर त्याला थेट दालनात प्रवेश होता. परंतु कार्यकर्त्यांना पाच/पाच तास वाट पहावी लागत होती हे वास्तव आहे. एकाही कार्यकर्त्याचे काम करून दिले नाही, एवढेच नव्हे तर घोरपडे पेठेतील आपल्याच नातेवाईकाला पुणे महापालिकेत येण्यापासून कसे परावृत्त केले हे तर माझ्या समोरची घटना आहे. त्याच संपूर्ण आयुष्यच सडवून टाकलं. एलडी, मुरलीधर काकांपासून ते कालपर्यंत त्यांच्या दारात थांबलेल्या प्रत्येकाला मी पाहिले आहे. एका कार्यकर्त्याला दुसऱ्याच्या अंगावर पाठवुन दयायचे आणि दुसऱ्याजवळ त्याच्या गरीबीची थट्टा करायची या अशा कुप्रवृत्तीमुळे शहर अभियंत्याच्या सेवानिवृत्तीचे कुणालाही दुःख नाही. अधिकारी-कर्मचारीही खुष आहेत, कार्यकर्तेही खुष आहेत. त्यामुळे शहर अभियंत्याचा सेवानिवृत्ती कार्यक्रम झाला नाही हेच बरे असे अनेकजण बोलत आहेत.
काय हे दुर्देव –
पुणे महापालिकेचे शहर अभियंता यांनी मागील 15 वर्षात किमान 5000 पाच हजार सेवकांच्या सेवानिवृत्ती कार्यक्रमास हजर होते. परंतु दुर्देव असे झाले आहे की, त्यांचाच सेवानिवृत्ती कार्यक्रम पुणे महापालिकेत होणार नाही, भोजनावळी उठणार नाही… गोडवे गाणारे भाषणे होणार नाहीत… सेवानिवृत्तीच्या दिवशी कोणताही अधिकारी पुणे महापालिकेत हजर नसणार किंवा शहर अभियंत्याला सन्मानाने पहिला मजला उतरून त्यांच्या खाजगी वाहनापर्यंत त्यांना पोहोचवायला देखील येणार नाही…केवढे हे दुर्देव म्हणाले लागेल. ह्या सुखापासून शहर अभियंता मात्र मुकले आहेत.
नाही म्हणायला गेलं तरी, गुगल यु-ट्युबवर.. माझी कहाणी या 0 ते 30 भागामध्ये शहर अभियंता यांचे लहान बंधू प्रमोद वाघमारे यांनी केलेली भविष्यवाणी खरी ठरली आहे. त्यांच्या 16 व्या, 17 व्या या जोड भागात शहर अभियंता यांना किती शाप दिले होते, त्यांचा शाप खरा ठरतांना दिसत आहे. पुढे जावून त्यांनी माझी कहानी मध्ये दिलेले आणखी शाप पहायला मिळू नये म्हणजे मिळविले.... शनिवार दि. 31 जानेवारी 2026 आहे. तर रविवारी 1 फेब्रुवारी आहे, रविवार पासूनच शहर अभियंता प्रशांत वाघमारे यांच्या सहीची (पुणे महापालिकेत) किंमत शून्य होणार...पुढे शासकीय दुखवट संपल्यानंतर, काही लाभार्थी नगरसेवक व संघटना- कार्यकर्त्यांना पुढे करून स्वतःचा कार्यक्रम, स्वतःच्याच खर्चाने करण्याचा प्रयत्न केला तरी पुणे महापालिकेतील किती अधिकारी-कर्मचारी या खाजगी कार्यक्रमास फिरकतील याविषयी देखील शंका आहे. पुणे महापालिकेतील या बळजबरीच्या कार्यक्रमाला अभियंत्यांनी मात्र सुटकेचा निःश्वास सोडला आहे एवढे मात्र नक्की.
