Monday, November 18 पुण्यातील अग्रगण्य ई-वृत्तवाहिनी !

मनुस्मृती आणि चाणक्य निती नुसार देश-राज्याचा कारभार

कुटील आर्य चाणक्यच्या सुत्रानुसार, एखादा देश किंवा प्रदेशावर कब्जा करायचा असेल, तो कायमस्वरूपी आपल्या ताब्यात ठेवायचा असेल, तर तिथली अर्थव्यवस्था दुबळी करा, लोक अर्थाविना जर्रजर्र झाले पाहिजेत. त्या राज्याच्या चलनाची किंमत शून्य झाली पाहिजे. अर्थाविना, कुणाचाच कुणावर विश्‍वास राहणार नाही. अशी जर्रजर्र अवस्था झाल्यानंतर, तिथली जनता पशुपेक्षाही हीन दर्जापर्यंत पोहोचेल. त्यात युद्ध, अंतर्गत बंडाळी निर्माण करून, तिथल्या राज्यावर आक्रमण करून देश कायम स्वरूपी ताब्यात ठेवता येतो असे आर्य चाणक्याच्या चाणक्यनिती मध्ये नमूद आहे. अगदी तशीच अवस्था आज देश व राज्याची झाली आहे. प्रथम नोटाबंदी करून, देशातील प्रत्येक व्यक्तीला स्वतःच्याच दोन हजार रुपयांसाठी भिकार्‍यासारखे रस्त्यावर थांबविले. नवीन चलन बाजारात आणले परंतु जागतिक पातळीवर भारतीय रुपयांची किंमत कवडी इतकी देखील राहिली नाही.

                राज्याच्या उद्योगांचा विकासदरही गेली चार वर्षे सातत्याने कमी होत असून, ‘मेक इन महाराष्ट्र’ किंवा ‘मॅग्नेटिक महाराष्ट्र’ या उपक्रमांमधून नवीन उद्योगांमध्ये काहीच भर पडली नाही, उलट अस्तित्वात असलेले लघु व मध्यम उद्योग धंदे बंद पडले. लाखो कर्मचारी बेरोजगार झाले. मोठ्या कंपन्यात नोकरकपातीने  बेरोजगारीत आणखी वाढ झाली आहे. नवीन नोकरभरती पूर्णतः बंद पडली. थोडक्यात भारताची / महाराष्ट्राची अर्थव्यवस्था पूर्णतः खिळखिळी झाली आहे.

                राज्याचा विकासदर १० टक्यांवरून ७.३ टक्क्यांवर घसरला आहे. सेवा-कृषी क्षेत्रात झालेली घसरण, १५ हजार कोटींपर्यंत वाढलेली महसुली तूट, साडेचार लाख कोटींवर गेलेला कर्जाचा डोंगर- आणि कर्जाच्या व्याजाचा बोजा वाढला. आवाक्याबाहेरचा महसुली खर्च या बाबी महाराष्ट्र मोठया संकटाच्या खाईत निघाल्याच्याच निदर्शक आहेत. शेतक-यांच्या आत्महत्या रोखण्यात सरकार अपयशी ठरले आहे. अर्थात हे सर्व मनुस्मृती आणि चाणक्याच्या कुटीलनितीप्रमाणे राज्यकारभार सुरू आहे.

                युपीएसीसी/एमपीएससी सारख्या शासनातील प्रवेशाच्या परिक्षांमध्ये उत्तीर्ण होणार्‍यांना देखीलआज वेटींगलिस्ट मध्ये ठेवण्यात येत आहे. संघ- भाजपाची मनुस्मृती प्रणित.