Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पुणे शहर पोलीसांकडील आजच्या गुन्ह्यांचा वृत्तांत

  1. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन 2. चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन 3.पर्वती पोलीस स्टेशन 4.विश्रांतवाडी पोलीस स्टेशन व 5. येरवडा पोलीस स्टेशन


नॅशनल फोरम/पुणे/दि/ अनिरूद्ध शालन चव्हाण/मोबा-9890452092/
पुणे शहर वाहतुक पोलीस आता क्वचितच रस्त्यावर दिसून येतात. वाहतुक पोलीसांचा एक वेळ ठरलेली असते, तेवढ्या वेळेत दंडाचा कोटा पूर्ण केला की, नंतर वाहतुक पोलीस कुठेही दिसत नाहीत अशी आज पुणे शहरातील परिस्थिती आहे. यामुळे दुचाकी, चारचाकी वाहने अतिशय बेदरकारपणे चालविली जावून त्यात नागरीकांचा जीव जात आहे. लोणीकाळभोर पोलीस स्टेशन व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतही बेदरकार वाहन चालविल्यामुळे दोन वेगवेगळ्या ठिकाणी नागरीचा मृत्यू झाला आहे.

लोणीकाळभोर व चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीत बेदरकार वाहनांमुळे नागरीकांचा मृत्यू
लोणीकाळभोर पोलीस स्टेशन हद्दीतील काळभोरवाडा, थेऊर फाटयाजवळ, एक 35 वर्षीय इसमास कुणीतरी अज्ञात इसमाने ठोकर मारून त्याच्या मृत्यूला कारणीभूत ठरला आहे. अज्ञात इसमाने त्याच्या ताब्यातील वाहन सार्वजनिक रोडवर हयगयीने व धोकादायक पद्धतीने व वाहतुक नियमांकडे दुर्लक्ष करून अनोळखी 35 वर्षीय इसमास गंभीर जखमी करून त्याच्या मृत्यूस कारणीभूत ठरला. तसेच अपघाताच्या ठिकाणी न थांबता व पोलीसांना खबर न देताच तो पळून गेला आहे. याबाबतची फिर्याद लोणीकाळभोर पोलीस स्टेशन कडील पोलीस अंमलदार सचिन सोनवणे यांनी दिली असून अधिक तपास पोलीस उप निरीक्षक बिराजदार करीत आहेत. 


तर चतुःश्रृंगी पोलीस स्टेशन हद्दीतील विद्यापीठ ते पाषाण या दुहेरी ववाहतुकीच्या रोडवर एनसीएल समोरील आसरा मंदिर समोर पाषण येथे पहाटे साडेपाच ते सहा वाजण्याच्या सुमारास अज्ञात वाहन चालकाने त्याच्या ताब्यातील वाहन हे वातुकीचे नियमांकडे दुर्लक्ष करून, हयगयीने अविचाराने व भरधाव वेगात चालवुन, वर नमूद ठिकाणी पायी चालत असलेल्या आशा विजयकुमार पाटील वय 73 यांना जबर ठोस मारून, गंभीर जखमी करून त्यांच्या मृत्यूस कारणीभूत ठरला आहे. 
याबाबतची फिर्याद मृत आशा पाटील यांचा मुलगा अतुल विजयकुमार पाटील वय 52 वर्ष रा. अभिमानश्री हाऊसिंग सोसायटी पाषाण रोड यांनी दिली आहे. अधिक तपास सहा पोलीस निरीक्षक अमोल धस करीत आहेत. 

पर्वती, विश्रांतवाडीसह येरवड्यात घरफोडी-चोरी-
पर्वती,विश्रांतवाडी व येरवड्यात घरफोडी आणि सोनसाखळी चोरीच्या घटना घडल्या आहेत. यात पर्वती पोलीस स्टेशन हद्दीतील दि. 14 ते 18 जानेवारी दरम्यान जय भवानीनगर लेन नं. 8 वेताळ बाबा मंदिरामागे पर्वती पुणे येथील फिर्यादी यांचे घर उघडे असतांना, कोणीतरी अज्ञात इसमाने त्यांचे राहते घराचे मुख्य दरवाज्यातून घरात प्रवेश करून कपाटातील सुमारे 2 लाख 5 हजार रुपये किमतीचे सोन्या चांदीचे दागिने घरफोडी करून चोरल आहेत.
याबाबत एका 25 वर्षीय महिलेने फिर्याद दिली असून, अज्ञात आरोपी विरूद्ध भा.न्या.सं.क 305 (अ) व 3(5) नुसार गुन्हा दाखल केला असून पर्वती पोलीस स्टेशनचे पोलीस उप निरीक्षक किरण पवार अधिक तपास करीत आहेत.

येरवडा पोलीस स्टेशन हद्दीतील फ्लॉवर वॅक्स रेस्टारंट जवळ, कल्याणीनगर पुणे येथे सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मोटारसायकल वरील दोन अनोळखी इसमांनी, एक 54 वर्षीय इसम पायी जात असतांना, नमूद इसमांनी दुचाकीवरून त्यांचे जवळ येवून त्यांच्या गळ्यातील सुमारे 1 लाख रुपये किमतीची सोन्याची चैन जबरदस्तीने हिसकावून जबरी चोरी केली आहे. 
येरवडा पोलीस स्टेशन येथे एका 54 वर्षीय व्यक्तीने फिर्याद दिली असून आरोपी विरूद्ध भा.न्या.सं.क 304 (2), 3 (5) अन्वये गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक महेश फटांगरे करीत आहेत. 


तर विश्रांतवाडी पोलीस स्टेशन हद्दीतील आळंदी रोड वरील साठे बिस्कीट बस स्टॉप विश्रांतवाडी येथे एक 49 वर्षीय महिला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास पीएमपीएमएल बसने प्रवास करीत असतांना, बस प्रवासा दरम्यान कोणीतरी अज्ञात इसमाने बस मधील गर्दीचा फायदा घेवून, फिर्यादी यांच्या गळ्यातील तीन तोळे सोन्याचे मंगळसुत्र काढुन चोरी केली आहे. अज्ञात इसमाविरूद्ध भा.न्यास.सं.क 304  (2) नुसार गुन्हा दाखल केला असून अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शब्बीर शेख करीत आहेत.