
नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
इन्टाग्राम वरून प्रेमाच्या जाळ्यात अडकावुन खेडशिवापुर येथे बोलावून, पुढे त्याचे पर्यावासन खुनात झालेल्या व या प्रकरणाशी संबंधित असलेल्या एका विधीसंघर्षित बालिकेस गुन्हे युनिट 3 च्या पथकाने अतिशय शिफाफीने अटक केली आहे. पुणे शहराला हादरवुन सोडणाऱ्या गुन्ह्याचा तपास युनिट 3 च्या पथकाने केला आहे.
गुन्ह्याची हकीकत अशी की, 9 जानेवारी 2026 रोजी गुन्हे शाखा, युनिट 3 चे सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे व पोलीस अंमलदार असे वरिष्ठांच्या आदेशाने पाहिजे आरोपी व रेकॉर्डवरील गुन्हेगार चेक करुन कारवाई करणेकरीता वारजे, उत्तमनगर पोलीस स्टेशन हददीत पेट्रोलिंग करीत असताना, सहा पोलीस उपनिरीक्षक पंढरीनाथ शिंदे व पोलीस अमंलदार अमोल काटकर यांना गोपनिय बातमीदारामार्फत माहिती मिळाली की, विश्रांतवाडी पोलीस स्टेशन गु.र.नं. 375/2025 भारतीय न्याय संहिताचे कलम 103, 137 (2) अन्वये दाखल असलेल्या गुन्हयातील पाहिजे विधीसंघर्षित बालिका ही तिच्या राहतेघरी असल्याची खात्रीलायक माहिती मिळाली.
तत्काळ गुन्हे शाखा युनिट 03 कडील पोलीस पथकाचे मार्फतीने सापळा रचुन गुन्हयातील विधीसंघर्षित बालिकेस ताब्यात घेण्यात आले व तिच्याकडे गुन्हयाचे अनुषंगाने प्राथमिक चौकशी केली असता दि.29 डिसेंबर 2025 रोजी तिने, तिचे मित्र नामे प्रथमेश चिंदु आढळ, नागेश बालाजी धबाले, प्रितेश मनोज जाधव, कुलदिप राजु पाचपिले व इतर मित्र यांचे सोबत दाखल गुन्हयातील पीडीत मुलगा नामे अमन सुरेंद्रसिंग गच्चड, वय 17 वर्ष यास तिच्या मित्रांच्या सांगण्यावरुन इन्स्टाग्रामच्या साहयाने खोटया प्रेमाच्या जाळयात आडकवुन त्याला खेड शिवापुर येथे घेवुन गेली. नमुद गुन्हयात तिचा महत्त्वपुर्ण सहभाग असल्याचे निषन्न झाल्याने तिला ताब्यात घेवुन पुढील कायदेशिर कारवाई कामी विश्रांतवाडी पोलीस स्टेशनच्या ताब्यात देण्यात आले
सदरची कारवाई ही अपर पोलीस आयुक्त, (गुन्हे शाखा) पुणे शहर, श्री पंकज देशमुख, पोलीस उप-आयुक्त, गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री निखिल पिंगळे, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हे-1, पुणे शहर, श्री. विजय कुंभार यांचे मार्गदर्शनाप्रमाणे वरिष्ठ पोलीस निरिक्षक, युनिट 3 गुन्हे शाखा, पुणे शहर, श्री. राम राजमाने यांचे सुचनेनुसार सहा पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर ढवळे, पोलीस अमंलदार पंढरीनाथ शिंदे, अमोल काटकर, अर्चना वाघमारे, अनुष्का जगदाळे व तुषार किंद्रे यांनी केली.
