Sunday, December 22 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

स्वच्छ भारत अभियानाला पुणे महापालिकेचा ठेंगा जुन्या टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयात कचर्‍याचे ढिगच ढिग

pmc Tilak Road ward office

पुणे/दि/ प्रतिनिधी/
अस्तित्वात नसलेल्या बाबी अस्तित्वात असल्याचे भासविणे, अस्तित्वातील परिस्थिती नाकारणे किंवा प्रसंगी दुर्लक्ष करणे, काही अडचण आलीच तर बघनु सांगतो, पाहून सांगतो अश्शी थाप मारून वेळ मारून नेणे, भारंभार कागद रंगविणे आणि शासनाच्या नस्तीला ओझ निर्माण करण्याचे काम आज पर्यंत पुणे महापालिकेने केले आहे आणि निरंतर ही प्रक्रिया सातत्याने सुरू आहे. सध्या संपूर्ण देशात व पुण्यात देखील स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्पर्धेचे आयोजन केले आहे. पुणे महापालिकेने देखील स्वच्छ पुरस्कार लीग २०२० चे आयोजन करून, स्वच्छतेसंदर्भात संपूर्ण पुणे शहरातील भिंतींना रंगरंगोटी करण्याचे काम वेगाने सुरू आहे. कचरा आहे तिथंच आहे, पण भिंती मात्र वेगवेगळ्या रंगाने रंगविल्या जात आहेत. नागरीकांना देखील या स्पर्धेत सहभागी करून घेण्यासाठी स्पर्धेचे आयोजनात शॉर्ट फिल्म, जिंगल,घोषवाक्य बनवा आणि लाखोची बक्षिसे जिंकण्याचे आवाहन पुणे महापालिकेने केले आहे. डामडोलारा करणे आणि दाखविणे व प्रत्यक्षात फुसका बार निघाला तरी अगली बार देखेंगे म्हणून वेळ मारून घेवून जाणे ही परंपरा पुणे महापालिकेने निरंतर आणि सातत्याने ठेवली आहे.

पुणे महापालिकेच्या अधिनस्थ असलेले सर्व वॉर्ड व प्रभागात स्वच्छतेबाबत भिंती रंगविल्या आहेत. परंतु वास्तवात कचर्‍याचे ढिगच्या ढिग साचलेले दिसत आहेत. पुणे महानगरपालिकेचे कर्मचारी दिवस-रात्र कचरा उलण्याचे काम करीत आहेत तरी देखील कचरा हटण्याचे नाव घेत नाही. यावर १६ क्षेत्रिय कार्यालये व ५ उपायुक्तांनी त्यांच्या त्यांच्या स्तरावर वॉर्ड व प्रभागातील पडीक हद्दीतील कचरा उचण्यासाठी व झाडणकामासाठी कोट्यवधी रुपयांचे टेंडर काढले आहेत. इतक करूनही कचरा हटण्याचे नाव घेत नाही. जशी अवस्था कचरा प्रकल्पाची तशीच अवस्था पुणे शहरातील कचर्‍याची आहे. सर्वच कामे करतांना दिसतात पण कचर्‍याचे ढिग कमी होतांना दिसत नाहीत.
टिळकराडे क्षेत्रिय कार्यालयाचा स्वच्छ भारत अभियानाला ठेंगा –
पुणे महापालिकेचे टिळक रोड क्षेत्रिय कार्यालय व दोन तीन उपायुक्त दर्जाचे अधिकारी शिवाजीराव ढेरे उद्योग भवनातील कार्यालयात कार्यरत आहेत. त्याला लागुनच नेहरू स्टेडीयम व गणेश कला क्रीडा मंच आहे. ज्या ठिकाणी दोन तीन उपायुक्त व एक क्षेत्रिय अधिकारी सहाआयुक्त कार्यरत असतांना देखील यांच्याच कार्यालय आवारात कचर्‍याचे व स्क्रॅपचे ढिग साचले आहेत. सोबतच्या छायाचित्रावरून या आवरात नेमकं घाणीच किती साम्राज्य पसरलंय हे दिसून येतच आहे. आत कचर्‍याचे ढिग व बाहेरही कचर्‍याचे ढिग साचले आहे.
टिळक रोड क्षेत्रिय कार्यालयाच्या बाहेरच राष्ट्रवादी कॉंग्रेस पुणे शहराचे कार्यालय आहे. त्यांच्या थेट दारासमोरच कचर्‍याचे ढिग उभे आहेत. एवढं भयानक चित्र असतांना देखील पुणे महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी पुणेकरांना कचरा व स्वच्छतेचे धडे देत आहे. म्हणतात ना दिव्याखाली अंधारच असतो अगदी तशी अवस्था पुणे महापालिका आणि येथील अधिकारी व कर्मचार्‍यांची झाली आहे.
पुणे महानगर पालिकेत मागील पाच सहा वर्षात तीन वेळा विधीमंडळाची अनुसूचित जाती कल्याण समिती आली. प्रत्येक वेळी सर्वच जाती वर्गातील कर्मचार्‍यांच्या अनुशेष, पदभरती व पदोन्नतीबाबत खोटी माहिती विधीमंडळ समितीला दिली आहे. अनु. जाती कल्याण समितीचा अहवाल प्रकाशित झाला आहे. आयोगचे प्रश्‍न व त्याला पुणे महापालिकेने दिलेली उत्तरे माहिती अधिकारात प्राप्त करता येवू शकतात. त्यात महापालिकेने दिलेली गोलमात्र उत्तरे सर्वांची भुवई उंचावली जाईल शिवाय प्रशासनातील लब्बाड्डीवर देखील सागरगोटे मारण्यासाठी हात शिवशिवले जातील.
पुणे महापालिकेतील समाज विकास व नागरी विकास केंद्राचा ५ पाच टक्के निधीला देखील चूड लावली जाते. त्याची देखील अफलातून माहिती दिली जाते. पुणे महापालिकेतील मागास घटकांच्या पाच टक्के निधीची माहिती घेतली तर अक्षरशः प्रशासनाची गचांडी पकडण्यासाठी नागरीक धावतील. कोणतंही खातं व विभागाची माहिती घ्या… लब्बाडी आणि लब्बाडी शिवाय काहीच हाती लागणार नाही. उगाच जगात पुणे महापालिकेचा अव्वल नंबर लागत नाहीये…..