Sunday, October 19 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

गावठी कट्टा आणि एक जिवंत काडतुसासह बालगुन्हेगारास भारती विद्यापीठ पोलीसांनी केले जेरबंद

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरात दिवसेंदिवस कमरेला बंदुक लावण्याची हौस अनेकांना होत आहे. त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगारांना तर कट्टा बाळगण्याची हौस तर अधिकच वाढली असल्याचे पोलीस अटक सत्रावरून दिसून येत आहे. पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीतील अनेक पोलीस स्टेशन हद्दीत एक/दोन सराईत गुन्हेगारांकडून, हौशी आणि त्यातल्या त्यात नवशिक्या गुन्हेगाराकडून गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड पकल्याच्या अनेक घटना समोर येत आहे. भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन हद्दीत देखील एका सराईत विधीसंघर्षित बालकाकडून अवैध गावठी बनावटीचा कट्टा आणि जिवंत राऊंड हस्तगत करून त्याला अटक केल्याचा गुन्हा दाखल झाला आहे.

भारती विद्यापीठ पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक  श्री. राहुलकुमार खिलारे यांचे मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी व पोलीस स्टाफ हे हद्दीत पेट्रोलींग करीत असताना, पोलीस अंमलदार मितेश चोरमोले, सागर बोरगे व अभिनय चौधरी यांना त्यांचे गोपनीय बातमीदारामार्फतीने नवले पुलाकडुन कात्रजकडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हीस रोडवर एक इसम गावठी बनावटीचा कट्टा घेवुन थांबला आहे अशी बातमी मिळाली असता.... तत्काळ पोलीस तपास पथक हे नवले पुलाकडुन कात्रज कडे जाणाऱ्या शहीद कर्नल पेट्रोल पंपाच्या समोरील सर्व्हस रोडवर गेले असता,  तेथे एक विधीसंघर्षीत बालक हा त्याचे ताब्यात 50 हजार रुपये किंमतीचे एक गावठी बनावटीचा कट्टा व एक जिवंत काडतुस असा एकुण 50 हजार 500 रुपयांचा मुद्देमालासह मिळुन आल्याने त्याचेकडुन सदरचा मुद्देमाल हस्तगत करुन त्याचेविरुध्द भारती विद्यापीठ पोलीस स्टेशन गु.र.नं. 458/2025, भा.ह.अधि.क. 3. 25. म.पो.अधि.क. 37 (1) (3),135 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कामगिरी अपर पोलीस आयुक्त, पश्चिम प्रादेशीक विभाग, पुणे शहर, श्री राजेश बनसोडे,  पोलीस उप-आयुक्त परिमंडळ 2. पुणे शहर, श्री. मिलींद मोहीते, सहा. पोलीस आयुक्त स्वारगेट विभाग, पुणे शहर, श्री. राहुल आवारे यांचे मार्गदर्शनाखाली भारती विदयापीठ पोलीस स्टेशनकडील वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. राहुल खिलारे, तपास पथकाचे अधिकारी पोलीस उप-निरीक्षक निलेश मोकाशी, पोलीस अंमलदार मितेश चोरगोले, अभिनय चौधरी, सागर बोरगे, सचिन सरपाले, महेश बारवकर, मंगेश पवार, निलेश खैरमोडे, मंगेश गायकवाड, किरण साबळे, तुकाराम सुतार व संदीप आगळे या पथकाने केली