Tuesday, January 27 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

पैशासाठी जिवलग मित्र झाला पक्का वैरी, साथीदाराच्या मदतीने केला मित्राचा गेम

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
दिल,दोस्ती आणि दुनियादारीत पैश्याचा विषय आला की जिवलग मित्र देखील वैऱ्यासारखे वागु लागतात. पैशासाठी एका मित्राचा काटा काढण्यासाठी त्याने दुसऱ्याच साथीदाराला बोलावून घेतले आणि मित्राचाच घात केला. राग आणि पैसा इतका वाईट आहे की, त्याच मित्राला वारजे टेकडी येथील शनि मंदिराजवळ बोलावून त्याच्यावर लोखंडी हत्याराने गळयावर, छातीवर, पोटावर, पायावर, वार करुन व डोक्यात दगड घालुन त्याला जिवे ठार मारले. या घटनेनंतर हद्दीत खळबळ माजल्यानंतर, तसेच वारजे माळवाडी पोलीस स्टेशन हद्दीत खुनासारखी गंभीर घटना घडल्याने, वारजे माळवाडी पोलीस स्टेशनसह पुणे शहर पोलीस दलाकडील दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1 गुन्हे शाखेने समांतर तपास केला. यात गुन्हे शाखेने 12 तासाच्या आता गुन्हेगारांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,
पुणे शहर पोलीस आयुक्तालय अंतर्गत वारजे माळवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं 27/2026, भा.न्या.सं.क. 103(1) या गुन्ह्याचा समांतर तपास करीत असताना पोलीस अंमलदार बाळु गायकवाड व साई कारके यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, गणपती माथा ते शिंदे पुल वारजे दरम्यान दोन संशयित इसम थांबले आहेत व त्यांनी काहीतरी गैरकृत्य केल्याचे त्यांचे हालचाली व बोलण्यावरुन वाटत आहे अशी खात्रीशिर बातमी मिळाली.

 सदरच्या बातमीची खात्री करण्याकरिता पोलीस निरीक्षक श्री. दत्ताराम बागवे सोबत महिला सहा. पोलीस निरीक्षक कावडे व पोलीस स्टाफ असे रवाना झाले. सदर ठिकाणी जावुन पाहणी केली असता संशयित इसम यांचेकडे जात असताना त्यांना पोलीसांची चाहुल लागताच ते पळुन जावु लागल्याने पोलीसांनी त्यांचा पाठलाग करुन त्यांना ताब्यात घेतले. तसेच त्यांना त्यांचे नाव व पत्ता विचारता त्यांनी त्यांची नावे -

1) शुभम राजेश शिंदे, वय 25 वर्षे,
रा. फ्लॅट नं 3, पहिला मजला, स.नं. 2, ताकवले कॉम्प्लेक्स, सिंहगड रोड, नांदेड सिटी, नांदेड, पुणे, 2) लकी सुरेंन्द्र सिंग, वय 23 वर्षे,
रा खडकी ॲम्युनेशन फॅक्टरी, 51 नं बंगला, पुणे, व
3) सुनिल संतोष खलसे ऊर्फ एस.के. वय 19,
रा.संभा नगर झोपडपट्टी, हिंगणे, होम कॉलनी, कर्वेनगर, पुणे
4) विधीसंघर्षित बालक

असे सर्व गुन्हा केल्यापासून पळुन गेले होते. त्यांना पोलीसी खाक्या दाखविल्यानंतर, त्यांनी इसम नामे राजेंद्र सुभाष ऐलगच्चे  रा.स्वराज आर्केड बी.विंग 201 आंबेगाव पुणे यास दिनांक 21 जानेवारी रोजी रात्रौ साडेआठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास आकाशनगर शनि मंदिर टेकडी वारजे पुणे येथे बोलावून पैसे देवाणघेवाणच्या कारणावरून त्याला लोखंडी हत्याराने गळयावर, छातीवर, पोटावर, पायावर, वार करुन व डोक्यात दगड घालुन त्याला जिवे ठार मारले. 

सदर आरोपीस पुढील कारवाईकरीता वारजे माळवाडी पोलीस स्टेशन, पुणे शहर यांचे ताब्यात देण्यात आले आहे.

सदरची कारवाई पुणे शहरचे अपर पोलीस आयुक्त (गुन्हे), पंकज देशमुख, पोलीस उप आयुक्त (गुन्हे) निखिल पिंगळे, सहा पोलीस आयुक्त (गुन्हे 1),  विजय कुंभार, व वरिष्ठ पोलीस निरीक्षक दरोडा व वाहनचोरी विरोधी पथक 1  दत्ताराम बागवे, यांचे मार्गदर्शनाखाली 
म. सहा. गोलीस निरीक्षक वर्षा कावडे, सपोफौ बाळु गायकवाड, पोलीस अंमलदार गणेश ढगे, निनाद माने, अजित शिंदे, प्रदीप राठोड दत्तात्रय पवार, रविंद्र लोखंडे, रेहाना शेख, साधना पवार, पोलीस अंगलदार महेश पाटील, साईकुमार कारके, अमित गद्रे, शिवाजी सातपुते यांनी केली.