Friday, April 3 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !
Shadow

गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या नवताऱ्यांकडून पुणे शहरात अब तक 21 दरोडे

नॅशनल फोरम/पुणे/दि/ प्रतिनिधी/
पुणे शहरातील सोमवार पेठ येथुन 8 हजार कोटीचे एमडी हा अंमली पदार्थ पकडून ज्यांनी अंमली पदार्थांची बाजारपेठ उध्वस्त केली, त्या क्राईम युनिट क्र. 1 यांनी त्यांच्या मानाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला आहे. पुणे शहरातील गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी व गुन्हयावर नियंत्रण ठेवण्यासाठी पेट्रोलिंग करीत असतांना, हडपसर येथुन गुन्हेगारी विश्वात पदार्पण केलेल्या नवताऱ्यांना पकडून त्यांनी घातलेल्या 21 दरोड्यांचा उलगडा केला आहे. याकामी पोलीस अंमलदार हेमंत पेरणे व निलेश साबळे यांनी महत्वाची कामगिरी बजावली आहे.

गुन्ह्याची हकीकत अशी की,

गुन्हे शाखा युनिट-1, कडील पोलीस अधिकारी व अंमलदार पुणे शहरात गुन्हयांना आळा घालण्याकामी गुन्हे प्रतिबंध करण्याकामी हद्दीत गस्त घालित असतांना पोलीस हवालदार हेमंत पेरणे व पोलीस अंमलदार निलेश साबळे यांना त्यांच्या बातमी मिळाली की, पुणे शहर जबरी चोरी रेकॉर्डवरील आरोपी अस्लम शेख उर्फ बिल्ला व रेहान शेख रा. म्हाडा कॉलनी हडपसर पुणे यांनी मिळून पुणे शहरात ब-याच ठिकाणी त्यांचे इतर साथीदारांसह जबरी चोरीचे गुन्हे केलेले आहेत. 


जबरी चोरी करणाऱ्यांची माहीती मिळताच श्री. वाहीद पठाण पोलीस निरीक्षक अति. कार्यभार युनिट 1 गुन्हे शाखा पुणे शहर यांनी कळविली. श्री. पठाण त्यांनी सदरबाबत खात्री करून योग्य ती कायदेशीर कार्यवाही करण्याचे आदेश दिल्यानंतर, आरोपींच्या पत्त्यावर जावून शोध घेतला असता दोन्ही संशयित इसम त्यांचे राहते घरी मिळून आले. 

त्यास त्याचे नाव पत्ता विचारता त्याने आपले नाव व पत्ता 

1) अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला, वय 22 वर्ष (रा. फलॅट नं 303, बिल्डींग नंबर 03, नविन म्हाडा कॉलनी, ससाणे नगर, हडपसर पुणे)
2) रेहान जमील शेख उर्फ रिहान वय 19 वर्षे, (रा. फलॅट नं 310, बिल्डींग नं 28. नविन म्हाडा कॉलनी, ससाने नगर रोड, हडपसर पुणे )
असे असल्याचे सांगितले. त्यांनतर त्यास चौकशी कामी ताब्यात घेवुन युनिट-1 गुन्हे शाखा कार्यालय येथे घेवून आल्यानंतर त्यांचेकडे गुन्ह्यांचे अनुषंगाने चौकशी केली असता त्यांनी सुमारे 7 /8 दिवसांपूर्वी त्यांनी त्याचे साथीदारासोबत ॲक्टीवा मोपेड गाडी वरुन शांताई हॉटेल येथील चौक जवळ सोमवार पेठ पुणे येथे एका इसमाचे खिशातुन 30 हजार रुपये जबरदस्तीने काढुन घेतल्याचा गुन्हा मान्य केला आहे.

 या गुन्ह्याची समर्थ पोलीस स्टेशन कडून माहीती घेतली असता वरील घटनेचे अनुषंगाने समर्थ पोलीस स्टेशन येथे 304 (2), 3 (5) प्रमाणे गुन्हा दाखल असल्याचे समजले. तसेच आरोपी नामे अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला याचे कडे अधिक चौकशी केली असता त्याने इतर साथिदारांसोबत मिळून शरबतवाला चौक कॅम्प येथे एका इसमाचे पैसे चोरल्याचे सांगितले. सदरबाबत लष्कर पोलीस स्टेशन येथे लष्कर पोलीस स्टेशन येथे कलम 303 (2) अन्वये गुन्हा दाखल असल्याचे समजल्याने त्या गुन्हयाची देखील उकल करण्यात आली. अस्लम इस्माईल शेख उर्फ बिल्ला या सराईत आरोपीवर पुणे शहरात एकुण 21 गुन्हे दाखल आहेत.


ही कामगिरी वरीष्ठ पोलीस निरीक्षक, युनिट 1. वाहीद पठाण यांचे सुचनांप्रमाणे पोलीस उप निरीक्षक राहुल मखरे, पोलीस अंमलदार निलेश साबळे, हेमंत पेरणे, अनिकेत बाबर, मयुर भोसले व उमेश मठपती तसेच महिला पोलीस अंमलदार ज्योती मुल्का यांनी केली